Singapore Badminton : सिंगापूर बॅडमिंटन स्पर्धेत भारताचे वर्चस्व !

सिंधू, लक्ष्य सेन आणि सात्विक - चिराग उपांत्यपूर्व फेरीत


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :
सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या आघाडीच्या खेळाडूंनी प्रभावी कामगिरी करत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. महिला एकेरीत पी. व्ही. सिंधू, पुरुष एकेरीत लक्ष्य सेन, पुरुष दुहेरीत सात्विकसाईराज रंकीरेड्डी-चिराग शेट्टी आणि मिश्र दुहेरीत ध्रुव कपिला-तनिषा क्रास्टो या भारतीय जोड्यांनी विजय संपादन करत स्पर्धेतील आव्हान कायम राखले.



अनुभवी सिंधूने जपानच्या रिको गुनजीवर सरळ दोन डावांत मात करत शानदार विजय नोंदविला. अवघ्या ३७ मिनिटांत झालेल्या या सामन्यात सिंधूने सुरुवातीपासूनच वर्चस्व राखत प्रतिस्पर्धी खेळाडूला कोणतीही संधी दिली नाही. आता उपांत्यपूर्व फेरीत तिच्यासमोर अव्वल मानांकित आन से-यंगचे आव्हान असणार आहे.



पुरुष एकेरीत लक्ष्य सेनला थायलंडच्या कुनलावुत वितिदसर्नविरुद्ध अनपेक्षितरीत्या पुढील फेरीत प्रवेश मिळाला. सामन्याच्या सुरुवातीलाच प्रतिस्पर्धी दुखापतीमुळे माघार घेतल्याने लक्ष्यची आगेकूच निश्चित झाली. पुढील फेरीत त्याची लढत जपानच्या कोकी वतानाबेविरुद्ध होणार आहे.


पुरुष दुहेरीत सात्विक आणि चिराग यांनी चिनी तैपेईच्या ली जे-हुई आणि यांग पो-ह्सुआन यांच्यावर २१-१५, ११-२१, २१-१८ अशा फरकाने रोमांचक विजय मिळविला. पहिला डाव सहज जिंकल्यानंतर भारतीय जोडी दुसऱ्या डावात पिछाडीवर पडली; मात्र निर्णायक डावात संयम राखत त्यांनी सामना आपल्या बाजूने फिरविला. आता त्यांच्यासमोर मलेशियाच्या कांग खाय झिंग आणि आरोन ताय यांचे आव्हान असेल.



मिश्र दुहेरीत ध्रुव कपिला आणि तनिषा क्रास्टो यांनी जपानच्या युता

"> वतानाबे आणि माया तागुची यांच्याविरुद्ध दमदार पुनरागमन करत विजय मिळविला.

Tags
singaporeBadmintonSingapore Open 2026badminton match
Comments
Add Comment

FIH Hockey World Cup : रोमहर्षक लढतीत भारताचा पाकिस्तानवर ५-३ ने विजय; पुरुष हॉकी विश्वचषकाच्या क्रॉसओव्हर फेरीत धडक!

हॉकी वर्ल्डकप २०२६ स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात रंगलेला हायव्होल्टेज सामना अत्यंत रोमांचक ठरला. या

BWF World Championships : लक्ष्य सेनला पराभवाचा धक्का; उन्नती हुडाचेही आव्हान संपुष्टात

नवी दिल्ली : भारताचा स्टार बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनला बीडब्ल्यूएफ जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पराभवाला सामोरे

ICC Rankings : हॅरी ब्रूकची कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थानी झेप

ICC Ranking : इंग्लंडचा स्टार फलंदाज हॅरी ब्रूक पुन्हा एकदा आयसीसी पुरुष कसोटी क्रिकेटपटूंच्या क्रमवारीत जगातील अव्वल

Rohit Sharma : रोहित शर्माचे जोरदार पुनरागमन; वेस्ट इंडिज मालिकेपूर्वी मुंबईच्या बीकेसी मैदानावर सुरू केला सराव

वांद्रे : भारताचा माजी कर्णधार रोहित शर्मा काही काळाच्या विश्रांतीनंतर मुंबईत परतला असून आगामी एकदिवसीय

BWF World Championships : जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत भारताचा धडाका; लक्ष्य, उन्नती विजयी, ट्रीसा-गायत्री उपउपांत्यपूर्व फेरीत

नवी दिल्ली : भारतात सुरू असलेल्या BWF जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय खेळाडूंची दमदार कामगिरी सुरू आहे.

Women's FIH Hockey World Cup : भारतीय महिलांचा विश्वचषकात धडाका; दक्षिण आफ्रिकेचा 6-1 ने धुव्वा, पुढची फेरी जवळपास निश्चित

ॲम्स्टेलवीन : FIH महिला हॉकी विश्वचषकात भारतीय महिला संघाने दमदार कामगिरी करत दक्षिण आफ्रिकेचा तब्बल 6-1 असा पराभव