प्रबोध डावखरे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

मुंबई : ठाणे जिल्ह्याच्या राजकारणात आणि विधान परिषदेत आपल्या अजातशत्रू व्यक्तिमत्त्वाने दीर्घकाळ ठसा उमटवणारे दिवंगत नेते वसंत डावखरे यांचे चिरंजीव प्रमोद डावखरे यांनी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात आयोजित विशेष कार्यक्रमात, राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि ज्येष्ठ नेते दिलीप वळसे-पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.


यावेळी प्रमोद डावखरे यांचे पक्षात स्वागत करताना मंत्री छगन भुजबळ म्हणाले, "दिवंगत वसंत डावखरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी रक्ताचे पाणी केले होते. अनेक वर्षे त्यांनी विधान परिषदेचे सभापतीपद भूषवले. राजकारणात 'अजातशत्रू' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वसंतरावांचे चिरंजीव प्रमोद आज राष्ट्रवादीत आले, ही आनंदाची बाब आहे. प्रमोद डावखरे यांना पक्षात मानाचे स्थान आणि चांगली वागणूक मिळेल. संपूर्ण पक्ष त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहील, असा शब्द मी या निमित्ताने देतो."


पक्षप्रवेशानंतर माध्यमांशी बोलताना प्रमोद डावखरे यांनी सांगितले, "माझे वडील दिवंगत वसंत डावखरे यांच्या काळात ठाणे आणि आसपासच्या परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसचे जसे एकहाती वर्चस्व होते, तेच वर्चस्व आणि ताकद पुन्हा निर्माण करण्याचा माझा निर्धार आहे. खासदार पार्थ पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही संघटन अधिक मजबूत करू," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ज्येष्ठ नेते दिलीप वळसे-पाटील यांनीही प्रमोद यांच्या प्रवेशाने ठाणे जिल्ह्यात पक्ष संघटना निश्चितच बळकट होईल, असे सांगितले.v

Comments
Add Comment

BMC News : जन्म व मृत्यूशी संबंधित विविध अर्जांची नोंद आता स्वतंत्र संगणकात; जुने जन्म / मृत्यू प्रमाणपत्र नवीन क्युआर कोडयुक्त प्रमाणपत्र

स्वतंत्र खिडकीद्वारे स्वीकारणार अर्ज https://prahaar.in/2026/08/06/residents-of-worli-prabhadevi-and-lower-parel-will-face-garbage-related-issues-for-3-to-4-days/ मुंबई (विशेष प्रतिनिधी) :

Water Supply Cut News : वांद्रे पूर्व ते अंधेरी पूर्व भागांत येत्या मंगळवार, बुधवार पाणीकपात

मुंबई (विशेष प्रतिनिधी) अंधेरी पूर्व ते वांद्रे पूर्व के दक्षिण आणि एच पूर्व विभागातील पाणीपुरवठा

Best Budget Bike : दिखाऊपणा कशाला? ७० किमी मायलेज आणि ५५ हजारांपासून किंमत; बजेटमधील ५ सर्वोत्तम बाईक!

सध्याच्या काळात महागाई आणि सतत वाढणारे इंधनाचे दर यामुळे सर्वसामान्य मध्यमवर्गीय नागरि

BMC News : वरळी, प्रभादेवी आणि लोअर परळ मधील नागरिकांना ३ ते ४ दिवस कचऱ्याची राहणार समस्या

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेच्या ‘जी दक्षिण’ प्रशासकीय विभागात कचरा संकलन आणि वाहतुकीसाठी

Panchkula Murder Case : पंचकुलात खळबळ! मोलकरणीनेच केली रिटायर्ड कॅप्टनच्या पत्नीची हत्या; सीसीटीव्हीमुळे बिंग फुटले

Haryana : हरियाणामधील पंचकुला येथे घडलेल्या एका थरारक आणि खळबळजनक हत्याप्रकरणाचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.

Eknath Shinde : 'शिवसेना कोणाची?' जनतेनेच दिला कौल; ४० चे ६० आमदार करून जनतेने शिक्कामोर्तब केलं

मुंबई : शिवसेना पक्षाच्या मालकीबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)