Pune Crime : धक्कादायक! लग्नास नकार दिल्याने अल्पवयीन मुलीची आत्महत्या, आरोपीवर गुन्हा दाखल







पुणे : पुण्यातील सहकारनगर परिसरात अल्पवयीन मुलीच्या आत्महत्येची धक्कादायक घटना समोर आली असून, या प्रकरणी एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रेमसंबंधातून लग्नाचे आश्वासन देऊन नंतर नकार दिल्यामुळे मानसिक धक्का बसलेल्या मुलीने टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुलै २०२५ ते २ जानेवारी २०२६ या कालावधीत संबंधित अल्पवयीन मुलगी आणि समीर महादेव रणदिवे (वय २२, रा. फोडशिरस, ता. माळशिरस, जि. सोलापूर) यांच्यात प्रेमसंबंध सुरू झाल्याचे तपासात समोर आले आहे. मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती असतानाही आरोपी तिच्या संपर्कात राहिला आणि वारंवार भेटी घेत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

तक्रारीनुसार, आरोपीने मुलीला लग्नाचे आश्वासन दिले होते. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून मुलीने भविष्यासंदर्भात अनेक अपेक्षा निर्माण केल्या होत्या. मात्र काही काळानंतर लग्नाचा विषय पुढे आल्यानंतर आरोपीने लग्नास नकार दिल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे मुलीला मोठा मानसिक धक्का बसला.



दरम्यान, मुलगी घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. सुरुवातीला या घटनेची अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली होती. मात्र तपासादरम्यान आत्महत्येमागील कारणांचा शोध घेत असताना प्रेमसंबंध आणि लग्नाच्या आश्वासनाचा मुद्दा समोर आला.

यानंतर मुलीच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे सहकारनगर पोलीस ठाण्यात समीर रणदिवे याच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि फसवणुकीसंदर्भातील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून आरोपीचा शोध घेतला जात आहे. या प्ररणानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

 














 







Comments
Add Comment

Gadchiroli : गडचिरोली आश्रमशाळा सर्पदंश प्रकरणी अखेर मोठी कारवाई

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील जपतलाई आश्रमशाळेतील सामूहिक सर्पदंश प्रकरणी अखेर मोठी कारवाई झाली आहे.

National Teacher Award 2026 : महाराष्ट्रातील ४ शिक्षकांची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते पुरस्कार वितरण

मुंबई : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी उल्लेखनीय कामगिरी

Jalgaon : सुप्रीम कॉलनीतील गोमांस प्रकरणानंतर महापालिकेची धडक कारवाई, अनधिकृत गोडाऊन जमीनदोस्त

Jalgaon : जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरात गोमांस आढळल्याच्या घटनेनंतर जळगाव शहर महानगरपालिकेने (Jalgaon City Municipal Corporation)

CM Devendra Fadnavis : नवी मुंबई पोलिसांचे अत्याधुनिक ‘प्रहारी’ सीसीटीव्ही कमांड सेंटर कार्यान्वित; मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन

ठाणे : नवी मुंबईकरांच्या सुरक्षिततेत अधिक भर घालत गुन्हेगारीवर नियंत्रण आणि अत्याधुनिक देखरेखीसाठी सज्ज

CM Devendra Fadnavis : नवी मुंबईत 'कॅम्पस कनेक्ट' मोहिमेचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ, विद्यार्थ्यांना व्यसनांपासून दूर राहून राष्ट्रभक्तीकडे वळण्याचे आवाहन

ठाणे : व्यसनांपासून दूर राहून विद्यार्थ्यांनी शिक्षण, क्रीडा, कौशल्यविकास आणि राष्ट्रउभारणीकडे वळावे, असे आवाहन

CM Devendra Fadnavis : महाराष्ट्रात टाटा स्ट्राइव्हच्या माध्यमातून कौशल्य विकासाला चालना मिळणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : टाटा कम्युनिटी इनिशिएटिव्हज ट्रस्टच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या टाटा स्ट्राइव्हने महाराष्ट्रातील