काँग्रेस ८, उबाठा ६, शरद पवार गट ३ जागा लढवणार

महाविकास आघाडीचे जागावाटप अंतिम; लवकरच उमेदवार जाहीर करणार


मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधानपरिषदेवर निवडून द्यायच्या रिक्त जागांसाठी महाविकास आघाडीचा (मविआ) जागावाटपाचा फॉर्म्युला अखेर निश्चित झाला आहे. महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीनंतर झालेल्या या तडजोडीत काँग्रेसला सर्वाधिक ८ जागा मिळाल्या असून, उबाठा ६ आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट ३ जागांवर निवडणूक लढवणार आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या जागावाटपाची अधिकृत माहिती दिली असून, मविआ सर्व १७ जागांवर पूर्ण ताकदीने लढणार असून लवकरच उमेदवारांची घोषणा केली जाईल, असे त्यांनी सांगितले.येत्या १ जून रोजी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने मविआच्या गोटात हालचालींना वेग आला आहे. चंद्रशेखर बावनकुळे विधानसभेत विजयी झाल्याने त्यांनी नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचा राजीनामा दिला होता, त्यामुळे जाहीर झालेल्या नागपूरच्या पोटनिवडणुकीसह एकूण ८ जागांवर काँग्रेस आपले नशीब आजमावणार आहे.



मविआचा फॉर्म्युला




  •  काँग्रेस (एकूण ८ जागा) : चंद्रपूर, यवतमाळ, भंडारा, अमरावती, अहिल्यानगर, सोलापूर, धाराशिव आणि नागपूर (पोटनिवडणूक).

  • उबाठा (एकूण ६ जागा) : कोकण, जळगाव, परभणी-हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, नांदेड आणि नाशिक.

  • राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट (एकूण ३ जागा) : पुणे, ठाणे आणि सांगली-सातारा.

Comments
Add Comment

Ritu Tawde : मुंबईच्या महापौरांनी केली जुहू समुद्र किनाऱ्याची पाहणी; स्वच्छता मोहिमेचा प्रत्यक्ष घेतला आढावा

मुंबई : उंच लाटांमुळे जुहू समुद्र किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणावर वाहून येणाऱ्या कचऱ्याबाबत वारंवार नागरी तक्रारी

FIH Hockey World Cup : रोमहर्षक लढतीत भारताचा पाकिस्तानवर ५-३ ने विजय; पुरुष हॉकी विश्वचषकाच्या क्रॉसओव्हर फेरीत धडक!

हॉकी वर्ल्डकप २०२६ स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात रंगलेला हायव्होल्टेज सामना अत्यंत रोमांचक ठरला. या

MBBS Admission Scam : MBBS प्रवेशाच्या आमिषाने १.१३ कोटींची फसवणूक; आरोपी महिलेला मुंबईतील विमानतळावर अटक

मुंबई : मुंबई किंवा पुण्यातील वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी एका दुबईस्थित भारतीय उद्योगपती

Assistant Engineer accepting a bribe : मुंबई महापालिकेत खळबळ; २० हजारांची लाच घेताना 'अ' वॉर्डचा सहायक अभियंता एसीबीच्या जाळ्यात

MUMBAI : मुंबई महानगरपालिकेत (BMC) भ्रष्टाचाराविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) एक मोठी आणि धडक कारवाई केली आहे.

BWF World Championships : लक्ष्य सेनला पराभवाचा धक्का; उन्नती हुडाचेही आव्हान संपुष्टात

नवी दिल्ली : भारताचा स्टार बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनला बीडब्ल्यूएफ जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पराभवाला सामोरे

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात २० ऑगस्टला पाऊस बरसणार; ४ जिल्ह्यांना हवामान खात्याचा यलो अलर्ट

मुंबई : सध्या राज्यात पावसाचा जोर काहीसा कमी असला तरी २० ऑगस्ट रोजी अनेक भागांत पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान