AI मुळे बसला लाखोंचा फटका, कर्मचाऱ्याने मालकाला लावला चुना

जयपूर : पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या जयपूरमध्ये एका मोठ्या कंपनीत धक्कादायक घटना घडली. AI च्या मदतीने फेक फोटो आणि व्हिडीओ दाखवून सोशल मीडियाद्वारे व्यावसायिकाला प्रेमाच्या जाळ्यात ओढण्यात आले. नंतर त्याच्याकडून टप्प्याटप्प्याने तब्बल ९० लाख रुपये उकळण्यात आले. यासाठी AI द्वारेच व्यावसायिकाचे बनावट फोटो आणि व्हिडीओ तयार करून त्याला ब्लॅकमेल करण्यात आले. व्यावसायिकाच्या प्रकल्पांचे नियंत्रण मिळवण्याचाही प्रयत्न झाला.



प्रेयसीच्या मागण्या संपत नसल्याचे बघून वैतागलेल्या व्यावसायिकाने थेट पोलिसांत धाव घेतली. महेश नगर पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी व्यावसायिकाने दिलेल्या माहितीआधारे तपास केला आणि AI चा वापर करून फसवणूक करणाऱ्या महिलेचे बिंग फुटले.



दक्षिण विभागाचे डीसीपी राजर्षि वर्मा यांच्या मार्गदर्शनात तपास सुरू आहे. पोलिसांनी तांत्रिक पुरावे आणि लोकेशन ट्रॅकिंगच्या मदतीनं कारवाई करत आरोपी महिलेला जोधपूरहून अटक केली. पोलिसांकडून ति

">ची चौकशी सुरू आहे. तिच्या नेटवर्कमध्ये आणखी किती जण आहेत, ते कुठे आहेत, याचा शोध घेतला जात आहे. गुन्ह्यासाठी AI चा वापर कसा केला जात होता, पैसे कशा प्रकारे उकळले जात होते; ही मोडस ऑपरेंडी पोलिसांनी चौकशीतून जाणून घेतली आहे. आता पुढील तपास सुरू आहे. व्यावसायिकाकडून उकळलेल्या पैशांचे काय केले याची चौकशी सुरू आहे. फसवणूक प्रकरणी कायदेशीर कारवाई सुरू असल्याचे पोलिसांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.

Tags
crimecyber fraudjaypurAIblackmail
Comments
Add Comment

North Cyprus Ferry Accident : मोठी बातमी! २७० प्रवाशांना घेऊन जाणारी फेरी बोट उलटली; १०० हून अधिक जणांची सुटका, बचावकार्य सुरू

उत्तर सायप्रस : उत्तर सायप्रसच्या किनाऱ्याजवळ आज दुपारी मोठी दुर्घटना घडली. २७० प्रवाशांना घेऊन जाणारी प्रवासी

Ankit Baliyan Murder : शामलीत अंकित बलियान हत्या प्रकरणातील दोन संशयित चकमकीत ठार; पोलीस कर्मचारीही जखमी

शामली :  उत्तर प्रदेशातील शामली जिल्ह्यात हरियाणवी गायक आणि यूट्यूबर अंकित बलियान यांच्या हत्या प्रकरणातील दोन

Petrol Diesel Price : महिन्याचा शेवट आणि खिशावर ताण? पेट्रोल भरण्याआधी पाहा तुमच्या शहरातील आजचे नवीन दर!

मुंबई : सरकारी तेल कंपन्यांनी देशभरातील पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर जाहीर केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील

Maharashtra Weather Alert : महाराष्ट्रातील पावसाची प्रतीक्षा कायम; हिंगोली-नांदेडला यलो अलर्ट, हवामान विभागाचा इशारा

मुंबई : राज्यातील हवामानात सध्या चढ-उतार पाहायला मिळत आहेत. मागील काही दिवसांपासून अनेक भागांत हलका ते मध्यम पाऊस

Bandra Hit And Run : भरधाव कारची 8 वर्षीय मुलाला धडक; उपचारांपूर्वीच मृत्यू, महिला चालकाला अटक

मुंबई : मुंबईतील वांद्रे पश्चिम परिसरात झालेल्या भीषण अपघातात 8 वर्षीय अंश गुप्ता या चिमुकल्याचा मृत्यू झाला.

Mumbai Port Crane Accident : मुंबई पोर्टवर कार्गो उचलताना मोठी दुर्घटना; क्रेनला आग, दोन ऑपरेटर जखमी

मुंबई : मुंबई पोर्ट परिसरातील बीपीएस (BPS) पोर्ट येथे कार्गो उचलण्याच्या कामादरम्यान रविवारी (३० ऑगस्ट) सायंकाळी