मंत्री विखे-पाटील, प्रसाद लाड आज मनोज जरांगेंची भेट घेणार

मुंबई : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी येत्या ३० मे पासून कडक उन्हात आमरण उपोषणाची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर, राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील आणि भाजप आमदार प्रसाद लाड शुक्रवारी जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी जालना येथील अंतरवली सराटीत जाणार आहेत. सरकार आरक्षणाच्या मुद्द्यावर सकारात्मक असून, गेल्या दोन-तीन दिवसांत झालेल्या गतिमान हालचालींची माहिती जरांगे यांना दिली जाईल, असे विखे-पाटील यांनी स्पष्ट केले आहे.



मनोज जरांगे पाटील यांनी गुरुवारी अंतरवली सराटी येथे पत्रकार परिषद घेऊन सरकारला निर्वाणीचा इशारा दिला. भाजप नेते प्रसाद लाड यांनी काही दिवसांपूर्वी भेट घेऊनही सरकार दरबारी आरक्षणाबाबत कोणतीही ठोस हालचाल झाली नसल्याचे ते म्हणाले. "मी येत्या ३० तारखेला आमरण उपोषणाला बसणार आहे. देशाच्या इतिहासात झाले नसेल, असे हे उपोषण असेल. गेल्या वेळी उपोषणासाठी मंडप टाकला होता, पण यावेळी सावलीत बसून उपोषण करणार नाही. मे महिन्याच्या रणरणत्या उन्हात मी असाच जाऊन बसणार आहे. मेलो तर मेलो, पण मागे हटणार नाही. माझ्या समाजबांधवांनी अंतरवलीकडे येऊ नये," असे त्यांनी सांगितले.



जरांगे यांच्या इशाऱ्यानंतर पत्रकारांशी बोलताना राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सरकारची बाजू मांडली. "मी सातत्याने मनोज जरांगे पाटील यांच्या संपर्कात आहे. या संपूर्ण विषयाबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अतिशय सकारात्मक आहेत. गेल्या दोन दिवसांपासून आम्ही सातत्याने मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात आहोत. माझे सहकारी प्रसाद लाड आणि मी स्वतः शुक्रवारी मनोज जरांगे यांची भेट घेणार आहोत. आरक्षणाच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी सरकारी पातळीवर काय काय पावले उचलली गेली, याची सविस्तर कल्पना आम्ही त्यांना देणार आहोत", अशी माहिती विखे-पाटील यांनी दिली.

Comments
Add Comment

Maharashtra Government : बागणीतील ९८ घरांच्या अतिक्रमणाचा प्रश्न मार्गी लागणार; नियमानुकूलतेसाठी शासनाची परवानगी

मुंबई : सांगली जिल्ह्यातील बागणी गावातील ९८ घरांच्या अतिक्रमणाचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न आता

Malegaon : मालेगावमध्ये दीड लाखाचे एमडी जप्त

मालेगाव : शहरालगतच्या द्याने रमजानपुरा पोलिसांनी अवैध अमली पदार्थाची विक्री आणि तस्करी करणाऱ्यांवर मोठी

Indian Service Sector : भारतात सेवा क्षेत्रातले ५० टक्के कर्मचारी सतत नव्या नोकरीच्या शोधात

नवी दिल्ली : भारतातील व्यावसायिक सेवा क्षेत्रात ५० टक्के कर्मचारी सतत नव्या नोकरीच्या शोधात असतात. जास्त पगार

INDvsSL : भारताविरुद्धच्या कोलंबो कसोटीत तिसऱ्या दिवसअखेर श्रीलंका पिछाडीवर

कोलंबो : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना कोलंबो

Prabhadevi Water Pipeline : प्रभादेवीत एलफिन्स्टन पुलाजवळ जलवाहिनी फुटली

मुंबई : प्रभादेवीत एलफिन्स्टन पुलाजवळ जलवाहिनी फुटल्यामुळे हजारो लिटर पाणी वाहून गेले. सेनापती बापट मार्गावर ही

Healthy Drinks : चहा महागला म्हणून चिंता सोडा! सकाळी चहाऐवजी प्या 'हे' पेय; शरीर होईल डिटॉक्स अन् वजनही घटेल

साखर आणि चहाचे भाव वाढल्याने खिशावर पडणारा ताण कमी करण्यासाठी आणि आरोग्याला उत