Malegaon : मालेगावात प्रशासनाचे दावे हवेत विरले, ‘ड्रोन’ची २४ तास नजर तरीही मोसम नदी रक्ताने माखली

मालेगाव : मोसम नदीपात्रात (Mosam river) सोडण्यात येणारे जनावरांच्या कत्तलीचे रक्तमिश्रित पाणी आणि सायझिंग उद्योगांतील घातक रसायनांमुळे होणारे जलप्रदूषण तातडीने थांबवावे, या मागणीसाठी सार्वजनिक नागरी सुविधा समितीचे अध्यक्ष रामदास बोरसे यांनी आमरण उपोषण केले. जनावरांची अवैध कत्तल रोखण्यासाठी संवेदनशील भागांवर ‘ड्रोन कॅमेऱ्यां’द्वारे चोवीस तास नजर ठेवली जाईल, असे ठोस आश्वासन नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी उपोषणकर्त्यांना भ्रमणध्वनीद्वारे दिले. आणि प्रशासनाने मध्यस्थी केल्याने बोरसे यांनी आमरण उपोषण थांबवले.


मात्र प्रशासनातर्फे केल्या गेलेल्या विविध उपाययोजनांचे दावे मोसम नदीतील (Mosam river) रक्ताळलेल्या पाण्याने अक्षरशः फोल ठरल्याचे दिसून आले आहे. बकरी ईदच्या ( Eid ) निमित्ताने कुर्बानी देताना जनावरांची अवैध कत्तल रस्त्यावर होत असल्याने गटारांद्वारे रक्तमिश्रित पाणी थेट मोसम नदी पात्रात वाहून येते. याच पार्श्वभूमीवर यंदा याबद्दल विशेष खबरदारी घेण्यात आल्याचा मोठा गाजावाजा प्रशासनातर्फे करण्यात आला. मात्र,एवढे करूनही, गुरुवारी रक्तमिश्रित पाण्यामुळे मोसम नदीपात्र लाल झाल्याचे दृश्य दिसून आले.



उपाययोजना केवळ कागदावरच ?


त्यामुळे संतप्त लोकांनी उपाययोजना केवळ कागदावरच राहिल्या का,असा संतप्त सवाल प्रशासनाला केला आहे. आणि पुन्हा एकदा सार्वजनिक नागरी सुविधा समितीचे अध्यक्ष रामदास बोरसे यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समितीचे निखिल पवार, भाजपचे महानगरप्रमुख देवा पाटील, मराठा महासंघाचे भरत पाटील, गोरक्षक मच्छिंद्र शिर्के आदींनी या आंदोलनाला पाठिंबा दिला. यामुळे प्रशासनाची मोठी धांदल उडाल्याचे दिसून आले.


​मोसम नदीचे हे प्रदूषित पाणी पुढे थेट गिरणा धरणात जाते, जिथून मालेगाव (Malegaon) शहरासह नांदगाव (Nandgaon) व जिल्ह्यातील अनेक गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. हा प्रश्न थेट लाखो नागरिकांच्या आरोग्याशी निगडित आहे. यामुळे गेल्या १५ वर्षांपासून या समस्येच्या विरोधात मालेगावकर लढा देत आहेत.



‘एसटीपी प्लांट’ कधी कार्यान्वित होणार ?


शहरामधून येणारे दूषित पाणी मोसम नदी पात्रात न सोडता त्यावर प्रक्रिया करण्यासाठी उभारण्यात येणारा ‘एसटीपी प्लांट’ (सांडपाणी प्रक्रिया केंद्र) कार्यान्वित करण्यास अक्षम्य विलंब होत असल्याचे यापूर्वी आंदोलनकर्त्यांनी सांगितले आहे. हा प्रकल्प वेळेत कार्यान्वित होत नसल्याने जल प्रदूषणाची समस्या कायम आहे. त्यास जबाबदार असणाऱ्या ठेकेदार व अधिकाऱ्यांना महापालिका प्रशासन पाठीशी का घालत आहे, असा संतप्त सवाल यापूर्वी झालेल्या आंदोलनातील आंदोलकांनी उपस्थित केला. आश्वासने मिळाली आणि प्रशासनाच्या मध्यस्थीने आंदोलन थांबले मात्र मोसम नदी पुन्हा रक्ताने माखल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.

Comments
Add Comment

Ashish Shelar : Gen Z साठी मराठी चित्रपट निर्मितीत राज्य सरकार सहभागी होणार; आशिष शेलार यांची घोषणा

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील नव्या पिढीला, विशेषतः Gen Z प्रेक्षकांना आकर्षित करणाऱ्या विशेष चित्रपटाच्या

Marathi Mandatory : महाराष्ट्रात व्यावसायिक वाहनचालकांसाठी मराठी अनिवार्य; नियमांच्या अंमलबजावणीसाठी उद्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक

मुंबई : महाराष्ट्रात व्यावसायिक प्रवासी वाहने चालवणाऱ्या चालकांना आता व्यवहारिक मराठी भाषेचे ज्ञान असणे

Mangalagaur 2026 : आजपासून मंगळागौरला सुरूवात...जाणून घ्या शुभ मुहूर्त, सोपी पूजा पद्धत अन् पौराणिक कथा!

श्रावणातील पहिल्या मंगळवारी मंगळागौरीचे आगमन श्रावण महिन्याची चाहूल लागताच संपूर्ण महाराष्ट्रात सणांची

Nashik Crime : 37 वर्षांच्या हसीनाला नवा बॉयफ्रेंड मिळाला, मग प्रेमसंबंधात अडथळा ठरणाऱ्या जोडीदाराचा काटाच काढला ; अन् मृतदेह...

Nashik Crime : नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 15 वर्षांच्या लिव्ह-इन रिलेशनशिपचा (Live-in Relationship) रक्तरंजित शेवट

12th BRICS Meeting : नवी दिल्लीत आज १२वी BRICS पर्यावरण मंत्रिस्तरीय बैठक; हवामान बदल आणि पर्यावरणीय सहकार्यावर होणार मंथन

नवी दिल्ली : भारताच्या BRICS अध्यक्षतेअंतर्गत १२वी BRICS पर्यावरण मंत्रिस्तरीय बैठक आज नवी दिल्लीत आयोजित करण्यात

Pune News : पुणेकरांसाठी मोठी बातमी! पुरंदर विमानतळापर्यंत थेट बोगदा; मेट्रोसह वाहनांसाठी स्वतंत्र मार्ग

पुणे : पुणे (Pune) आणि आसपासच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पुरंदर येथे प्रस्तावित छत्रपती