Sharad Pawar and Rohit Pawar : शरद पवारांनी बोलावलेल्या बैठकीला रोहित पवारांची दांडी

तटकरे-पटेल भेटीमुळे नाराजीची चर्चा; शरद पवार गटात संभ्रमाचे वातावरण


मुंबई : सत्ताधारी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी नुकतीच शरद पवार यांची घेतलेली भेट आणि त्यानंतर पवारांनी केलेल्या त्यांच्या कौतुकामुळे आमदार रोहित पवार कमालीचे नाराज असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. या नाराजीनाट्यातूनच रोहित पवार यांनी बुधवारी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे शरद पवारांनी बोलावलेल्या पक्षाच्या अत्यंत महत्त्वाच्या बैठकीला दांडी मारल्याचे समोर आले आहे. ते सध्या पुण्यात असून त्यांनी या बैठकीकडे पाठ फिरवल्याने राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले आहे.



सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नुकत्याच जाहीर झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीतून प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या पदांचा उल्लेख जाणीवपूर्वक टाळल्याचे चित्र निर्माण झाले होते. यामुळे नाराज असलेल्या या दोन्ही नेत्यांनी दोन दिवसांपूर्वी शरद पवारांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली होती. शरद पवार गटाकडून, विशेषतः आमदार रोहित पवारांकडून तटकरे आणि पटेल यांच्यावर सातत्याने जोरदार तोंडसूख घेतले जाते. असे असतानाही शरद पवारांनी या दोन्ही नेत्यांची भेट घेतली आणि माध्यमांसमोर "सुनील तटकरे व प्रफुल्ल पटेल हे दोन्ही अत्यंत क्षमतावान नेते आहेत," अशा शब्दांत त्यांची प्रशंसा केली. पवारांनी केलेले हे कौतुक रोहित पवारांच्या जिव्हारी लागल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.



यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित ही बैठक विधान परिषद निवडणुका आणि आगामी काळातील पक्षाच्या धोरणात्मक रणनीतीसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात होती. मात्र, रोहित पवार यांनी या बैठकीला उपस्थित न राहता पुण्यातच थांबणे पसंत केल्यामुळे काका-पुतण्याच्या वादानंतर आता आजोबा-नातवामध्येही काही आलबेल नाही का, अशी नवी चर्चा सुरू झाली आहे. या अनुपस्थितीनंतर आता शरद पवार नातवाची समजूत काढणार की रोहित पवार आपली भूमिका अधिक आक्रमक करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


शरद पवार गटाच्या इतर नेत्यांमध्येही संभ्रम


विरोधी बाकांवरून ज्या नेत्यांवर सातत्याने भ्रष्टाचाराचे आणि पक्षफुटीचे आरोप केले गेले, त्याच नेत्यांची पक्षाच्या सर्वोच्च नेत्यांनी जाहीर प्रशंसा केल्यामुळे रोहित पवारच नव्हे, तर शरद पवार गटातील इतर अनेक ज्येष्ठ नेत्यांमध्येही संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. कालपर्यंत ज्यांच्याविरोधात संघर्षाची भूमिका घेतली, त्यांच्याच बाबत मवाळ धोरण का, असा सूर पक्षांतर्गत उमटत आहे.

Comments
Add Comment

US Military Plane : अमेरिकेचं लष्करी विमान थेट रशियात उतरलं; मॉस्कोतील लँडिंगने खळबळ

मॉस्को : रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि रशियामधील संबंध अत्यंत संवेदनशील असताना,

BWF world rankings : बीडब्ल्यूएफ जागतिक क्रमवारीत त्रिशा आणि गायत्रीची मोठी झेप

नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या बॅडमिंटन विश्वचॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकल्यानंतर, भारतीय महिला दुहेरी

Arun Datte : गुरुत्वाकर्षणालाही चकवणारी कला!

मूर्तिकार अरुण दत्ते या वर्षी काय नवा 'बॅलन्स' साधणार ? मुंबई : गणेशोत्सवाचे वेध सर्वत्र लागले असून यंदाच्या

Rahul Dravid : टीम इंडियाला डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची संधी, पण मार्ग खडतर - राहुल द्रविड

नवी दिल्ली : भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचे मत आहे की, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी)

Xi Jinping : ब्रिक्स परिषदेसाठी शी जिनपिंग भारत दौऱ्यावर येण्याची शक्यता; ४०० लोकांचे शिष्टमंडळही येणार

बीजिंग : पुढील महिन्यात दिल्लीत होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी

PA's daughter : रोहित पवारांच्या PAच्या मुलीचा मृत्यू; पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती

बारामती : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांचे स्वीय सहाय्यक अजित दशावतारे