Lionel Messi Statue : वाऱ्याच्या झोतामुळे मेस्सीचा पुतळा डगमगला !

सुरक्षेसाठी प्रशासनाचा पुतळा हटवण्याचा निर्णय


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :


फुटबॉल विश्वातील महान खेळाडू लिओनेल मेस्सी याच्या भारत भेटीनिमित्त उभारण्यात आलेला पुतळा आता धोकादायक ठरत असल्याने तो हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पश्चिम बंगालमधील कोलकाता शहरात उभारलेला हा २१ मीटर उंच सुवर्णरंगी पुतळा वाऱ्यामुळे

">डळमळीत होत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.



अर्जेंटिना आणि इंटर मियामी संघाचा तारा खेळाडू मेस्सी विश्वचषक करंडक उंचावत असल्याचे या पुतळ्यात दाखवण्यात आले होते. डिसेंबरमध्ये झालेल्या मेस्सीच्या भारत दौऱ्यानिमित्त हा पुतळा उभारण्यात आला होता.



पश्चिम बंगालचे आमदार शरद्वत मुखर्जी यांनी सांगितले की, “राज्य शासनाच्या अभियंत्यांनी तपासणी केल्यानंतर हा पुतळा सुरक्षित नसल्याचे आढळून आले आहे. जोरदार वाऱ्यामुळे तो हलताना
दिसत आहे.” बुधवारी कामगारांनी दोरांच्या सहाय्याने पुतळा सुरक्षित करण्याचा प्रयत्न केला. हा पुतळा शहरातील गजबजलेल्या रस्त्यावर उभारण्यात आला असल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान पुतळा नेमका कधी हटवला जाईल, याबाबत अद्याप स्पष्टता नसली तरी प्रशासनाने शक्य तितक्या लवकर

">तो हटवण्याची तयारी सुरू केली आहे. हा पुतळा अन्य ठिकाणी पुन्हा उभारला जाणार का, याबाबतही कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.


Tags
statuefootballLionel MessiArgentinaMessi staute

Comments
Add Comment

Pakistan Saudi Arabia : 'सऊदी अरबमध्ये भीक मागू नका’; पाकिस्तानने हज-उमराह यात्रेकरूंना का दिली कडक ताकीद?

इस्लामाबाद : पाकिस्तान सरकारने आपल्या नागरिकांना सौदी अरेबियात भीक मागू नये आणि परवानगीशिवाय पैसे गोळा करू

Donald Trump : भारताकडून शिका!’ ट्रम्प यांचा अमेरिकेच्या निवडणूक व्यवस्थेवर निशाणा; SAVE Act साठी दबाव

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी पुन्हा एकदा SAVE America Act मंजूर करण्यासाठी काँग्रेसवर

Hayden Panettiere Passes Away : बालकलाकार ते हॉलीवूड स्टार! 'हिरोज' फेम अभिनेत्री हेडन पॅनेटीयरचे वयाच्या ३६ व्या वर्षी निधन

लॉस एंजिलीस : हॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आणि बालकलाकार म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणारी 'हेडन

Indonesia Earthquake : इंडोनेशियाला पुन्हा भूकंपाचा धक्का; 5.7 तीव्रतेच्या भूकंपाने नागरिकांमध्ये भीती

इंडोनेशिया : इंडोनेशियामध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या शक्तिशाली भूकंपानंतर सोमवारी सकाळी पुन्हा एकदा

Europe Heatwave 2026 : युरोपमध्ये उष्णतेचा कहर! जूनमध्ये १६ हजारांहून अधिक मृत्यू; पुन्हा हीटवेव्हचा धोका

नवी दिल्ली : युरोपमध्ये यंदा तीव्र उष्णतेने मोठे संकट निर्माण केले आहे. जून महिन्यात जवळपास आठवडाभर सुरू

America Iran War : अमेरिका पराभव स्वीकारत नाही तोपर्यंत... इराणचा इशारा

तेहरान : अमेरिका पराभव स्वीकारत नाही तोपर्यंत सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या होर्मुझ सामुद्रधुनीवरील वाहतूक