Monsoon Fashion Tips : मान्सूनमध्ये स्टायलिश दिसायचंय? मग 'हे' फॅब्रिक्स नक्की ट्राय करा

पावसाळा (Rainy Season) सुरू झाला की ऑफिसला जाणाऱ्या अनेकांसमोर एक सामान्य प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे कोणते कपडे घालावेत? पाऊस, ओलावा आणि दमट वातावरणामुळे कपड्यांची योग्य निवड करणे महत्त्वाचे ठरते. चुकीच्या फॅब्रिकचे कपडे परिधान केल्यास दिवसभर अस्वस्थ वाटू शकते. त्यामुळे पावसाळ्यात आरामदायी आणि लवकर सुकणाऱ्या कपड्यांना प्राधान्य देणे गरजेचे आहे. (Monsoon Fashion Tips)

शिफॉन फॅब्रिक - पावसाळ्यात शिफॉन फॅब्रिकचे कपडे हा चांगला पर्याय मानला जातो. हे कपडे वजनाने हलके असतात आणि भिजल्यानंतरही लवकर सुकतात. त्यामुळे ऑफिसला जाणाऱ्या महिलांसाठी शिफॉन ड्रेस किंवा टॉप्स तसेच पॅन्ट उपयुक्त ठरू शकतात. यामुळे दिवसभर फ्रेश वाटण्यास मदत होते.

सुती कपडे - सुती कपडे देखील अनेकांच्या पसंतीचे असतात. कॉटन फॅब्रिक त्वचेला आरामदायी वाटते. मात्र, खूप जाड सुती कपड्यांऐवजी हलक्या प्रकारच्या कॉटन कपड्यांची निवड केल्यास अधिक सोयीचे ठरते.

नायलॉन फॅब्रिक - नायलॉन फॅब्रिकचे कपडेही पावसाळ्यासाठी उत्तम पर्याय आहेत. हे कपडे पावसाच्या पाण्यामुळे जास्त जड होत नाहीत आणि इतर फॅब्रिकच्या तुलनेत लवकर कोरडे होतात. त्यामुळे रोज प्रवास करणाऱ्यांसाठी नायलॉनचे कपडे उपयुक्त ठरू शकतात.

याशिवाय पावसाळ्यात अतिशय घट्ट कपडे परिधान करणे टाळावे. कपडे ओले झाल्यानंतर ते शरीराला चिकटतात आणि त्यामुळे अस्वस्थता निर्माण होऊ शकते. तसेच संपूर्ण लूकवरही त्याचा परिणाम होतो. सैलसर आणि आरामदायी कपडे निवडल्यास तुम्ही अधिक आत्मविश्वासाने वावरू शकता.

पावसाळ्यात योग्य फॅब्रिक आणि आरामदायी कपड्यांची निवड केल्यास ऑफिसमधील दिवस अधिक सुखकर आणि ताजेतवाने जाऊ शकतो.

 
Comments
Add Comment

Vaidyanath Temple : वैद्यनाथ मंदिर परिसरात दुसऱ्या श्रावणी सोमवरासाठी चोख बंदोबस्त

बीड : पवित्र श्रावण महिना सुरू असून, बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री वैद्यनाथ

Karn Sharma : कर्ण शर्माची क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेटपटू कर्ण शर्माने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केली आहे. यूपी टी२० लीग

Mahakumbh Mela 2027 : सिंहस्थ महाकुंभमेळा २०२७ची तयारी वेगात; साधुग्राम व्यवस्था अधिक सक्षम

नाशिक : सिंहस्थ महाकुंभमेळा २०२७च्या पार्श्वभूमीवर नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाने साधुग्राम आणि

Nashik Crime News : भोंदू खंडागळेला चार दिवसांची पोलिस कोठडी; पीडित महिलेच्या पुनर्वसनासाठी नाशिककर सरसावले

नाशिक : गुजरातच्या वलसाड येथील महिलेला फसवून तिच्याकडून ७७ हजार रुपये उकळल्याप्रकरणी नाशिकच्या फुलेनगर येथील

Indian Railway : भारतीय रेल्वेचा नवा विक्रम; पहिल्या डबल-स्टॅक लाँग-हॉल कंटेनर ट्रेनची यशस्वी धाव

मुंबई : भारतीय रेल्वेने मालवाहतुकीच्या क्षेत्रात महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. जवाहरलाल नेहरू पोर्ट (JNPT) येथून

World Vada Pav Day 2026 : मुंबईच्या रस्त्यांपासून जगभरात पोहोचलेला वडापाव; जाणून घ्या या ‘देसी बर्गर’ची खासियत!

मुंबई : मुंबई म्हटलं की डोळ्यासमोर येणाऱ्या अनेक गोष्टींपैकी एक म्हणजे वडापाव! मुंबईच्या गजबजलेल्या