महाविकास आघाडीचे जागावाटप अंतिम; लवकरच उमेदवार जाहीर करणार
मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधानपरिषदेवर निवडून द्यायच्या रिक्त जागांसाठी महाविकास आघाडीचा (मविआ) जागावाटपाचा फॉर्म्युला अखेर निश्चित झाला आहे. महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीनंतर झालेल्या या तडजोडीत काँग्रेसला सर्वाधिक ८ जागा मिळाल्या असून, उबाठा ६ आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट ३ जागांवर निवडणूक लढवणार आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या जागावाटपाची अधिकृत माहिती दिली असून, मविआ सर्व १७ जागांवर पूर्ण ताकदीने लढणार असून लवकरच उमेदवारांची घोषणा केली जाईल, असे त्यांनी सांगितले.येत्या १ जून रोजी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने मविआच्या गोटात हालचालींना वेग आला आहे. चंद्रशेखर बावनकुळे विधानसभेत विजयी झाल्याने त्यांनी नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचा राजीनामा दिला होता, त्यामुळे जाहीर झालेल्या नागपूरच्या पोटनिवडणुकीसह एकूण ८ जागांवर काँग्रेस आपले नशीब आजमावणार आहे.
‘मुंबई टेक विक 2026’ चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन मुंबई : महाराष्ट्र एआय क्रांतीचे नेतृत्व करण्यासाठी अत्यंत सक्षम स्थितीत आहे. मुंबईची आर्थिक ...
- काँग्रेस (एकूण ८ जागा) : चंद्रपूर, यवतमाळ, भंडारा, अमरावती, अहिल्यानगर, सोलापूर, धाराशिव आणि नागपूर (पोटनिवडणूक).
- उबाठा (एकूण ६ जागा) : कोकण, जळगाव, परभणी-हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, नांदेड आणि नाशिक.
- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट (एकूण ३ जागा) : पुणे, ठाणे आणि सांगली-सातारा.






