Nashik : दीक्षांत सोहळ्यात प्रेमाचे रंग, वैमानिकाचे हेलिकॉप्टर पुढे भन्नाट प्रपोज

Nashik : प्रेम म्हटलं की प्रपोज करणं आलं. पण प्रपोज करण्याची पद्धत आगळीवेगळी असेल तर चर्चा होतेच. नाशिक येथील 'कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूल'मध्ये ('Combat Army Aviation Training School') असाच काहीसा अनुभव आला. आज नाशिकमध्ये (Nashik) 'कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूल'मध्ये दीक्षांत संचलन सोहळा दिमाखात पार पडला. या सोहळ्यात अनेक तरुण जवानांनी आपले अत्यंत खडतर आणि कठोर असे लष्करी वैमानिकाचे प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले आणि ते देशसेवेसाठी आता सज्ज झाले आहेत.



दीक्षांत सोहळ्यात प्रेमाचे रंग


औपचारिक दीक्षांत सोहळा संपल्यानंतर यावेळी तिथे उपस्थित असलेल्या अधिकारी, कुटुंबीय आणि मित्रमंडळींना एक अत्यंत अनपेक्षित आणि कमालीचा भावनिक प्रसंग पाहायला मिळाला. आणि याच सोहळ्यात घडलेल्या एका प्रसंगाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी ट्रेनिंग पूर्ण करून वैमानिक म्हणून नव्या जबाबदारीसाठी सज्ज झालेल्या 'भारत भारद्वाज' (Bharat Bhardwaj) यांनी चक्क सर्व उपस्थितांसमोर आपल्या प्रेयसीला म्हणजेच 'आरुषी'ला प्रपोज करत लग्नाची मागणी घातली. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.



ज्या मैदानावर भारत यांनी वैमानिक होण्याचे आपले स्वप्न पूर्ण केले, त्याच ठिकाणी दीक्षांत सोहळा संपल्यानंतर उभ्या असलेल्या एका भव्य हेलिकॉप्टरसमोर जात हा प्रपोजलचा अनोखा प्लॅन करण्यात आला होता. भारत यांनी अत्यंत फिल्मी पण तितक्याच सन्मानजनक पद्धतीने हेलिकॉप्टरसमोर गुडघ्यावर बसून आरुषीला अंगठी घातली आणि आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी उपस्थितांनीही टाळ्या वाजवत दोघांचे कौतुक केले.



घरात पत्नीच खरी बॉस


हा क्षण तिथे असलेल्या भारतच्या मित्रांनी कॅमेऱ्यात कैद केला. सध्या हा व्हिडीओ सगळीकडे व्हायरल होत आहे. या अनपेक्षित क्षणाने उपस्थित अधिकारी, भारतचे कुटुंबीय आणि मित्रमंडळी भारावून गेले. आरुषीनेही सर्वांसमोर हा प्रस्ताव स्वीकारला. त्यानंतर सर्वांनी त्यांचे अभिनंदन केले. दोघांनी सर्वांचे अभिनंदन स्विकारले. ऑफिसमध्ये अधिकारी म्हणून रोज सॅल्युट मिळतो,करावा ही लागतो, पण घरात पत्नीच खरी बॉस असते असं यावेळी भारतने आवर्जून सांगितलं.


विशेष म्हणजे आपल्यासाठी असे काही खास सरप्राईज असेल याची मुळीच कल्पना नव्हती असं आरुषीने बोलताना सांगितलं. आपण या प्रपोजमुळे भारवून गेले शिवाय खूप खूष असल्याचं ही त्यांनी यावेळी सांगितलं. भारतसाठी आजचा दिवस खास होता. देशसेवेच्या शपथेसोबतच प्रेमाचीही नवी सुरुवात करणारा हा क्षण सर्वांसाठी कधी ही न विसरणाराच ठरला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

Comments
Add Comment

Nitesh Rane : ही महादेवाची भूमी, इथे आय लव्ह महादेवच चालणार; मंत्री नितेश राणेंची गर्जना

मुंबई : ही महादेवाची भूमी, इथे आय लव्ह महादेवच चालणार; अशी गर्जना मंत्री नितेश राणे यांनी केली. ते हिंदू रक्षक

CM Devendra Fadnavis : 'भारताचे संविधान आणि लोकशाही प्रत्येक व्यक्तीला मोठी संधी देऊ शकते'

नागपूर : तरुणांना मुख्यमंत्री किंवा

Nagpur News : महाराष्ट्राची परंपरा लाभलेल्या ढोल ताशाला जागतिक नामांकन

नागपूर : शिक्षण कौशल्य, क्रीडा स्टार्टअप आदी क्षेत्रात युवा पिढीचा सकारात्मक सहभाग आहे. त्यांचा हा सहभाग

Dog Attack : दोन वर्षांच्या चिमुकलीवर भटक्या कुत्र्याचा जीवघेणा हल्ला

बीड : बीड शहरातील शिवतेज नगर भागात रेणू हॉस्पिटल परिसरात घराबाहेर खेळत असलेल्या दोन वर्षांच्या चिमुकलीवर मोकाट

Piyush Goyal : मंत्री पीयूष गोयल सोमवारपासून चार दिवसांच्या जपान दौऱ्यावर

नवी दिल्ली : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल, 24 ते 27 ऑगस्ट 2026 या कालावधीत जपानला भेट देणार आहेत. या

CM Devendra Fadnavis : धर्मादाय संस्था आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष यांच्यात सामजंस्य करार करणार

मुंबई : राज्यभरातील मोठ्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांची सोय व्हावी