Pune : मिथेनॉल मिश्रीत दारू प्यायल्याने विषबाधा, १८ जणांचा मृत्यू

पुणे : पुण्यासह पिंपरी-चिंचवडमध्ये मिथेनॉल मिश्रीत दारू प्यायल्याने विषबाधा झाली आणि अनेकांची तब्येत बिघडली. तब्येत बिघडलेल्यांपैकी १८ जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. मृतांच्या संख्येत वाढ होण्याची भीती आहे. विषबाधेची प्रकरणे प्रामुख्याने आनंदवन ,काटेवस्ती , संजयनगर , आझाद चौक आणि जय महाराष्ट्र चौक या परिसरात आढळली आहेत. पिंपरी चिंचवडच्या फुगेवाडी आणि दापोडी येथे १३ जणांचा, तर पुण्यातील हडपसर आणि काळेपळ येथे पाच जणांचा मिथेनॉल मिश्रीत दारू प्यायल्याने मृत्यू झाला.


मिळालेल्या माहितीनुसार, उरळी कांचनमधील राधेशाम प्रजापतीच्या (३५) मार्गदर्शनात देशी दारू तयार केली जात होती. ही दारू पुढे योगेश वानखेडेच्या (२३) नेतृत्वात पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील वेगवेगळ्या दारु गुत्त्यांवर जात होती. तिथून या दारूची विक्री होत होती. योगेश‌ वानखेडेने प्रजापतीकडून दारु खरेदी केल्यानंतर अधिक नफा कामवण्याच्या उद्देशाने त्यामधे मिथेनॉल मिसळले. मिथेनॉलमुळे दारुचे प्रमाण दुप्पट झाले, ज्यामुळे वानखेडेचा नफा वाढणार होता. मात्र मिथेनॉलचे प्रमाण जास्त झाल्यामुळे दारू अनेकांसाठी जीवघेणी ठरली.



पोलिसांनी मृतांचे शवविच्छेदन केल्यानंतर भारतीय न्याय संहिता (बीएनएस) आणि महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम १०५ (सदोष मनुष्यवध), १२३ (गुन्हा करण्याच्या उद्देशाने हानिकारक पदार्थांद्वारे इजा पोहोचवणे) यासह इतर संबंधित कलमांखाली गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.


चिंचवड पोलीसांनी सहा तर पुणे पोलिसांनी दोन आरोपींना केली अटक


वानखेडेने मिथेनॉल मिश्रीत दारू पिंपरी चिंचवडच्या फुगेवाडीत दारू गुत्ता चालवणाऱ्या कर्नलसिंह विरखा आणि गुरमितसिंह विरखा या बापलेकांना विकली. तसेच त्याने पुण्यातील खडकी भागात कल्पेश अग्रवाल आणि त्याच सोबत पुण्यातील वडारवाडी भागातील अरिहंत धोत्रे यांना देखील दारू विकली. पुण्याच्या हडपसर आणि काळेपडळ भागात दारु गुत्ता चालवणाऱ्या आकाश जाधव आणि अशोक हांडे यांनाही मिथेनॉल मिश्रीत दारू विकली, ज्यामुळे हडपसर भागात देखील मृत्यू झाले. पोलिसांनी एकूण ८ आपोरींना ताब्यात घेतलं आहे त्यात पिंपरी चिंचवड मधील सहा आरोपी आणि पुणे शहरातील दोन आरोपी आहेत.



एकूण आरोपी


१ . योगेश वाशखेडे


२. राधेशाम प्रजापती


3. कर्नलसिंह विरखा


4. गुरमितसिंह विरखा


5. कल्पेश अग्रवाल


6. अरिहंत धोत्रे


7. आकाश जाधव


8. अशोक हांडे


दोषींची गय केली जाणार नाही : मुख्यमंत्री


मिथेनॉल मिश्रीत दारू प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे पोलीस आयुक्तांशी फोनवर चर्चा करून त्यांना तातडीने कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले. यानंतर पोलिसांनी दारू प्रकरणी कारवाई सुरू केली आहे. दोषींची गय करू नये असे स्पष्ट निर्देश येताच पोलिसांनी आठ जणांना अटक केली आहे. आणखी काही जणांची धरपकड होण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

Nashik : श्रावणातील 'फेरी'चे सूक्ष्म नियोजन करा, सुरक्षिततेसोबत पाणी-वीज आणि वाहतूक व्यवस्थेकडे विशेष लक्ष देण्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांचे निर्देश

Nashik : श्रावण महिन्यात त्र्यंबकेश्वर येथे वाढणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता प्रशासनाने सुरक्षा व्यवस्थेला

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पुढील २४ तासांत वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा; गारपिटीचीही शक्यता

मुंबई : राज्यात सध्या काही भागांत पावसाची हजेरी सुरू असली, तरी अनेक जिल्ह्यांमध्ये अद्याप दमदार पावसाची

Pakistan High Commission in Delhi : दिल्लीतील पाकिस्तान उच्चायोगाबाहेरील अनधिकृत बांधकामांवर कारवाई; बॅरिकेड्स आणि ट्रॅफिक बोलार्ड्स हटवले

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील पाकिस्तान उच्चायोगाबाहेर उभारण्यात आलेली अनधिकृत बांधकामे आणि रांगेचे

Free School Bag : पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर; राज्य सरकारकडून १७४ कोटींच्या प्रस्तावाला प्रशासकीय मंजुरी

मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते आठवीत शिक्षण घेणाऱ्या

Western Railway Food and Water Safety : पश्चिम रेल्वेची अन्न आणि पाणी सुरक्षेसाठी कडक तपासणी; 98 टक्के अन्न नमुने, तर 99.87 टक्के पाणी नमुने सुरक्षित

मुंबई : प्रवाशांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्न तसेच स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी पश्चिम रेल्वेने

Free Online Coaching for Competitive Exams : स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी मोफत ऑनलाइन कोचिंग; केंद्रीय शिक्षणमंत्र्यांकडून आढावा

नवी दिल्ली : स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या देशभरातील तरुणांना मोफत ऑनलाइन कोचिंग उपलब्ध करून देण्याच्या