Ahilyanagar : एक नाही तर तब्बल ५५ अल्पवयीन मुली झाल्या गरोदर . . . नक्की काय आहे प्रकरण ?

अकोले : अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. महिला आणि बालविकास विभागाच्या सर्वेक्षणात तालुक्यात ५५ अल्पवयीन विवाहित मुली आणि एक अविवाहित अल्पवयीन मुलगी गरोदर असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यातील काही मुलींची प्रसूती देखील झाल्याचं समोर आले. कोले आणि राजूर प्रकल्पांतर्गत अंगणवाडी सेविकांकडून दरमहा गरोदर आणि स्तनदा मातांचे सर्वेक्षण केलं जातं. या सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती सरकारी यंत्रणेला मिळाली आहे. केंद्र सरकारच्या 'मातृत्व वंदना योजने'चा लाभ घेण्यासाठी आलेल्या अर्जांमध्येही या अल्पवयीन मुलींची नावं आढळल्यानं प्रशासनाला जाग आली आहे.



सामाजिक दबाव, बदनामीची भीती आणि कायदेशीर कारवाईच्या धाकामुळे अनेक बालविवाहांची नोंदच होत नाही. मुली पळून जाऊन लग्न करतील या भीतीने अनेक पालक अल्पवयातच मुलींचे लग्न लावून देत आहेत. त्यामुळे प्रत्यक्षातील गरोदर अल्पवयीन मुलींची संख्या यापेक्षा कितीतरी अधिक असण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी महाराष्ट्र राज्य बालहक्क आयोगाने सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी होत आहे.

बालविवाह रोखण्यासाठी ग्रामस्तरीय बाल संरक्षण समित्या सक्रिय करणे, लग्नाच्या वेळी वधू-वरांचे जन्मदाखले सक्तीचे करणे आणि अल्पवयीन मुलींशी विवाह करणाऱ्यांवर थेट फौजदारी गुन्हे नोंदवणे आवश्यक आहे, अशीही मागणी होत आहे.
Comments
Add Comment

Nitesh Rane : ही महादेवाची भूमी, इथे आय लव्ह महादेवच चालणार; मंत्री नितेश राणेंची गर्जना

मुंबई : ही महादेवाची भूमी, इथे आय लव्ह महादेवच चालणार; अशी गर्जना मंत्री नितेश राणे यांनी केली. ते हिंदू रक्षक

CM Devendra Fadnavis : 'भारताचे संविधान आणि लोकशाही प्रत्येक व्यक्तीला मोठी संधी देऊ शकते'

नागपूर : तरुणांना मुख्यमंत्री किंवा

Nagpur News : महाराष्ट्राची परंपरा लाभलेल्या ढोल ताशाला जागतिक नामांकन

नागपूर : शिक्षण कौशल्य, क्रीडा स्टार्टअप आदी क्षेत्रात युवा पिढीचा सकारात्मक सहभाग आहे. त्यांचा हा सहभाग

Dog Attack : दोन वर्षांच्या चिमुकलीवर भटक्या कुत्र्याचा जीवघेणा हल्ला

बीड : बीड शहरातील शिवतेज नगर भागात रेणू हॉस्पिटल परिसरात घराबाहेर खेळत असलेल्या दोन वर्षांच्या चिमुकलीवर मोकाट

Piyush Goyal : मंत्री पीयूष गोयल सोमवारपासून चार दिवसांच्या जपान दौऱ्यावर

नवी दिल्ली : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल, 24 ते 27 ऑगस्ट 2026 या कालावधीत जपानला भेट देणार आहेत. या

CM Devendra Fadnavis : धर्मादाय संस्था आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष यांच्यात सामजंस्य करार करणार

मुंबई : राज्यभरातील मोठ्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांची सोय व्हावी