SRH vs RR Eliminator : 15 वर्षांच्या वैभवचे वादळ! 29 चेंडूत 97 धावा; ख्रिस गेलचाही विक्रम तुटला, हैदराबाद हादरलं...

Vaibhav Sooryvanshi : आयपीएल 2026 च्या एलिमिनेटर सामन्यात राजस्थान रॉयल्सच्या 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीने अक्षरशः धुमाकूळ घालत क्रिकेटविश्वाला थक्क करून टाकले आहे. सनरायझर्स हैदराबादविरुद्ध खेळताना वैभवने अवघ्या 16 चेंडूत अर्धशतक झळकावत आयपीएल इतिहासात नवा विक्रम केला आहे. त्यानंतर त्याने फक्त 29 चेंडूत 97 धावांची तुफानी खेळी साकारत संपूर्ण सामना राजस्थानच्या बाजूने झुकवला आहे.


युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलचा ऐतिहासिक विक्रम मोडला


वैभव सूर्यवंशीने या सामन्यात षटकारांचा अक्षरशः पाऊस पाडला. त्याने एका हंगामात सर्वाधिक षटकार ठोकण्याचा ख्रिस गेलचा ऐतिहासिक विक्रम मोडून काढला. गेलने एका मोसमात 59 षटकार ठोकले होते, तर वैभवने एलिमिनेटरमध्येच हा आकडा पार करत इतिहास रचला. त्याने या हंगामात आतापर्यंत 65 षटकार मारले आहेत.


29 चेंडूत 97; शतक फक्त 3 धावांनी हुकलं


राजस्थानची सुरुवात आक्रमक झाली आणि त्यात वैभव सूर्यवंशीने हैदराबादच्या गोलंदाजांची अक्षरशः धुलाई केली. त्याने 29 चेंडूत 97 धावा करत 5 चौकार आणि तब्बल 12 षटकार मारले. त्याचा स्ट्राईक रेट तब्बल 334.48 इतका होता. मात्र, शतकापासून फक्त 3 धावा दूर असताना तो बाद झाला आणि सर्वात वेगवान आयपीएल शतकाचा विक्रम थोडक्यात हुकला. सर्वात वेगवान आयपीएल शतकाचा विक्रम क्रिस गेलच्या नावा वर आहे त्याने २०१३ साली ३० चेंडूत शतक झळकवले होते.


आयपीएल २०२६ मध्ये वैभव सूर्यवंशीची कामगिरी


वयाच्या केवळ 15व्या वर्षात एलिमिनेटरसारख्या मोठ्या सामन्यात अशी तुफानी खेळी करून वैभव सूर्यवंशीने संपूर्ण क्रिकेटविश्वाचं लक्ष वेधून घेतलं आहे. वैभवने या हंगामात १५ सामन्यात ६८० धावा केल्या आहेत. त्याने अनकॅप्ड प्लेअर म्हणून एका हंगामात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला आहे. याआधी हा विक्रम जयसवालच्या नावावर होता. या हंगामात त्याने आपल्या वेगवान फटकेबाजीने सर्वांचे लक्ष्य वेधून घेतले आहे.सध्या राजस्थानने १४ षटकात तीन बाद १९२ धावा केल्या आहेत. यात जाइसवळने २९ चेंडूत २९ धावा केल्या आहेत.तर वैभवने २९ चेंडूत ९७ धावा केल्या. तो प्रफुल हिंगेच्या चेंडूवर स्मरन रविचंद्रनकडे झेल देऊन परतला.

Comments
Add Comment

Pro Govinda League 2026 : दहीहंडीचा राष्ट्रकुल व ऑलिंपिकमध्ये समावेश होणार ? 'प्रो गोविंदा'बाबत मोठी अपडेट

मुंबई : प्रो गोविंदा लीगच्या चौथ्या हंगामाचा १६ ऑगस्ट रोजी दिमाखदार प्रारंभ झाला. भारताच्या टी-२० विश्वचषक

IND vs SL Galle Test : भारतापाठोपाठ श्रीलंकाही पहिल्या डावात 'ऑलआऊट', जाणून घ्या गॉल कसोटीत तिसऱ्या दिवसअखेर भारताकडे किती धावांची आघाडी ?

गॉल : पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी सोनल दिनुषाच्या पहिल्यावहिल्या कसोटी शतकानंतरही भारतीय

Ind vs SL Test Match : श्रीलंकेवर फॉलोऑनची टांगती तलवार : लंकेच्या ४६२ धावांत ५ गडी बाद; टीम इंडियाच्या विजयात पावसाचा अडथळा?

Ind vs SL Test Match : भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने सामन्यावर मजबूत पकड मिळवली आहे.

Cristiano Ronaldo : रोनाल्डोच्या निवृत्तीचे संकेत; २०२६-२७ हंगाम ठरू शकतो अखेरचा!

मुंबई : फुटबॉल विश्वातील महान खेळाडूंपैकी एक असलेला क्रिस्टियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) लवकरच आपल्या २५ वर्षांच्या

INDvsSL : गॉल कसोटी, दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला; जाणून घ्या भारताने किती केल्या धावा ?

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना गॉल येथे सुरू आहे. या सामन्यातील

WTC : बांगलादेशने ऑस्ट्रेलियाला हरवलं; WTC गुणतालिकेत मोठा बदल

डार्विन : बांगलादेशने रविवारी डार्विनच्या मरारा स्टेडियममध्ये ऐतिहासिक विजय मिळवला. यजमान