Borivali Bribery Case: दंड कमी करण्यासाठी ५ हजारांची लाच मागितली; आरटीओ कर्मचाऱ्याला ACB ने रंगेहात पकडलं

मुंबईतील बोरिवली (Boriwali) प्रादेशिक परिवहन कार्यालयातील एका कर्मचाऱ्याला लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) अटक (Arrest) केली आहे. दंडाची रक्कम कमी करून देण्याच्या मोबदल्यात लाच मागितल्याचा आरोप संबंधित कर्मचाऱ्यावर आहे. या कारवाईमुळे परिवहन विभागात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या खासगी बसवर वाहतूक नियमांचे उल्लंघन झाल्याप्रकरणी २६,५०० रुपयांचा दंड आकारण्यात आला होता. दंडाची रक्कम कमी करण्यासाठी तक्रारदाराने बोरिवली येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयात संपर्क साधला होता. कनिष्ठ लिपिक मिथुन विलास आडे असं लाच घेतलेल्या लिपिकाचे नाव आहे.

यावेळी कनिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याने दंड कमी करून देण्यासाठी ५,००० रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे. तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.



तक्रार प्राप्त झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने प्राथमिक पडताळणी केली. चौकशीत संबंधित कर्मचाऱ्याने लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर सापळा रचण्यात आला. यावेळी आरोपीने ५ हजार रुपयांपैकी ४ हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शवली होती.

सोमवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कारवाई करत संबंधित कर्मचाऱ्याला ४ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. त्यानंतर त्याच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला.

या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून सरकारी कामासाठी कोणत्याही प्रकारची लाच मागितल्यास नागरिकांनी तत्काळ तक्रार करण्याचे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केले आहे. ही कारवाई प्रशासनातील भ्रष्टाचाराविरोधातील आणखी एक महत्त्वाचे पाऊल मानली जात आहे.
Comments
Add Comment

Arun Datte : गुरुत्वाकर्षणालाही चकवणारी कला!

मूर्तिकार अरुण दत्ते या वर्षी काय नवा 'बॅलन्स' साधणार ? मुंबई : गणेशोत्सवाचे वेध सर्वत्र लागले असून यंदाच्या

Makarand Jadhav-Patil : नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना ८६.६५ कोटींची मदत; मंत्री मकरंद जाधव-पाटील

नाशिक विभागातील नाशिक, अहिल्यानगर व जळगाव जिल्ह्यांसाठी शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई : “खरीप २०२५ मध्ये

Hasan Mushrif : किडनी, यकृत प्रत्यारोपणाच्या सुविधा शासकीय रुग्णालयांत वाढविण्यावर भर द्या; वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

मुंबई : राज्यातील गरजू रुग्णांना किडनी व यकृत प्रत्यारोपणाची सुविधा शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून

Bharat Gogawale : ‘व्हीबी जी राम जी’ योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कामांना गती द्या; मंत्री भरत गोगावले

मुंबई : ‘व्हीबी जी राम जी’ योजनेच्या माध्यमातून राज्यातील गरजू नागरिकांना अधिकाधिक रोजगार उपलब्ध करून

Arrested for throwing eggs : माझगावच्या मोरया गणपतीच्या मिरवणुकीवर अंडी फेकल्याप्रकरणी दानिश शेर खानला अटक, भायखळा पोलिसांची कारवाई

Mumbai : २३ ऑगस्ट रोजी माझगावच्या मोरया गणपती मंडळाच्या मिरवणुकीत अंडी फेकल्याच्या आरोपानंतर मुंबईच्या भायखळा

Mantralay : मंत्री कार्यालयातील ‘उसनवारी’ आणि ‘मौखिक’ नेमणुका रद्द, १० सप्टेंबरपर्यंत मूळ विभागात परतावे लागणार; मुख्य सचिवांचे आदेश

मुंबई : विहित नियम आणि कायदेशीर प्रक्रिया डावलून मंत्रालयीन विभागांत तसेच मंत्र्यांच्या कार्यालयांत बाह्य