Jalgaon : शेतजमिनीची 14 कोटी 10 लाख रूपयांची बनावट नोटरी, चार जणांवर गुन्हा

चाळीसगाव - फसवणूक करण्याच्या उद्देशाने शेतजमिनीची 14 कोटी 10 लाख रूपयांची बनावट नोटरी सौदाताबा इसार पावती इतरांच्या नावे परस्पर करून फसवणुक केल्याप्रकरणी टाकळी प्र.चा. येथील चौघांच्या विरोधात न्यायालयाच्या आदेशाने चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला (Chalisgaon City Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


एकनाथ नामदेव पाटील रा. बिलाखेड ता.चाळीसगाव यांची बिलाखेड शिवारात गट नं.159/2 मध्ये शेती असून या शेतजमिनीचे सातबारा रेकॉर्डला व महसूल दप्तरी त्यांचे नाव आहे. त्यांनी शेतजमिन विक्री करणेकामी कोणासही कधीही सोैदापावती अगर अन्य कोणत्याही प्रकारचा दस्तऐवज करून दिला नाही.चाळीसगाव दिवाणी न्यायालयाने एकनाथ पाटील यांना 26/9/2025 रोजी न्यायालयाच्या बेलीमार्फत कोर्टात हजर राहण्याबाबत समन्स मिळाले होते.



या समन्स सोबत दस्तऐवज पाहीले असता आरोपींतांनी त्यांची फसवणुक करून बिलाखेड शिवारातील गट नं.159/2 क्षेत्र 0. हे.80 आर ही शेतजमिन विक्री करून रक्कम हडपण्यासाठी 7/9/2022 रोजी 14 कोटी 10 लाख रूपये इतक्या रकमेची नोटरी सौदा इसार पावती चौघांच्यानावे करून फिर्यादी एकनाथ पाटील यांची फसवणुक केली. या संबंधी पाटील यांनी संबंधीतांवर कारवाई करावी म्हणून 26/9/2025 रोजी रजिस्टर पोस्टाने फिर्याद दिली.



मात्र गुन्हा दाखल करून न घेतल्याने त्यांनी न्यायालयात धाव घेतली असता न्यायालयाने पोलीसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश केले. त्यावरून एकनाथ पाटील यांच्या फिर्यादीवरून किशोर काळूराम जैन, ललीत काळूराम जैन, मांगीलाल हिम्मतलाल जैन व एक महिला सर्व रा. अरिहंत ट्रेडर्स, खरजई नाका चाळीसगाव यांच्या विरोधात न्यायालयाच्या आदेशाने चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला भारतीय दंड संहिता कलम 418,420,463,471,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपास पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ हे करीत आहेत.

Comments
Add Comment

प्रो गोविंदा २०२६ : आर्यन गोविंदा पथकाने सलग दुसऱ्यांदा मारली बाजी; ७५ लाखांचा धनादेश आणि ट्रॉफीवर कब्जा

मुंबई : दहीहंडी उत्सवाचा थरार आणि खेळाडूंचा जोश अनुभवणाऱ्या 'प्रो गोविंदा सीझन ४' (Pro Govinda Season 4 2026) चा अंतिम सामना अत्यंत

Navi Mumbai News : JNPAची जागतिक भरारी, जगातील टॉप-३० कंटेनर बंदरांमध्ये २१वे स्थान; सात स्थानांची झेप

नवी मुंबई : भारताच्या सागरी व्यापारासाठी महत्त्वाची असलेल्या जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटीने (JNPA) जागतिक स्तरावर

Foldable iPhone : Appleचा मोठा धमाका! ९ सप्टेंबरला iPhone 18 Proसह पहिला Foldable iPhone होणार लॉन्च ?

Appleने आपल्या आगामी वार्षिक लॉन्च इव्हेंटची तारीख ९ सप्टेंबर निश्चित केली आहे. कॅलिफोर्नियातील क्युपर्टिनो येथील

Police raid : कर्जत ‘ड्रग्ज’च्या विळख्यात? पोलिसांच्या छाप्याने खळबळ; नायजेरियन नागरिक ताब्यात

रायगड : कर्जत तालुक्यातील हलीवली परिसरातील सिग्नेचर डिझायर इमारतीत अंमली पदार्थांची विक्री होत असल्याच्या

IND vs SL Colombo Test : कोलंबो कसोटी अनिर्णित; भारताने कसोटी मालिका १-० ने जिंकली

कोलंबो : श्रीलंका दौऱ्यावर, शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये सहज विजय मिळवून

ICC bans UAE batter : आयसीसीची युएईचा फलंदाज आसिफ खानवर १५ महिन्यांची बंदी

दुबई : संयुक्त अरब अमिरातीचा (UAE) अनुभवी फलंदाज आसिफ खान याच्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) डोपिंग