OBC Protest : १२ जूनला ओबीसींचे राज्यव्यापी आंदोलन

मुंबई : ओबीसींच्या विविध मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत 'ओबीसी जनमोर्चा'चे अध्यक्ष आणि माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी १२ जून रोजी राज्यव्यापी आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. सरकारने ओबीसी समाजाच्या मागण्यांवर तात्काळ सकारात्मक निर्णय न घेतल्यास हे आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असा इशारा शेंडगे यांनी दिला आहे.



प्रकाश शेंडगे यांनी सांगितले की, मराठा आरक्षणाबाबत सरकार घेत असलेल्या काही निर्णयामांमुळे ओबीसींच्या हक्कांवर गदा येत असल्याची भावना समाजात निर्माण झाली आहे. सगेसोयऱ्यांच्या अध्यादेशाची अंमलबजावणी झाल्यास ओबीसींचे मोठे नुकसान होईल. केवळ राजकीय फायद्यासाठी बहुसंख्य ओबीसी समाजाला गृहीत धरले जात असून, आपल्या हक्काचे आरक्षण टिकवण्यासाठी राज्यातील सर्व ओबीसी घटकांनी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. १२ जून रोजी होणारे हे आंदोलन राज्यातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका पातळीवर शांततापूर्ण पण प्रभावी मार्गाने केले जाणार असून, याद्वारे सरकारला ओबीसींची ताकद दाखवून दिली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.


या राज्यव्यापी आंदोलनाच्या माध्यमातून ओबीसी जनमोर्चाने सरकारसमोर काही प्रमुख मागण्या ठेवल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने ओबीसी प्रवर्गाची जातनिहाय जनगणना करण्यात यावी, तसेच मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गातून आरक्षण द्यावे परंतु ओबीसींच्या कोट्याला कोणताही धक्का लावू नये, या मागण्यांचा समावेश आहे. याशिवाय, कुणबी प्रमाणपत्रांच्या संशयास्पद वाटपाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशीही मागणी शेंडगे यांनी केली आहे.

Comments
Add Comment

Nitesh Rane : ही महादेवाची भूमी, इथे आय लव्ह महादेवच चालणार; मंत्री नितेश राणेंची गर्जना

मुंबई : ही महादेवाची भूमी, इथे आय लव्ह महादेवच चालणार; अशी गर्जना मंत्री नितेश राणे यांनी केली. ते हिंदू रक्षक

CM Devendra Fadnavis : 'भारताचे संविधान आणि लोकशाही प्रत्येक व्यक्तीला मोठी संधी देऊ शकते'

नागपूर : तरुणांना मुख्यमंत्री किंवा

Nagpur News : महाराष्ट्राची परंपरा लाभलेल्या ढोल ताशाला जागतिक नामांकन

नागपूर : शिक्षण कौशल्य, क्रीडा स्टार्टअप आदी क्षेत्रात युवा पिढीचा सकारात्मक सहभाग आहे. त्यांचा हा सहभाग

Dog Attack : दोन वर्षांच्या चिमुकलीवर भटक्या कुत्र्याचा जीवघेणा हल्ला

बीड : बीड शहरातील शिवतेज नगर भागात रेणू हॉस्पिटल परिसरात घराबाहेर खेळत असलेल्या दोन वर्षांच्या चिमुकलीवर मोकाट

Piyush Goyal : मंत्री पीयूष गोयल सोमवारपासून चार दिवसांच्या जपान दौऱ्यावर

नवी दिल्ली : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल, 24 ते 27 ऑगस्ट 2026 या कालावधीत जपानला भेट देणार आहेत. या

CM Devendra Fadnavis : धर्मादाय संस्था आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष यांच्यात सामजंस्य करार करणार

मुंबई : राज्यभरातील मोठ्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांची सोय व्हावी