Nashik :नाशिकच्या TCS मध्ये कॉर्पोरेट जिहाद तर मुंबईत बँक जिहाद ? नरिमन पॉइंटच्या शाखेतील धक्कादायक घटना

मुंबई : नाशिकच्या TCS मधील कॉर्पोरेट जिहादचे प्रकरण उजेडात आले, पोलिसांनी गुन्हे नोंदवले आणि कायदेशीर कारवाई सुरू झाली. हे प्रकरण ताजे असतानाच देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतून बँक जिहादचे वृत्त आले आहे. धक्कादायक म्हणजे मंत्रालयापासून जवळ नरिमन पॉइंट परिसरात बँक जिहाद सुरू असल्याची बातमी आली आहे.


मुंबईतील बड्या बँकेत काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप तिच्या पतीने केला आहे. महिलेचा पती एका खासगी कंपनीत कार्यरत आहे.


पतीच्या तक्रारीनुसार मागील काही दिवसांपासून त्याच्या पत्नीचे वर्तन इस्लाम धर्मीय महिलांसारखेच झाले आहे. ती इस्लाम धर्माकडे वळली असून त्या धर्मातील चालीरीतींचे पालन करू लागली आहे. महिलेने स्वतःच्या आठ वर्षांच्या मुलीचंही धर्मांतर करण्याची इच्छा बोलून दाखवली. हे ऐकून पतीला जबर मानसिक धक्का बसला. त्याने ही बाब जवळच्या लोकांना सांगितली आणि बँक जिहादचं वृत्त सार्वजनिक झालं.


बँकेतले काही कर्मचारी महिलेवर धर्मांतरासाठी दबाव टाकत आहेत, असा आरोप तक्रारदार पतीने केला आहे. पत्नीचे बँकेतील एका सहकाऱ्यासोबत संबंध असून त्याच व्यक्तीनं तिच्यावर इस्लाम स्वीकारण्यासाठी दबाव किंवा प्रभाव टाकल्याचा संशय पतीने व्यक्त केला आहे. हिंदू महिलांना आर्थिक आणि शारीरिकदृष्ट्या जाळ्यात ओढून त्यांचं धर्मांतर करणं या हेतूने काही जण बँकेत कार्यरत आहे, असा आरोप तक्रारदार पतीने केला आहे. पीडित महिलेचे आर्थिक शोषण पण सुरू आहे. या महिलेला बँकेतून कर्ज काढायला लावलं होतं आणि त्या कर्जाची मोठी रक्कम संबंधित व्यक्तीच्या खात्यावर वळवण्यात आली होती. अशा प्रकारे एका सुशिक्षित आणि जबाबदार पदावर असलेल्या महिलेला पद्धतशीरपणे जाळ्यात अडकवून तिला धर्मांतराच्या उंबरठ्यावर उभं केल्याची तक्रार महिलेच्या पतीने केली आहे.



प्रकरण हाताबाहेर जात असल्याची जाणीव होताच पतीने पत्नी आणि मुलीला राजस्थानमधील उदयपूर येथील मूळ गावी नेले. तिथेही या जिहादी प्रवृत्तीने पाठलाग केला. गावातील घरातून १८ एप्रिल २०२६ रोजी पत्नी आणि मुलगी दोघी गायब झाल्या. संबंधित बँकेचा कर्मचारी त्यांना तिथून घेऊन गेल्याचा संशय पतीला आहे. याप्रकरणी उदयपूरमधील सुखेर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस तपास करत आहेत. पीडित पतीने बँकेच्या वरिष्ठ व्यवस्थापनाकडेही लेखी तक्रार केली आहे. आपल्या पत्नीची तातडीने उदयपूर किंवा आसपासच्या परिसरात बदली करण्यात यावी, जेणेकरून तिला या जाळ्यातून बाहेर काढता येईल, अशी विनंती पतीने केली आहे. पण बँक व्यवस्थापनाने सध्या या मुद्यावर कोणताही निर्णय घेतलेला नाही. प्रसारमाध्यमां

Comments
Add Comment

CM Devendra Fadnavis : धर्मादाय संस्था आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष यांच्यात सामजंस्य करार करणार

मुंबई : राज्यभरातील मोठ्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांची सोय व्हावी

Prakash Abitkar : गावापासून जिल्हा रुग्णालयापर्यंत ‘मानकांनुसार आरोग्यसेवा’

मुंबई : राज्यातील नागरिकांना त्यांच्या गरजेनुसार दर्जेदार, सुलभ आणि वेळेत आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी

Rain In Maharashtra : महाराष्ट्रात पाऊस पुन्हा फॉर्मात येणार, कोणत्या जिल्ह्यांमध्ये जोरात बरसणार ?

मुंबई : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या पावसाने पुन्हा एकदा महाराष्ट्राकडे मोर्चा वळवल्याचे चित्र आहे.

Ashish Shelar : गणेशमूर्ती आगमन मार्गांची २४ तासांत पाहणी; प्रशासकीय कसूर आढळल्यास कारवाई - आशिष शेलार

मुंबई : भुलेश्वरचा राजा गणेश मंडळाच्या गणेशमूर्ती आगमन सोहळ्यात झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील

Weather Update : महाराष्ट्रात सोमवारी कोण कोणत्या भागात पावसाची शक्यता ?

मुंबई : हवामान खात्याच्या अंदाजानुसार सोमवार २४ ऑगस्ट २०२६ रोजी महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे.

Indian Railway : भारतीय रेल्वेचा नवा विक्रम; पहिल्या डबल-स्टॅक लाँग-हॉल कंटेनर ट्रेनची यशस्वी धाव

मुंबई : भारतीय रेल्वेने मालवाहतुकीच्या क्षेत्रात महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. जवाहरलाल नेहरू पोर्ट (JNPT) येथून