Participate Mumbai : नागरिकांचा सहभाग वाढवण्यासाठी महापालिकेचा 'पार्टीसिपेट मुंबई' उपक्रम

स्वयंसेवी संस्था, स्थानिक गट, कार्पोरेट कंपन्यांचा सहभागाने मुंबईचा विकासासाठी डिजिटल व्यासपीठ


मुंबई : मुंबई महापालिकेच्यावतीने हाती घेण्यात येणाऱ्या विविध योजना आणि विकास कामे आता खासगी संस्थांच्या माध्यमातून तसेच सीएसआर निधीतून करण्यावर भर देणार आहे. यासाठी आता नागरिकांना सक्रियपणे सहभाग नोंदवता यावा यसाठी पार्टीसिपेट मुंबई (Participate Mumbai) या उपक्रमाची संकल्पना साकारली जात आहे. या संकल्पनेनुसार मुंबईतील नागरी स्वयंसेवी संस्था, स्थानिक गट आणि कार्पोरेट क्षेत्र यांना एक आणणारे एक व्यापक, एकात्मिक आणि उद्देशपूर्ण डिजिटल (Digital) व्यासपीठ विकसित करण्यात येत आहे.


समाजकल्याणासाठी योगदान देण्याची तयारी असलेल्या अनेक व्यक्तींना शहरातील नेमक्या कोणत्या समस्या तातडीच्या आहेत, त्यात आपण कशा प्रकारे सहभागी होऊ शकतो किंवा आपल्या कौशल्ये, वेळ व संसाधनांचा योग्य वापर कसा करावा, याबाबत सुस्पष्ट दिशा उपलब्ध नसते. या पार्श्वभूमीवर, पार्टिसिपेट मुंबई नागरिकांना त्यांच्या आवडी, कौशल्ये आणि उपलब्धतेनुसार विविध सामाजिक उपक्रमांमध्ये - जसे की स्वच्छता मोहिमा, वृक्षारोपण, आरोग्य शिबिरे, शिक्षण सहाय्य, जनजागृती उपक्रम इत्यादी सहभाग नोंदविण्याची सुलभसंधी उपलब्ध करून देईल. हे व्यासपीठ केवळ स्वयंसेवा पुरते मर्यादित न राहता, सामाजिक योगदान उपक्रम, आवश्यक वस्तूंचे संकलन, तसेच महत्त्वाच्या सामाजिक विषयांवर जनजागृती मोहिमा राबविण्यासाठीही एक प्रभावी माध्यम ठरेल.



एकाच डिजिटल प्लॅटफॉर्मवर सर्व उपक्रम, गरजा, स्वयंसेवक (Volunteers) आणि प्रगती यांची माहिती उपलब्ध होईल, ज्यामुळे प्रक्रियेतील गुंतागुंत कमी होऊन सर्व घटकांमध्ये विश्वास निर्माण होईल. रिअल-टाइम मॉनिटरिंग व अहवाल प्रणालीमुळे नागरिक व दाते त्यांच्या योगदानाचा प्रत्यक्ष परिणाम पाहू शकतील,


संबंधित विभाग आपल्या गरजा, प्रकल्प प्रस्ताव व आवश्यकतेचे तपशील पार्टिसिपेट मुंबई च्या अधिकृत ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर (Online Platform) अपलोड (Upload) करतील, ज्यामुळे ही माहिती सर्व नागरिक, स्वयंसेवी गट व सीएसआर (CSR) उपक्रमाच्या अंतर्गत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या कॉर्पोरेट संस्थांना सहजपणे उपलब्ध होईल. त्यानंतर इच्छुक स्वयंसेवक गट किंवा कॉर्पोरेट संस्था संबंधित प्रकल्पांमध्ये सहभागासाठी आपली स्वारस्य नोंदवतील.



उपक्रमासाठी महापालिकेच्यावतीने कामकाज करण्याकरता तांत्रिक सल्लागार म्हणून तांत्रिक व्यवस्थापन सल्लागार म्हणून अर्नस्ट अँड यंग एलएलपी या संस्थेची नेमणूक करण्यात येणार आहे.

Comments
Add Comment

FYJC : अकरावी प्रवेशासाठी मंगळवार ४ ऑगस्टपासून विशेष फेरी

मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठीच्या इयत्ता अकरावी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत आतापर्यंत १५ लाखांहून

Devendra Fadnavis : राष्ट्रीय स्तरावर शालेय शिक्षणात महाराष्ट्राचे महत्त्वपूर्ण स्थान; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्यातील शालेय शिक्षण क्षेत्रात अभिनव उपक्रमांची अंमलबजावणी https://prahaar.in/2026/08/03/promotion-for-18-officers-of-the-legislature-secretariat/ शालेय

Mumbai Metro : मेट्रो -६ प्रकल्पाचे ८८ टक्के काम पूर्ण, कारशेडचा प्रश्न कायम

मुंबई : स्वामी समर्थ नगर-जोगेश्वरी-विक्रोळी मेट्रो-६चे काम अंतिम टप्प्यात पोहोचले असले तरी कांजुरमार्ग कारशेडचा

Sumantrao Pendharkar : 'विको'ला जागतिक ओळख देणारे उद्योगरत्न सुमंतराव पेंढरकर यांचे निधन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई : प्रसिद्ध आयुर्वेदिक उत्पादन कंपनी 'विको लॅबोरेटरीज'ला जागतिक स्तरावर ओळख मिळवून देणारे उद्योगपती आणि

Maharashtra Vidhan Bhavan : विधान मंडळ सचिवालयातील १८ अधिकाऱ्यांना पदोन्नती

मुंबई : महाराष्ट्र विधान मंडळ सचिवालयातील उपसचिव, अवर सचिव, अवर सचिव (समिती) आणि कक्ष अधिकारी अशा एकूण १८ पदांवर

Mohan Bhagwat : सरसंघचालक मुंबईत साधणार 'जेन-झीं'शी संवाद

मुंबई : देशातील तरुण पिढी सध्या लोकशाही, नेतृत्व आणि राष्ट्रउभारणीसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर सक्रियपणे