संतापजनक! अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी अन् सलग १० महिने अत्याचार; महाविद्यालयीन तरुणीची तक्रार, चार आरोपी अटकेत







कोल्हापूर (Kolhapur Crime) जिल्ह्यात एका १९ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीवर झालेल्या कथित लैंगिक (Molest) अत्याचाराच्या प्रकरणाने खळबळ उडाली आहे. पीडित मुलीचे अश्लिल फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत चार मित्रांनी १० महिन्यांपर्यंत तिचा छळ केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी मुरगुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीची ओळख मुख्य आरोपीशी एका कामाच्या निमित्ताने झाली होती. ओळख वाढल्यानंतर आरोपीने तिला ओळखपत्र तयार करून देण्याचे कारण सांगत भेटीस बोलावले. त्यानंतर तिचे काही फोटो काढून ते सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे.

या प्रकरणानंतर मुख्य आरोपीने आपल्या इतर तीन मित्रांची ओळख करून दिली. त्यानंतर पीडित मुलीला धमकावून विविध ठिकाणी नेण्यात आले. फोटो आणि व्हिडिओ सार्वजनिक करण्याची भीती दाखवत तिच्यावर वारंवार अत्याचार करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

पीडितेच्या म्हणण्यानुसार, आरोपींनी वेगवेगळ्या ठिकाणी तिला बोलावून मानसिक दबाव टाकला. तसेच तिच्याविरोधात आक्षेपार्ह माहिती पसरवण्याची धमकी देत तिचे शोषण सुरू ठेवले. अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या या प्रकारामुळे ती मानसिक तणावाखाली होती.

अखेर आरोपींच्या सततच्या त्रासाला कंटाळून तरुणीने पोलिसांकडे धाव घेतली. आदित्य बाजीराव शेटके (वय २४, रा. खिंडी व्हरवडे, ता. राधानगरी), रणजित संभाजी मुधोळकर (वय २१, रा. सोळांकुर, ता. राधानगरी) प्रणवगिरी चंद्रशेखर पालकर (वय २४, रा. राधानगरी) आणि विक्रम रामचंद्र पाटील (वय २२, रा. बुजवाडे, ता. राधानगरी) अशी आरोपींची ओळख समोर आली आहे. तक्रार मिळताच पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आणि चारही संशयितांना ताब्यात घेतले. न्यायालयाने आरोपींना पोलीस कोठडी सुनावली असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जात असून महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पोलिसांनी नागरिकांना अशा प्रकारच्या धमक्या किंवा छळ झाल्यास त्वरित तक्रार करण्याचे आवाहन केले आहे.








Comments
Add Comment

MPSC कडून राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2026 साठी अर्ज भरण्यास मुदतवाढ; उमेदवारांना मोठा दिलासा

अर्ज आणि शुल्क भरण्यासाठी मिळाली नवी मुदत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व

Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या;सर्वसामान्यांसाठी मोठी घरांची लॉटरी लवकर जाहीर करा - उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

म्हाडाच्या लॉटरीत प्रतिसाद न मिळणाऱ्या घरांची 'फर्स्ट कम, फर्स्ट सर्व्ह' तत्त्वावर विक्री करा;पुणे, शिरूर,

Shetkari Karjmafi update : कर्जमाफी योजनेत १ लाख ४० हजार शेतकरी अपात्र; प्राप्तिकर आणि अन्य कारणांनी वगळल्याची सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

१६ लाख ९६ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात दोन दिवसांत निधी जमा होणार मुंबई : राज्य सरकारने घोषित केलेल्या 'पुण्यश्लोक

Tuljabhavani Temple Land Case : तुळजाभवानीच्या १,६६८ हेक्टर जमिनींच्या कथित घोटाळ्यावर समिती आक्रमक; 'तातडीने ताबा घ्या, नाहीतर कोर्टात भेटू!'

पुणे : श्री तुळजाभवानी देवस्थानच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील

Devendra Fadnavis : गतिमान भूसंपादन करून औद्योगिक विकासाला चालना द्यावी

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; मुख्यमंत्र्यांनी घेतला एमआयडीसीअंतर्गत प्रकल्पांच्या भूसंपादनाचा आढावा मुंबई

Road Accident : घाटात मोठा अपघात, ब्रेक फेल झाला आणि ट्रकने SUV चिरडली; तीन वाहनांचे प्रचंड नुकसान

गडचिरोली : कोरची - कुरखेडा राष्ट्रीय महामार्गावर बेडगाव घाटात बुधवारी (५ ऑगस्ट २०२६) सकाळी साडेअकराच्या सुमारास