Bandra News : वांद्रे स्टेशन परिसरात अतिक्रमण हटवताना दगडफेक; ४ पोलीस, ६ आंदोलक जखमी

मुंबई : वांद्रे पूर्वेकडील बेहरामपाडा परिसरात रेल्वेच्या जागेवरील अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईदरम्यान मंगळवारी रात्री तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. पश्चिम रेल्वेकडून सुरू असलेल्या कारवाईला स्थानिकांकडून विरोध करण्यात आला. यावेळी जमावाकडून दगडफेक करण्यात आल्याने ४ पोलीस कर्मचारी आणि ६ आंदोलक जखमी झाले.



ही घटना वांद्रे टर्मिनसजवळील गरीब नगर परिसरात घडली. अतिक्रमण हटवण्यासाठी रेल्वे प्रशासन आणि पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले होते. कारवाईदरम्यान अचानक काही नागरिक आक्रमक झाले आणि त्यांनी दगडफेक सुरू केली. त्यामुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.


जखमींना तातडीने भाभा रुग्णालय आणि व्ही. एन. देसाई रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. बहुतांश जखमींना रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले असून एका आंदोलकाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.


घटनेनंतर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

Comments
Add Comment

Cyprus and India : सायप्रस आणि भारत यांच्यातील सांस्कृतिक संबंध दृढ

सायप्रस प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष निकोस क्रिस्टोडौलिडेस 'इश्का' बॉलिवूड चित्रपटाचा थाटात मुहूर्त मुंबई :

Bandra Encroachment Removal Campaign : वांद्रे स्थानकाबाहेर अतिक्रमण हटाव मोहीम; अनधिकृत मशिदीवर महापालिकेची कारवाई

मुंबई : मुंबईतील वांद्रे स्थानकाबाहेरील परिसरात आज सकाळी मोठी अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली. या

IPL 2026 : आरसीबीसाठी दिलासादायक बातमी! विराट कोहलीचा ओपनिंग पार्टनर प्लेऑफपूर्वी संघात परतणार...

RCB : आयपीएल २०२६ मध्ये अनेक खेळाडू दुखापतीमुळे संघातून बाहेर झाले आहेत. त्यामुळे संघांना त्याचा मोठा फटका बसला

भूमी अभिलेख विभागाचा; राज्यात ५० नवी कार्यालये सुरु होणार; १० हजार पदांच्या आकृतीबंधालाही मूर्तरूप

मुंबई : प्रशासकीय कामकाज लोकाभिमुख आणि वेगवान करण्यासाठी, भूमी अभिलेख विभागाच्या सुधारित आकृतीबंधानुसार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत तेजस नेटवर्क्स आणि महाआयटीमध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या

महाराष्ट्रातील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना दूरसंचार तंत्रज्ञानाचे जागतिक दर्जाचे प्रशिक्षण मिळणार मुंबई :

Virat Kohli : ९ वर्षांत कुणी विचारलंच नाही – तू कसा आहेस ? कसोटी कर्णधारपद सोडण्यावरून विराट कोहलीचा भावनिक खुलासा ..

बेंगळुरू : विराटने कसोटी कर्णधारपद सोडून आज ४ वर्षे उलटून गेली आहेत तरीही त्याच्या त्या निर्णयावर अजूनही बऱ्याच