Nale Safai : रेल्वे, BMC, लोकप्रतिनिधी यांच्या समन्वयातून साधणार नालेसफाई

उपमहापौर संजय घाडी यांनी केली कुर्ला भागातील नाल्यांची सफाई


मुंबई (विशेष प्रतिनिधी) : रेल्वे हद्दीतील नाल्यांच्या स्वच्छतेसंदर्भात रेल्वे प्रशासन, महानगरपालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या समन्वयातून आवश्यक उपाययोजना करण्यात येणार आहेत. पावसाळ्याच्या संपूर्ण कालावधीत नालेस्‍वच्‍छता कामांवर सातत्याने देखरेख ठेवली जाईल आणि नागरिकांना कोणतीही अडचण भासल्यास तातडीने त्यावर कार्यवाही केली जाईल, असेही उपमहापौर संजय घाडी यांनी स्पष्ट केले.



मुंबईचे उप महापौर संजय घाडी यांनी बुधवारी ३ जून २०२६ रोजी कुर्ला (पूर्व) परिसरातील लोकमान्य टिळक टर्मिनस नाला, नेहरू नगर नाला, शिवसृष्टी नाला आणि राहुल नगर नाला येथे सुरू असलेल्या नालेस्‍वच्‍छता कामांची पाहणी केली. या पाहणी दौऱ्यात स्थानिक आमदार मंगेश कुडाळकर, परिमंडळ ५ च्या उप आयुक्त संध्या नांदेडकर, ‘एल’ विभागाचे सहायक आयुक्त धनाजी हेर्लेकर तसेच संबंधित अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.



उप महापौर घाडी म्हणाले की, नालेसफाईची कामे नियोजनबद्ध पद्धतीने सुरू असून पहिल्या टप्प्यातील कामे समाधानकारकरित्या पूर्ण करण्यात आली आहेत. नाल्यांमध्ये वारंवार साचणारा तरंगता कचरा आणि गाळ नियमितपणे हटविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नाल्यांची स्वच्छता आणि पाण्याचा प्रवाह कायम राखण्यासाठी महानगरपालिका प्रशासन सातत्याने कार्यरत आहे.



पाहणीदरम्यान उप महापौरांनी संबंधित अधिकाऱ्यांना नाल्यांमधील गाळ व कचरा वेळेत उचलण्याच्या, पाण्याचा प्रवाह सुरळीत राखण्याच्या तसेच आवश्यक ठिकाणी अतिरिक्त स्वच्छता मोहीम राबवावी. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व ‘मॅनहोल’ सुरक्षितरीत्या बंद ठेवण्यावर भर द्यावा, अशा विविध सूचना केल्या.


स्थानिक आमदार मंगेश कुडाळकर यांनी प्रशासनाच्या समन्वयातून नाले स्‍वच्‍छतेची कामे अधिक गतीने पूर्ण करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येत असल्याचे सांगितले.उप महापौर घाडी यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या सूचना जाणून घेतल्या तसेच नाल्यांमध्ये कचरा टाकू नये, असे आवाहन केले. स्वच्छ आणि जलभरावमुक्त मुंबईसाठी प्रशासन आणि नागरिकांनी संयुक्तपणे प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे शेवटी त्यांनी नमूद केले.

Comments
Add Comment

Nitesh Rane : अंडी फेकली, पण लक्षात ठेवा ईद आणि मोहरमही येतोय, पुढे कसा कार्यक्रम...माझगावमधील घटनेनंतर मंत्री नितेश राणे आक्रमक, दिला कडक इशारा

मुंबई : मुंबईत गणेशोत्सवाचा उत्साह सुरू असतानाच, माझगाव परिसरातील 'माझगाव मोरया' (Mazgoan Morya) गणपतीच्या आगमन

Vikroli Women Suicide : विक्रोळीत वृध्द महिलेचा इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारण्याचा प्रयत्न; पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचला जीव

मुंबई : मुंबईतील विक्रोळी परिसरात इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या 65 वर्षीय

Vile Parle Crime : मुंबईतील संतापजनक घटना! द्रोणाचार्य पुरस्कार विजेत्या शिक्षकाने 16 वर्षीय विद्यार्थींनीला बोलावून घेतलं अन्...

मुंबई : मुंबईतील विलेपार्ले परिसरात द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित 48 वर्षीय जिम्नॅस्टिक्स

Bhuleshwar Cha Raja : 'ऐकलं असतं तर ही वेळ आली नसती...' भुलेश्वरचा राजा प्रकरणात चक्रावून टाकणारा खुलासा

मुंबई : मुंबईतील गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी भुलेश्वर परिसरात काळीज पिळवटून टाकणारी दुर्घटना घडली.

Mumbai News : मुंबईत 11व्या मजल्यावरून पडून AC तंत्रज्ञाचा मृत्यू; पर्यवेक्षक आणि कंत्राटदार ताब्यात

मुंबई: मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलातील (BKC) टेन बीकेसी कॉम्प्लेक्समध्ये एसी युनिट बसवताना 11व्या मजल्यावरून

CM Devendra Fadnavis : धर्मादाय संस्था आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष यांच्यात सामजंस्य करार करणार

मुंबई : राज्यभरातील मोठ्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांची सोय व्हावी