Women's T-20 World Cup 2026 : ३३ सामने, १८ महिला पंच !

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने २०२६ महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी सामनाधिकारी पथकाची घोषणा केली असून सलग तिसऱ्यांदा संपूर्ण महिला पंच आणि सामनाधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महिलांच्या क्रिकेटमधील वाढत्या सहभागाला आणि नेतृत्वाला प्रोत्साहन देणारा हा महत्त्वपूर्ण निर्णय मानला जात आहे.



इंग्लंड आणि वेल्स येथे १२ जूनपासून सुरू होणाऱ्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत एकूण ३३ सामने खेळविण्यात येणार असून त्यासाठी १४ पंच आणि चार सामनाधिकारी जबाबदारी सांभाळणार आहेत.
या स्पर्धेत कॅन्डेस ला बोर्डे, गायत्री वेणुगोपालन, केरिन क्लास्टे आणि शाथिरा जाकीर जेसी या चार अधिकाऱ्यांचा प्रथमच विश्वचषकातील समावेश करण्यात आला आहे. तर २०२४ च्या स्पर्धेतील नऊ अधिकाऱ्यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे.



ऑस्ट्रेलियाच्या अनुभवी पंच क्लेअर पोलोसाक या सर्वाधिक अनुभवी अधिकारी ठरणार असून त्या सहाव्यांदा महिला टी-२० विश्वचषकात पंच म्हणून काम पाहणार आहेत. यापूर्वी त्यांनी या स्पर्धेत २२ सामन्यांमध्ये पंच म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. त्याचप्रमाणे जॅक्वलीन विल्यम्स आणि किम कॉटन या दोघी पाचव्यांदा विश्वचषकातील पंचपद भूषवणार असून प्रत्येकी १९ सामन्यांचा अनुभव त्यांच्या नावावर आहे. सामनाधिकारी पथकात शांद्रे फ्रिट्झ, जी. एस. लक्ष्मी आणि मिशेल परेरा यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. त्यांच्यासोबत न्यूझीलंडच्या ट्रुडी अँडरसन यांचाही समावेश करण्यात आला आहे.


Comments
Add Comment

FIH Hockey World Cup : रोमहर्षक लढतीत भारताचा पाकिस्तानवर ५-३ ने विजय; पुरुष हॉकी विश्वचषकाच्या क्रॉसओव्हर फेरीत धडक!

हॉकी वर्ल्डकप २०२६ स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात रंगलेला हायव्होल्टेज सामना अत्यंत रोमांचक ठरला. या

BWF World Championships : लक्ष्य सेनला पराभवाचा धक्का; उन्नती हुडाचेही आव्हान संपुष्टात

नवी दिल्ली : भारताचा स्टार बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनला बीडब्ल्यूएफ जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पराभवाला सामोरे

ICC Rankings : हॅरी ब्रूकची कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थानी झेप

ICC Ranking : इंग्लंडचा स्टार फलंदाज हॅरी ब्रूक पुन्हा एकदा आयसीसी पुरुष कसोटी क्रिकेटपटूंच्या क्रमवारीत जगातील अव्वल

Rohit Sharma : रोहित शर्माचे जोरदार पुनरागमन; वेस्ट इंडिज मालिकेपूर्वी मुंबईच्या बीकेसी मैदानावर सुरू केला सराव

वांद्रे : भारताचा माजी कर्णधार रोहित शर्मा काही काळाच्या विश्रांतीनंतर मुंबईत परतला असून आगामी एकदिवसीय

BWF World Championships : जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत भारताचा धडाका; लक्ष्य, उन्नती विजयी, ट्रीसा-गायत्री उपउपांत्यपूर्व फेरीत

नवी दिल्ली : भारतात सुरू असलेल्या BWF जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय खेळाडूंची दमदार कामगिरी सुरू आहे.

Women's FIH Hockey World Cup : भारतीय महिलांचा विश्वचषकात धडाका; दक्षिण आफ्रिकेचा 6-1 ने धुव्वा, पुढची फेरी जवळपास निश्चित

ॲम्स्टेलवीन : FIH महिला हॉकी विश्वचषकात भारतीय महिला संघाने दमदार कामगिरी करत दक्षिण आफ्रिकेचा तब्बल 6-1 असा पराभव