Nitesh Rane : ऐतिहासिक महत्त्व अबाधित ठेवून मोती तलावाचे पुनरुज्जीवन करणार - पालकमंत्री नितेश राणे

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडीचे वैभव असलेल्या प्रसिद्ध मोती तलावाचे मूळ ऐतिहासिक महत्त्व आणि वारसा अबाधित ठेवून त्याचे पुनरुज्जीवन केले जाईल. हा तलाव पर्यटन आणि सौंदर्यीकरणासह पर्यटकांच्या आकर्षणाचे प्रमुख केंद्र म्हणून विकसित केला जाणार असून, आधुनिक सुविधांसह त्याचा कायापालट करण्यात येईल, अशी माहिती मत्स्यव्यवसाय, बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी बुधावरी दिली.


मंत्रालयात मंत्री नितेश राणे यांच्या दालनात मोती तलावाच्या पुनरुज्जीवन आणि विकासाच्या संदर्भात बुधावरी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत तलावाच्या कायापालटाबाबतचे सविस्तर सादरीकरण (प्रेझेंटेशन) करण्यात आले. या सादरीकरणानंतर तलावाचा ऐतिहासिक वारसा जपत तेथे कोणत्या आधुनिक सुविधा निर्माण करता येतील, यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. कोकणातील पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि सावंतवाडीच्या वैभवात भर घालण्यासाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा ठरणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.



या महत्त्वपूर्ण बैठकीला आमदार दीपक केसरकर, सावंतवाडी नगरपालिकेच्या नगराध्यक्षा श्रद्धा लखमराजे भोसले, लखमराजे भोसले यांच्यासह वास्तुविशारद स्वरदा पोयरेकर, श्रद्धा कदम आणि अजय नायक उपस्थित होते. या विकास आराखड्यामुळे आगामी काळात मोती तलावाचे रूप पूर्णपणे बदलणार असून, स्थानिक नागरिकांसह पर्यटकांसाठी हे एक उत्तम पर्यटन स्थळ ठरणार आहे.

Comments
Add Comment

106 Maharashtra Martyrs To Be Honored : संयुक्त महाराष्ट्राच्या १०६ हुतात्म्यांना नव्या प्रशासकीय इमारतीत मानाचे स्थान मिळणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य सचिवांना कार्यवाहीचे निर्देश मुंबई : संयुक्त महाराष्ट्राच्या

Ganpati Special Trains : चाकरमान्यांचे हाल! ऐन गणपती उत्सवात कोकण-उत्तर महाराष्ट्रातील 3 महत्त्वाच्या गाड्या रद्द

मुंबई : मध्य रेल्वेने मार्गक्षमता, वेळापत्रक आणि परिचालनाचा ताळमेळ साधत दादर-गोरखपूर आणि दादर-बलिया या विशेष

Maharashtra Rain : राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; 6 जिल्ह्यांना यलो अलर्ट, घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याचे चित्र आहे. मात्र, आता पुन्हा एकदा पावसाचा

Pune Weather : पुण्यात रविवारी पावसाच्या सरींची शक्यता; घाटमाथ्यावर यलो अलर्ट

पुणे : रविवार, 16 ऑगस्ट रोजी पुणे शहर आणि परिसरात ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी पडण्याची शक्यता

Chhagan Bhujbal : जातनिहाय जनगणनेची अधिसूचना जारी करणे हा सामाजिक न्यायाच्या दिशेने ऐतिहासिक निर्णय – मंत्री छगन भुजबळ

मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आभार पत्र मुंबई : केंद्र सरकारने जनगणना

Eknath Shinde : स्वातंत्र्यदिनी राज्यातील १२४ आरोग्य संस्थांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण

जनतेच्या दारात दर्जेदार उपचार पोहोचवण्याचा निर्धार मुंबई : “हे सरकार फक्त आदेश देणारे नाही, तर जनतेच्या दारात