Petrol Diesel : पेट्रोल-डिझेल निर्यातीवरील विशेष करात कपात, १ जूनपासून नवे दर लागू

नवी दिल्ली : केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेल आणि एव्हिएशन टर्बाइन फ्युएल यांच्या निर्यातीवर लावण्यात आलेल्या विशेष शुल्कात मोठी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. पेट्रोलच्या निर्यातीवर १.५ रुपये प्रति लीटर, तर डिझेलच्या निर्यातीवर १३.५० रुपये प्रति लीटर कपात, एटीएफ निर्यातीवरील करात ९.५० रुपये प्रति लिटर इतकी घट करण्यात आली आहे. १ जूनपासून हा निर्णय लागू होणार आहे.सरकारने केवळ निर्यात शुल्कात कपात केली असून देशांतर्गत विक्रीवरील कररचनेत कोणताही बदल केलेला नाही. त्यामुळे देशातील ग्राहकांना पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये तातडीने कोणताही दिलासा मिळणार नाही. पेट्रोल-डिझेलचे किरकोळ दर आहे, तसेच राहणार आहेत.


मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध राहावा यासाठी केंद्र सरकारने २७ मार्च २०२६ रोजी विशेष कर लागू केला होता. त्यानंतर परिस्थितीनुसार शुल्क दरांमध्ये वेळोवेळी बदल करण्यात आले. सरकारने या कररचनेत शेवटचा बदल १६ मे २०२६ रोजी केला होता. देशातील सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये कोणताही बदल केलेला नाही. याआधी २५ मे रोजी इंधन दरांमध्ये वाढ करण्यात आली होती.सध्या राजधानी दिल्लीत पेट्रोल १०२.१२ रुपये प्रति लिटर, तर डिझेल ९५.२० रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. मे महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये सुमारे ७ ते ८ रुपयांची वाढ नोंदवण्यात आली आहे. त्यामुळे अनेक शहरांमध्ये पेट्रोलचे दर ११० रुपयांच्या पुढे गेले आहेत. अशा परिस्थितीत निर्यात दरातील कपातीचा निर्णय तेल कंपन्यांसाठी सकारात्मक मानला जात असला, तरी सामान्य ग्राहकांना इंधन दरांबाबत अद्याप प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Comments
Add Comment

Historical Letter : तब्बल २८० वर्षांपूर्वीच्या मोडी लिपीतील पत्रातून उलगडली बुंदेलखंडातील मराठ्यांची प्रशासन व्यवस्था

भोपाळ : मराठा साम्राज्याचे पेशवा बाजीरावांचे पुत्र बाळाजी बाजीराव (नानासाहेब) यांनी बुंदेलखंडातील आपले सेनापती

Devendra Fadnavis : पोलीस ठाण्यांची ‘अ’, ‘ब’, ‘क’ वर्गवारी करणार

मुंबई : वाढती लोकसंख्या, झपाट्याने होणारे शहरीकरण आणि औद्योगिकीकरणामुळे पोलिसांवरील वाढता ताण लक्षात घेऊन

Pratap Sarnaik : गणेशोत्सवात स्वस्तात एसटीने गावी जाता येणार

मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या हजारो भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे. एसटी बसच्या एकेरी गट आरक्षणावर

Shivpal Singh : भालाफेकपटू शिवपाल सिंगवर १० वर्षांची बंदी

नवी दिल्ली : टोकियो २०२० ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारा ३१ वर्षीय भालाफेकपटू शिवपाल सिंग याच्यावर

Narendra Modi : पंतप्रधान मोदींनी अंतराळ स्टार्टअपच्या सीईओ आणि संस्थापकांशी साधला संवाद

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सेवा तीर्थ येथे देशातील २० अंतराळ स्टार्टअपच्या सीईओ आणि

Vishakha Raut : माजी महापौर विशाखा राऊत यांचे नगरसेवक पद धोक्यात जात प्रमाणपत्र ठरवले आहेत

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : माहीम येथील प्रभाग क्रमांक १९१ मधून निवडून आलेल्या उबाटाच्या नगरसेविका माजी महापौर