LSG VS PBKS : आज आपीएलमध्ये पंजाब विरुद्ध लखनउ आमने सामने, पंजाबसाठी डु ओर डाय स्थिती,

सामना जिंकल्यानंतरही दुसऱ्यांच्या निकालावर अवलंबून राहवे लागेल


IPL 2026 : आयपीएल २०२६ मध्ये आज २३ मे रोजी पंजाब किंग्स विरुद्ध लखनउ सुपर जायंट्समध्ये निर्णायक लढत होणार आहे. हा सामना लखनउच्या इकाना स्टेडियम येथे खेळला जाणार आहे. आयपीएल २०२६ च्या पहिल्या हाल्फमध्ये सलग सहा सामने जिकणारी पंजाब पुढचे सहा सामने हरली आहे. त्यामुळे त्याना प्लेऑफसाठी दुसऱ्या संघावर अवलंबून राहवे लागत आहे.श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात पंजाबने पहिल्या सात पैकी सहा सामने जिंकले होते ,तर संघाचा एक सामना पाऊसामुळे वाया गेला होता, पण पंजाबने सध्या सहा सामन्यात पराभव पत्कारले आहे. १३ गुणांसह संघ गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे. दुसरीकडे लखनउ १३ पैकी फक्त चार सामने जिंकले आहेत आणि ते प्लेऑफच्या रेसमधून बाहेर झाले आहेत.


पंजाबसाठी या हंगामात प्रभसिमरने १३४ सामन्यात ४४१ धावा केल्या आहेत, तर गोलंदाजीत अर्शदिप सिंहने १३ सामन्यांत १४ विकेट्स घेतल्या आहेत. लखनउसाठी मिचेल मार्शने या हंगामात सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याने १३ सामन्यात ५६३ धावा केल्या आहेत.प्रिन्स यादवने १३ सामन्यात संघासाठी सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत.


हेड टू हेड


आयपीएलमध्ये दोन्ही संघात आतापर्यंत सात सामने झाले आहेत. यात लखनऊने 3 आणि पंजाबने 4 सामने जिंकले आहेत. यांच्यातला एक सामना टाय राहिला होता. या हंगामात दोन्ही संघ दुसऱ्यांदा आमनेसामने येतील. पहिल्या सामन्यात पंजाबने आपल्या होमग्राऊंडवर लखनऊला हरवले होते.


कशी असेल खेळपट्टी ?


इकाना स्टेडियमच्या पिचवर फिरकी गोलंदाजांना खूप मदत मिळते आणि फलंदाजांसाठी मोठे फटके मारणे सोपे नसते. सुरुवातीच्या षटकांमध्ये वेगवान गोलंदाजांनाही मूव्हमेंट आणि स्विंग मिळते, जी फलंदाजांविरुद्ध प्रभावी ठरू शकते.या खेळपट्टीवर आतापर्यंत आयपीएलचे २८ सामने खेळले गेले आहेत. ११ वेळा प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने विजय मिळवला आहे, तर १५ वेळा लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाला विजय मिळाला आहे. एक सामना बरोबरीत सुटला आणि एकाचा निकाल लागला नाही.


संभाव्य प्लेइंग-XI


लखनऊ- मिचेल मार्श, जोश इंग्लिस, निकोलस पूरन, आयुष बडोनी, ऋषभ पंत (कर्णधार आणि यष्टिरक्षक), अब्दुल समद, शाहबाज अहमद, मोहसिन खान, मयंक यादव, आकाश सिंग, प्रिन्स यादव. इम्पॅक्ट प्लेयर: दिग्वेश सिंग राठी


पंजाब- प्रियांश आर्या, प्रभसिमरन सिंग (यष्टीरक्षक), कूपर कोनोली, श्रेयस अय्यर (कर्णधार), शशांक सिंग, सूर्यांश शेडगे, अजमतुल्लाह ओमरझाई, हरप्रीत ब्रार, झेवियर बार्टलेट, लॉकी फर्ग्युसन, अर्शदीप सिंग.इम्पॅक्ट प्लेयर: युजवेंद्र चहल

Comments
Add Comment

UEFA Super Cup 2026 : PSG चा Aston Villa वर 2-1 ने विजय; सलग दुसऱ्यांदा Super Cup वर नाव!

साल्झबर्ग : Paris Saint-Germain (PSG) ने Aston Villa वर 2-1 असा रोमांचक विजय मिळवत 2026 UEFA Super Cup आपल्या नावावर केला. 12 ऑगस्ट 2026 रोजी ऑस्ट्रियातील

अजिंक्य रहाणेची नवी इनिंग सुरू होणार

मुंबई : भारतीय कसोटी संघाचा माजी कर्णधार अजिंक्य रहाणे आता खेळाडू म्हणून नव्हे, तर समालोचकाच्या नव्या भूमिकेत

Cristiano Ronaldo Marriage : अखेर रोनाल्डोने जॉर्जिनासोबत थाटला संसार! 10 वर्षांच्या प्रेमकहाणीला लग्नाची सुंदर किनार

फुटबॉलविश्वातील दिग्गज स्टार क्रिस्टियानो रोनाल्डोच्या चाहत्यांसाठी मोठी आणि आनंदाची बातमी आहे. रोनाल्डोने

IND vs AFG: भारत विरुद्ध अफगाणिस्तान टी-20 मालिकेचं वेळापत्रक जाहीर; दिल्लीत रंगणार सामना

भारत आणि अफगाणिस्तान (IND vs AFG) यांच्यात लवकरच एका रोमांचक टी-20 मालिकेचे आयोजन केले जाणार आहे. या मालिकेची चाहते

Abishek Porel : क्रिकेटपटू अभिषेक पोरेल हुगळीत अटक; कथित बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई

दिल्ली कॅपिटल्सचा स्टार खेळाडू आणि बंगालचा क्रिकेटपटू अभिषेक पोरेल याला हुगळी येथे एका कथित बलात्कार प्रकरणात

Sourav Ganguly : क्रिकेटच्या ‘दादा’च्या कुटुंबावर संकट? गांगुली दाम्पत्याला जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत तक्रार दाखल

कोलकाता : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि ‘दादा’ म्हणून प्रसिद्ध असलेला सौरव गांगुली (Sourav Ganguly) आणि त्याची