Chief Minister Devendra Fadnavis : ॲग्रीगेटर सहकारी टॅक्सी सेवांसाठी नियमावली तयार करावी

टॅक्सी चालकांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य प्राप्त होणार


मुंबई,  महाराष्ट्रात ऑनलाइन ॲप आधारित ॲग्रीगेटर सहकारी टॅक्सी सेवेबाबत परिवहन विभागामार्फत तातडीने नियमावली तयार करून या सेवेस परवानगी देण्यात येईल. ॲग्रीगेटर सहकारी टॅक्सीमुळे लाखो चालकांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य, सामाजिक सुरक्षा निर्माण होण्यास मदत होईल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.



सहकार टॅक्सी को.ऑपरेटिव्ह लिमिटेडची (भारत टॅक्सी) सेवा सुरु करण्यासंदर्भात मंत्रालयात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार रवींद्र चव्हाण, आमदार प्रसाद लाड, आमदार प्रवीण दरेकर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार रणधीर सावरकर, परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर, भारत टॅक्सीचे कर्नल हिमांशू, अदानी एअरपोर्ट चे कार्यकारी संचालक जीत अदानी, मुख्य अधिकारी बी व्ही.सी. के. शर्मा, एस. टी.सी.एल. संचालक अर्चना सिंग, वाहतूक संस्थेचे रुपेश धुमाळ आणि विविध विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ॲग्रीगेटर टॅक्सीमुळे चालकांच्या जीवनात परिवर्तन घडेल आणि नागरिकांना दर्जेदार सेवेचा लाभ मिळेल. या टॅक्सी सेवा राज्यातील छोट्या शहरात सुरु करण्यात येणार आहे .



परिवहन मंत्री सरनाईक म्हणाले की, राज्यात यापूर्वी ऑनलाइन ॲप आधारित ॲग्रीगेटर टॅक्सी सेवा खासगी कंपन्यांकडून दिली जात आहे. सध्या या ॲग्रिगेटर आधारित टॅक्सी सेवांमध्ये चालकांना सामाजिक सुरक्षेच्या अभावासारख्या विविध समस्यांना सामोरे जावे लागते. तसेच नागरिक व प्रवाशांनादेखील विविध अडचणी व समस्या येतात. या पार्श्वभूमीवर चालकांना कामगारांमधून मालकांमध्ये रूपांतरित करण्याचे आणि त्यांना सहकाराच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे ध्येय यामागे आहे. राज्य परिवहन महामंडळ देखील ‘छावा’ या नावाने ॲप विकसित करीत आहे.


आमदार प्रवीण दरेकर यांनी यावेळी देवदत्त सहकारी वाहतूक व पर्यटन संस्थेंच्या माध्यमातून सुरू करावयाच्या सेवेबाबत माहिती दिली.


सहकार भारत टॅक्सी को. ऑपरेटिव्ह लिमिटेडचे कर्नल हिमांशू यांनी सादरीकरणाद्वारे भारत टॅक्सी सेवेबाबत माहिती दिली, ते म्हणाले. मुंबई येथे भारत टॅक्सीची सुरुवात केली जाणार असून या पाठोपाठ पुणे आणि नागपूर येथेदेखील ही सेवा पोहोचवली जाईल.



भारत टॅक्सी सेवा
देशातील सुमारे २ कोटी व्यावसायिक चालकांचे आर्थिक, सामाजिक आणि व्यावसायिक सक्षमीकरण करण्याच्या उद्देशाने केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्या निर्देशानुसार 'सहकार टॅक्सी को.ऑपरेटिव्ह लिमिटेड' (भारत टॅक्सी) ही महत्त्वाकांक्षी संकल्पना प्रत्यक्षात पुढे आली आहे.


या उपक्रमामुळे चालकांना केवळ रोजगार नव्हे, तर मालकी हक्क, सामाजिक सुरक्षा आणि न्याय्य उत्पन्नाची संधी उपलब्ध होणार आहे.


‘भारत टॅक्सी’ च्या माध्यमातून चालकांना कुटुंब, आरोग्य व अपघात विमा संरक्षण मिळणार आहे. तसेच प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजनेअंतर्गत कमी व्याजदराने (सुमारे ९.५ टक्के) कर्ज उपलब्ध होणार आहे. प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (पीएमजेएवाय, आयुष्मान भारत योजनेचा लाभही चालक व त्यांच्या कुटुंबियांना मिळणार आहे.

Comments
Add Comment

Weather Update : महाराष्ट्रात सोमवारी कोण कोणत्या भागात पावसाची शक्यता ?

मुंबई : हवामान खात्याच्या अंदाजानुसार सोमवार २४ ऑगस्ट २०२६ रोजी महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे.

Indian Railway : भारतीय रेल्वेचा नवा विक्रम; पहिल्या डबल-स्टॅक लाँग-हॉल कंटेनर ट्रेनची यशस्वी धाव

मुंबई : भारतीय रेल्वेने मालवाहतुकीच्या क्षेत्रात महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. जवाहरलाल नेहरू पोर्ट (JNPT) येथून

CM Devendra Fadnavis : मुंबईत ‘भुलेश्वरचा राजा’च्या आगमन मिरवणुकीत घडलेल्या दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री फडणवीसांनी केला शोक व्यक्त

मुंबई : मुंबईतील भुलेश्वर परिसरात ‘भुलेश्वरचा राजा’ गणेशमूर्तीच्या आगमन मिरवणुकीदरम्यान शनिवारी (दि. २२ ऑगस्ट)

Mumbai-Ahmedabad Bullet Train : भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेनसाठी १६ चालकांची नियुक्ती; जपानमध्ये वर्षभर विशेष प्रशिक्षण

मुंबई : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या संचालनासाठी मनुष्यबळाची तयारी वेगाने सुरू झाली आहे. नॅशनल

Eknath Shinde : महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेत परिवर्तनासाठी ‘मिशन मोड’वर काम करा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे शिक्षण विभागाला निर्देश

मुंबई : महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्थेत प्रत्यक्ष आणि गुणवत्तापूर्ण बदल घडवून आणण्यासाठी शिक्षण विभागाने

BMC Students ISRO Visit : मुंबई महापालिका शाळांमधील गुणवंत विद्यार्थ्यांना ISRO, सिंगापूर किंवा जपानचा अभ्यास दौरा; आमदार अमित साटम यांची मागणी

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील गुणवंत विद्यार्थ्यांना विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि