जलजीवन मिशनच्या ५१ हजार योजनांचा आढावा; नदीजोड प्रकल्पाला प्राधान्य देणार

केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांच्या उपस्थितीत जलजीवन मिशनमधील योजनांचा दिल्लीत आढावा


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बैठकीला उपस्थित


नवी दिल्ली : महाराष्ट्रात सध्या सुमारे ५१ हजार जलजीवन मिशनच्या योजना सुरू असून त्यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. अपूर्ण किंवा त्रुटी असलेल्या योजनांची पूर्तता कशी करता येईल, तसेच पाण्याच्या स्रोतांशी संबंधित अडचणींवर मार्ग कसा काढता येईल, याबाबत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीतील अंत्योदय भवन, सीजीओ कॉम्प्लेक्स येथे जलजीवन मिशन आणि पाणीटंचाईच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराब पाटील, यांच्यासह सबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.


amp/"> amp/" class="section-post-content-internal-post-title">Nitesh Rane : ऐतिहासिक महत्त्व अबाधित ठेवून मोती तलावाचे पुनरुज्जीवन करणार - पालकमंत्री नितेश राणे

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडीचे वैभव असलेल्या प्रसिद्ध मोती तलावाचे मूळ ऐतिहासिक महत्त्व आणि वारसा अबाधित ठेवून त्याचे पुनरुज्जीवन केले ...


बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना शिंदे म्हणाले की, राज्यातील सर्व योजनांचा सखोल आढावा घेण्यात आला. अनेक योजना पूर्णत्वाच्या मार्गावर असून काही योजनांमध्ये तांत्रिक बदल आवश्यक ठरले आहेत. काही भागांमध्ये पाण्याचे स्रोत कोरडे पडल्याने निर्माण झालेल्या अडचणींवर उपाययोजना कशा करता येतील, यावरही सविस्तर चर्चा करण्यात आली.योजनांमधील त्रुटी दूर करून त्यांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी विविध पर्यायांवर विचारविनिमय झाला. संबंधित विभागांना आवश्यक त्या सुधारणा करून कामांना गती देण्याबाबतही सूचना देण्यात आल्या.


यावेळी राज्यासाठी महत्त्वाच्या ठरणाऱ्या नदीजोड प्रकल्पावर विशेष चर्चा करण्यात आली. हा प्रकल्प महाराष्ट्रातील विशेषतः मराठवाडा आणि इतर दुष्काळग्रस्त भागांसाठी वरदान ठरणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. या प्रकल्पामुळे सिंचनक्षेत्र वाढण्यास मदत होणार असून दुष्काळमुक्त महाराष्ट्राच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.पंतप्रधानांनीही नदीजोड प्रकल्पाला प्राधान्य दिले असून केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांनी बैठकीत त्याबाबत सकारात्मक भूमिका मांडल्याचे शिंदे यांनी नमूद केले. शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने आणि अधिकाधिक जमीन ओलिताखाली आणण्यासाठी ही बैठक अत्यंत उपयुक्त ठरल्याचे त्यांनी सांगितले.


amp/">
amp/" class="section-post-content-internal-post-title">Nitesh Rane : ऐतिहासिक महत्त्व अबाधित ठेवून मोती तलावाचे पुनरुज्जीवन करणार - पालकमंत्री नितेश राणे

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडीचे वैभव असलेल्या प्रसिद्ध मोती तलावाचे मूळ ऐतिहासिक महत्त्व आणि वारसा अबाधित ठेवून त्याचे पुनरुज्जीवन केले ...


दरम्यान, जलसंधारणासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘जलतारा’ उपक्रमाच्या विस्तारावरही बैठकीत चर्चा झाली. श्री श्री रविशंकर यांच्या संस्थेसोबत या उपक्रमासाठी सामंजस्य करार करण्यात आला असून त्याचे काम डॉ. पुरुषोत्तम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असल्याची माहिती शिंदे यांनी दिली.राज्यात सध्या सुमारे ६५ हजार जलतारा संरचना उभारण्यात आल्या आहेत. मात्र, भूजलपातळी वाढविण्यासाठी आणि पाणी अधिक प्रमाणात जमिनीत मुरावे यासाठी या उपक्रमाची व्याप्ती आणखी वाढविणे आवश्यक असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले. यामुळे भूजलसाठ्यात वाढ होऊन शेतकऱ्यांना मोठा लाभ मिळेल, असेही त्यांनी सांगितले.

Tags
Devendra FadnavisEknath Shinderiver-linking projectJal Jeevan Mission'CR Patil

Comments
Add Comment

RAW : 'रॉ' अधिकारी असल्याचे भासवून लाखोंची खंडणी मागणारा जेरबंद

गुजरात : गुजरातमधील(GUJRAT)राजकोट येथील एका धान्य व्यापाऱ्याचे बँक खाते ऑनलाईन व्यवहारानंतर गोठवून,स्वतःला

Transportation Guidelines : विद्यार्थी वाहतूक अधिक सुरक्षित करण्यासाठी सरकारची नवी नियमावली;उल्लंघन करणाऱ्या चालकांवर होणार कठोर कारवाई

मुंबई : राज्य शासनाने शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी महाराष्ट्र मोटार वाहन नियम,२०२६ अंतर्गत

Mirabai Chanu : मीराबाई चानूचा सुवर्ण जलवा! ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत हॅट्रिक, पंतप्रधान मोदींसह देशभरातून कौतुकाचा वर्षाव

नवी दिल्ली : भारतीय वेटलिफ्टिंगची स्टार खेळाडू मीराबाई चानूने (Mirabai Chanu) पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. ग्लासगो येथे

NTA : पेपरफुटीवर केंद्राचा 'मास्टरप्लॅन'! NTA साठी 'सुपर 6' समितीची नियुक्ती

पेपर लीकवर केंद्राचा मोठा प्रहार! दोषींना १० वर्षांपर्यंत तुरुंगवास, ₹१० कोटींपर्यंत दंड; संसदेत सोमवारी

PM Narendra Modi : 'युवकांना स्वावलंबी बनवणे हे सरकारचे ध्येय'

नवी दिल्ली: 'विकसित वायब्रंट व्हिलेज कार्यक्रम २०२६' च्या सहभागींसोबत रविवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे

Amit Shah : युवा पिढी आणि विद्यार्थी आमच्यासाठी महत्वाचे : अमित शाह

धर्मेंद्र प्रधान यांनी केलेल्या कामाचंही कौतुक नवी दिल्ली : भाजप कार्यकर्त्यांसाठी पदापेक्षा देश खूप जास्त