IPL 2026 Playoff Scenarios : 4 संघ... 4 सामने... पण तिकीट फक्त एकालाचं! IPL पॉइंट्स टेबलमध्ये ट्विस्ट

IPL 2026 Playoff Scenarios : आयपीएल 2026 आता अखेरच्या टप्प्यात आहे. प्लेऑफची शर्यत दिवसेंदिवस अधिकच रंगतदार होत आहे. आतापर्यंत 3 संघांनी प्लेऑफमधील आपली जागा निश्चित केली आहे, मात्र चौथ्या स्थानासाठी अजूनही जबरदस्त संघर्ष सुरू आहे. राजस्थान रॉयल्स, पंजाब किंग्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स या चार संघांमध्ये शेवटच्या एका जागेसाठी थरारक लढत सुरू आहे. लीग स्टेजमधील आता अवघे 4 सामने बाकी असल्याने प्रत्येक चेंडू आणि प्रत्येक धाव महत्त्वाची आहे. चाहत्यांमध्येही प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. चला तर मग जाणून घेऊया प्लेऑफचे संपूर्ण समीकरण….



राजस्थान रॉयल्ससाठी सर्वात सोपं समीकरण


या हंगामात राजस्थान रॉयल्सने दमदार कामगिरी केली आहे. संघाने 13 पैकी 7 सामन्यांत विजय मिळवत 14 गुणांची कमाई केली आहे. राजस्थानचा अजून एक सामना बाकी असून तो मुंबई इंडियन्सविरुद्ध होणार आहे. या सामन्यात राजस्थानने विजय मिळवला तर संघ थेट प्लेऑफमध्ये प्रवेश करेल. मात्र पराभव झाल्यास राजस्थानचं गणित इतर निकालांवर अवलंबून राहील.



पंजाब किंग्सची अवस्था बिकट


पंजाब किंग्सने हंगामाची सुरुवात शानदार केली होती. पण त्यानंतर संघाची गाडी रुळावरून घसरली. पंजाबने सलग 6 सामने गमावले आहेत. त्यामुळे प्लेऑफचं भविष्य आता त्यांच्या हातात राहिलेलं नाही. पंजाबला आपला अखेरचा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावा लागणार आहे. त्याचबरोबर राजस्थान रॉयल्स आणि केकेआर या दोन्ही संघांचा पराभव होण्याचीही त्यांना आशा ठेवावी लागेल. शिवाय केकेआर विरुद्ध डीसी सामन्यावर पंजाबची बारकाईने नजर असेल, कारण केकेआरने मोठ्या फरकाने विजय मिळवला तर पंजाबचं समीकरण आणखी बिघडू शकतं.



केकेआरसमोरही कठीण आव्हान


अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील कोलकाता नाईट रायडर्ससाठीही प्लेऑफचा मार्ग सोपा नाही. केकेआरला दिल्ली कॅपिटल्सविरुद्धचा अखेरचा सामना जिंकणं अत्यावश्यक आहे. पण फक्त विजय पुरेसा ठरणार नाही. राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्स या दोन्ही संघांनी आपले शेवटचे सामने गमावले तरच त्यांना प्लेऑफमध्ये चौथ्या संघाच्या रूपात संधी मिळू शकते.



दिल्ली कॅपिटल्सचं स्वप्न जवळपास अशक्य


दिल्ली कॅपिटल्ससाठी प्लेऑफमध्ये पोहोचणं जवळपास अशक्य झालं आहे. राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्स या दोन्ही संघांचा पराभव झाला आणि केकेआरविरुद्धच्या अखेरच्या सामन्यात मोठ्या फरकाने विजय मिळाला तरच दिल्ली प्लेऑफमध्ये जाईल. नाही तर त्यांनाही परतीची वाट धरावी लागणार आहे.

Comments
Add Comment

National Sports Awards 2025 : यंदाचा 'खेळरत्न' पुरस्कार हुकला! दिव्या देशमुख, तेजस्विन शंकरसह १७ खेळाडूंना 'अर्जुन पुरस्कार' घोषित

क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च आणि मानाच्या मानल्या जाणाऱ्या 'राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०२५' National Sports Awards 2025) ची घोषणा

National Sports Awards : राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची घोषणा, १७ खेळाडूंना अर्जुन पुरस्कार, विजेत्यांमध्ये अनेक दिग्गज खेळाडू

नवी दिल्ली : केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०२५ च्या विजेत्यांची

Rishabh Pant New Record : षटकारांचं शतक तेही सर्वात जलद! रिषभ पंतने रचला इतिहास; अशी कामगिरी करणारा ठरला पहिलाच भारतीय

गॉल : भारताचा स्टार विकेटकीपर-बॅटर रिषभ पंतने (Rishabh Pant) श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या डावात इतिहास

IND vs SL 1st Test: मैदानातून थेट हॉस्पिटलमध्ये! श्रीलंकेच्या अनुभवी खेळाडूला दुखापत; गॉल टेस्टमध्ये नेमकं काय घडलं?

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात गॉल येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी श्रीलंकेच्या

Pro Govinda League 2026 : दहीहंडीचा राष्ट्रकुल व ऑलिंपिकमध्ये समावेश होणार ? 'प्रो गोविंदा'बाबत मोठी अपडेट

मुंबई : प्रो गोविंदा लीगच्या चौथ्या हंगामाचा १६ ऑगस्ट रोजी दिमाखदार प्रारंभ झाला. भारताच्या टी-२० विश्वचषक

IND vs SL Galle Test : भारतापाठोपाठ श्रीलंकाही पहिल्या डावात 'ऑलआऊट', जाणून घ्या गॉल कसोटीत तिसऱ्या दिवसअखेर भारताकडे किती धावांची आघाडी ?

गॉल : पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी सोनल दिनुषाच्या पहिल्यावहिल्या कसोटी शतकानंतरही भारतीय