Prajakta Mali : कान्सच्या रेड कार्पेटवरील प्राजक्ताच्या सौंदर्याला ‘निरुपा सारीज’चा साज!

मराठमोळ्या नऊवारीने जागतिक मंचावर वेधले लक्ष;


ठाण्यातील निरुपा तायडे यांच्या ब्रँडची जोरदार चर्चा

ठाणे : यंदाच्या प्रतिष्ठित कान्स चित्रपट महोत्सवामध्ये मराठी कलाकारांनी खास मराठमोळा ठसा उमटवला. अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने कान्सच्या रेड कार्पेटवर पारंपरिक नऊवारी साडीत केलेल्या आकर्षक एन्ट्रीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. विशेष म्हणजे, तिच्या या चर्चित लूकला ठाण्यातील निरुपाज येवला पैठणी अँड सिल्क सारीजच्या खास साडीचा साज लाभला होता.


गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर आणि मनोरंजनविश्वात प्राजक्ताच्या या लूकची मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली आहे. मोरपिशी छटेतील नऊवारी, त्यावर भरजरी शेला, पारंपरिक नथ, ठुशी, कमरपट्टा आणि मराठमोळा दागिन्यांचा साज अशा संपूर्ण लूकमधून तिने महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख जागतिक मंचावर अभिमानाने सादर केली.



कान्सच्या रेड कार्पेटवर सहसा वेस्टर्न गाऊन्स आणि ग्लॅमरस फॅशन पाहायला मिळते. मात्र, प्राजक्ताने भारतीय परंपरा आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाला प्राधान्य देत नऊवारीची निवड केल्याने तिचा लूक सर्वांपेक्षा वेगळा आणि उठून दिसणारा ठरला. फॅशनप्रेमींसह मराठी प्रेक्षकांनीही तिच्या या निर्णयाचे भरभरून कौतुक केले आहे.


‘निरुपा सारीज’ने तयार केलेल्या या साडीमध्ये पारंपरिक विणकाम, आकर्षक रंगसंगती आणि आधुनिक एलिगन्स यांचा सुंदर मिलाफ पाहायला मिळाला. मराठमोळ्या साड्यांची समृद्ध परंपरा जागतिक स्तरावर पोहोचवण्याचे काम या निमित्ताने झाले असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.


प्राजक्ताने स्वतः सोशल मीडियावर कान्समधील अनुभव शेअर करत 'मराठी ठसका' जागतिक रेड कार्पेटवर घेऊन जाण्याचा आनंद व्यक्त केला होता. तिच्या या पोस्टनंतर चाहत्यांसह अनेक कलाकारांनीही तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. निरुपाज सारीज हा खात्रीशीर येवला पैठणी आणि सिल्क साड्या देणारा ब्रँड आहे. प्राजक्तासह चित्रपट सृष्टीतील सुबोध भावे, अभिजित खांडकेकर, अपूर्वा नेमळेकर, पूजा सावंत' सिद्धार्थ चांदेकर, केतकी माटेगावकर, हेमल इंगळे, पल्लवी पाटील आदी कलाकारांनी निरुपाज भेट देत येथील साड्यांचे कौतुक केले आहे.





‘निरुपा सारीज’च्या संस्थापिका निरुपा तायडे म्हणाल्या, “भारतीय साडी ही केवळ फॅशन नसून संस्कृती आणि परंपरेची ओळख आहे. प्राजक्ता माळीसारख्या लोकप्रिय अभिनेत्रीने जागतिक मंचावर आमच्या साडीची निवड करणे हा आमच्यासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. कान्ससारख्या प्रतिष्ठित मंचावर ठाण्यातील ब्रँडची झळाळी पाहायला मिळाल्याने स्थानिक फॅशन उद्योगातही उत्साहाचे वातावरण असून, भारतीय पारंपरिक साड्यांची जागतिक लोकप्रियता पुन्हा अधोरेखित झाली आहे." सोशल मीडियावरही ‘निरुपाज सारीज’ला मोठा प्रतिसाद मिळत असून, ब्रँडच्या पारंपरिक आणि आकर्षक कलेक्शनची झलक nirupas.sarees_official/ वर पाहायला मिळते.

Comments
Add Comment

Babita Singh Reporting Release Date : ‘पाताळ लोक’च्या निर्मात्यांची नवी पेशकश; एक हत्या, दोन रहस्यं आणि स्वतःचा शोध घेणारा एक प्रवास

- प्राइम व्हिडिओने रोमांचक इन्व्हेस्टिगेटिव्ह ड्रामा ‘बबिता सिंग रिपोर्टिंग’च्या वर्ल्डवाइड प्रीमियरची

Actress Ananya Raj : अभिनेत्री अनन्या राजचं वयाच्या २८व्या वर्षी निधन; झोपेत घेतला अखेरचा श्वास

मुंबई : मनोरंजन विश्वातून दुःखद बातमी समोर आली आहे. अभिनेत्री अनन्या राजचं वयाच्या अवघ्या २८व्या वर्षी निधन झालं

Upcoming Web Series : सचिन तेंडुलकरच्या जिवलग मित्राची कहाणी लवकरच ओटीटीवर प्रदर्शित होणार; प्रमुख भूमिकेत कोण ?

मुंबई : क्रिकेट विश्वात काही खेळाडूंच्या वैयक्तिक जीवनाची चर्चा त्यांच्या खेळातील विक्रमांपेक्षाही अधिक झाली.

Ashwin Mushran : अभिनेता अश्विन मुश्रानच्या कारचा अपघात, स्थानिकांशी वाद घालतानाचा Viral Video

मडगाव : 'लगे रहो मुन्ना भाई', 'शहजादा', 'फॅशन', 'मैं तेरा हीरो' आणि 'देसी बॉईज' अशा निवडक हिंदी चित्रपटांतून चमकलेला

Govinda and Sunita Ahuja Controversy : सुनीता आहुजाच्या आरोपांवर गोविंदा संतापला; म्हणाला, लिमिटमध्ये राहा...!

मुंबई : बॉलिवूड अभिनेता गोविंदा व त्याची पत्नी सुनीता आहुजा यांच्यातील वैयक्तिक वाद आता जगजाहीर होऊ लागले आहेत.

Vijay & Trisha : घटस्फोटाच्या चर्चांनंतर विजय-त्रिशाचा VIDEO व्हायरल; नेमकं काय घडलं?

चेन्नई: तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय आणि प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री त्रिशा कृष्णन पुन्हा एकदा