नाशिक : शासकीय नियमांची ऐशीतैशी, कारागृह अधिकाऱ्यांची जामिनावरील आरोपीसोबतच मद्यपार्टी

नाशिक : नाशिकरोड परिसरातील कारागृह अधिकाऱ्यांच्या निवासस्थानाबाहेर रात्री उशिरापर्यंत मद्यपार्टी रंगल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे या पार्टीत एका संशयित आरोपीची उपस्थितीने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. कारागृहातील तीन वरिष्ठ तुरुंग अधिकारी चक्क फसवणुकीच्या गुन्ह्यातील एका कुख्यात आरोपीसोबत राजरोसपणे दारू पार्टी करत असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.



शासकीय नियमांची पुरती ऐशीतैशी करत या अधिकाऱ्यांनी चक्क कारागृह परिसरातील आपल्या निवासस्थानासमोरच मद्यपार्टीचा आनंद घेतल्याने पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कारागृहाचे तिघे वरिष्ठ तुरुंग अधिकारी या व्हिडिओमध्ये आरोपीसोबत मद्य पार्टीचा आनंद घेताना स्पष्ट दिसत आहेत. धकाकदायक म्हणजे आरोपी हा फसवणुकीच्या गुन्ह्यात याच नाशिकरोड कारागृहात दोन वेळेस शिक्षा भोगून सध्या जामिनावर बाहेर आहे. त्याचे नाव गौरव असल्याची माहिती आहे.


खरेतर कोणत्याही पोलीस किंवा कारागृह अधिकाऱ्याला आरोपीशी कुठल्याही प्रकारचे संबंध ठेवण्यास कायद्याने सक्त मनाई आहे. मात्र, या तिन्ही अधिकाऱ्यांनी सर्व नियम धाब्यावर बसवून, याच आरोपीच्या पैशांवर मद्याच्या सुरावटी उडवल्याचे प्राथमिक चौकशीत समोर येत आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नाशिकरोड परिसरात आणि पोलीस वर्तुळात एकच खळबळ माजली असून अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.



या संपूर्ण प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि एका वरिष्ठ अधिकारी याचा इतिहास आधीपासूनच डागांनी माखलेला आहे. यापूर्वी अनेकदा वरिष्ठांचे आदेश डावलल्यामुळे त्याला तब्बल तीन वेळा निलंबित करण्यात आलेले आहे. त्यांच्यावर यापूर्वी गंभीर गैरवर्तणुकीचे ठपके ठेवण्यात आले आहेत. एका प्रकरणात तर थेट आरोपीच्या पत्नीकडून आर्थिक फायदा लाटून आरोपीला मदत केल्याचा गंभीर आरोपही त्यांच्यावर सिद्ध झालेला आहे. तरीही, सुधारण्याची कोणतीही चिन्हे न दाखवता या अधिकाऱ्याने पुन्हा एकदा शासकीय जागेतच आरोपीसोबत मैफल जमवून कारागृह प्रशासनाची नाचक्की केल्याची चर्चा कारागृह रक्षकांमध्ये आहे. दरम्यान आता या तिन्ही अधिकाऱ्यांवर आता काय कारवाई होते, याकडे नाशिककरांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

Ganpati Special Trains : चाकरमान्यांचे हाल! ऐन गणपती उत्सवात कोकण-उत्तर महाराष्ट्रातील 3 महत्त्वाच्या गाड्या रद्द

मुंबई : मध्य रेल्वेने मार्गक्षमता, वेळापत्रक आणि परिचालनाचा ताळमेळ साधत दादर-गोरखपूर आणि दादर-बलिया या विशेष

Maharashtra Rain : राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; 6 जिल्ह्यांना यलो अलर्ट, घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याचे चित्र आहे. मात्र, आता पुन्हा एकदा पावसाचा

Pune Weather : पुण्यात रविवारी पावसाच्या सरींची शक्यता; घाटमाथ्यावर यलो अलर्ट

पुणे : रविवार, 16 ऑगस्ट रोजी पुणे शहर आणि परिसरात ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी पडण्याची शक्यता

Europe Heatwave 2026 : युरोपमध्ये उष्णतेचा कहर! जूनमध्ये १६ हजारांहून अधिक मृत्यू; पुन्हा हीटवेव्हचा धोका

नवी दिल्ली : युरोपमध्ये यंदा तीव्र उष्णतेने मोठे संकट निर्माण केले आहे. जून महिन्यात जवळपास आठवडाभर सुरू

Sunday Mega Block : रविवारचा मेगाब्लॉक; मध्य रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर वाहतुकीत बदल; पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना मोठा दिलासा

मुंबई : स्वातंत्र्यदिनाच्या सुट्टीनंतर रविवारी, 16 ऑगस्ट रोजी मुंबईकरांच्या लोकल प्रवासावर मेगाब्लॉकचा परिणाम

Weather Alert India : देशातील 12 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; नेमका कुठे आणि कसा पाऊस पडणार? जाणून घ्या

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या हवामान प्रणालीमुळे देशातील अनेक भागांत मान्सून सक्रिय झाला