Harshvardhan Sapkal : हर्षवर्धन सपकाळांविरोधात काँग्रेसमध्ये बंडाचा झेंडा, प्रदेशाध्यक्ष बदलण्यासाठी नाराज गट दिल्लीला जाणार

मुंबई : राज्यात विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच, दुसरीकडे महाराष्ट्र काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद आणि असंतोष चव्हाट्यावर आला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असलेल्या पक्षांतर्गत विरोधकांनी आता त्यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेत मोट बांधण्यास सुरुवात केली आहे. सपकाळ यांच्या निर्णय प्रक्रियेला आणि एकतर्फी कारभाराला कंटाळलेला हा नाराजांचा गट आता दिल्ली दरबारी पोहोचणार असून, येत्या ८ जून रोजी काँग्रेस हायकमांडची भेट घेऊन प्रदेशाध्यक्ष बदलण्याची मागणी लावून धरणार असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांकडून मिळत आहे.


प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या कार्यपद्धतीविषयी तीव्र आक्षेप असलेला हा नाराज गट ८ जून रोजी नवी दिल्लीत दाखल होणार आहे. तिथे ते काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लीकार्जून खर्गे, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि पक्षाचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांची प्रत्यक्ष भेट घेऊन राज्यातील स्थितीची कल्पना देणार आहेत. विशेष म्हणजे, हायकमांडकडे जाणाऱ्या या शिष्टमंडळात राज्यातील काँग्रेसचे ४ ते ५ विद्यमान आमदार आणि अनेक ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांचा समावेश असल्याची माहिती मिळत आहे.



काँग्रेसमधील या अंतर्गत बंडाचे आणि नाराजीचे मुख्य कारण पक्षात काही दिवसांपूर्वी राबवण्यात आलेले 'संघटन सृजन अभियान' हे ठरले आहे. या अभियानांतर्गत संपूर्ण राज्यात काँग्रेसच्या नवीन शहराध्यक्षांच्या आणि जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या करण्यात आल्या होत्या. मात्र, या निवडी करताना स्थानिक पातळीवरील ज्येष्ठ नेते, माजी मंत्री आणि विद्यमान आमदारांना पूर्णपणे अंधारात ठेवण्यात आले, त्यांना कोणत्याही प्रकारे विश्वासात घेतले गेले नाही, असा आरोप या नाराज गटाकडून केला जात आहे. सपकाळ यांनी या निवडींमध्ये चुकीच्या पद्धती अवलंबल्यामुळेच पक्षाच्या तळागाळातील कार्यकर्त्यांमध्ये आणि स्थानिक नेतृत्वात मोठी खदखद निर्माण झाली आहे.



पडद्यामागे कोण ?


सध्या ही 'प्रदेशाध्यक्ष हटाव' मोहीम काही जिल्हास्तरीय पदाधिकारी आणि आमदार चालवत असल्याचे दिसत असले, तरी या पडद्यामागे राज्यातील काँग्रेसचे काही अत्यंत वजनदार आणि बडे नेते असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे. वरिष्ठ नेत्यांच्या सुप्त पाठिंब्याशिवाय दिल्ली हायकमांडला परस्पर भेटणे शक्य नसल्याने, या मोहिमेमागे मोठी शक्ती असल्याचे बोलले जात आहे. विधान परिषद निवडणुकीच्या अत्यंत महत्त्वाच्या क्षणी संघटनात्मक पातळीवरील हा वाद चव्हाट्यावर आल्याने काँग्रेस बॅकफूटवर आली आहे. आता यावर दिल्लीतील पक्षश्रेष्ठी काय तोडगा काढतात आणि ८ जूनच्या बैठकीत हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षपदाबाबत काय निर्णय घेतला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

Nashik Rain Update : शेतकऱ्यांना दिलासा मिळणार ? नाशिकसह जळगाव, धुळे जिल्ह्यांत आज पावसाची स्थिती काय ?

Nashik Rain Update : उत्तर महाराष्ट्रातील जळगाव धुळे आणि नाशिक जिल्ह्यांत काही ठिकाणी स्थानिक वातावरणाच्या प्रभावामुळे

Chhatrapati Sambhaji : देवा...किती किळसवाणा प्रकार! पप्पांनी कचोरी आणली अन् त्यात उंदराच्या लेंड्या; ५ पैकी २ कचोऱ्या मुलांनी खाल्ल्याने नागरिकांत संताप

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधील (Chhatrapati Sambhajinagar) वैजापूर शहरात (Vaijapur Area) अन्नाची अवहेलना आणि ग्राहकांच्या

Nalasopara Viral Video : नालासोपाऱ्यात हॉटेलच्या भातावर उंदरांचा हैदोस; ग्राहकांच्या जीवाशी खेळणाऱ्या हॉटेलवर कठोर कारवाईची मागणी

नालासोपारा : वसई-विरार महापालिका (Vasai-Virar Mahanagpalika) क्षेत्रातील नालासोपारा पूर्वेकडील वाकणपाडा परिसरातून एक अत्यंत

Nashik Crime : नाशिकमध्ये चाललंय काय ? रविवार कारंजावर टवाळखोरांचा धुमाकूळ, रिक्षाचालकाला अडवून थेट...

Nashik Crime : नाशिक जिल्हा हा कायद्याचा बालेकिल्ला असं नाशिक पोलीस गुन्हेगारांना पकडून त्यांच्याकडून वदवून घेत असले

Nitesh Rane : अंडी फेकली, पण लक्षात ठेवा ईद आणि मोहरमही येतोय, पुढे कसा कार्यक्रम...माझगावमधील घटनेनंतर मंत्री नितेश राणे आक्रमक, दिला कडक इशारा

मुंबई : मुंबईत गणेशोत्सवाचा उत्साह सुरू असतानाच, माझगाव परिसरातील 'माझगाव मोरया' (Mazgoan Morya) गणपतीच्या आगमन

Vikroli Women Suicide : विक्रोळीत वृध्द महिलेचा इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारण्याचा प्रयत्न; पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचला जीव

मुंबई : मुंबईतील विक्रोळी परिसरात इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या 65 वर्षीय