भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेत; कृषि मंत्री दत्तात्रय भरणे

द्राक्ष पिकाचा समावेश करण्याचे निर्देश


मुंबई : राज्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी द्राक्ष शेतीचा भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेमध्ये समावेश करण्याबाबत सविस्तर प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश कृषि मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले. द्राक्ष निर्यातीला चालना मिळावी तसेच शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी व्हावा, या उद्देशाने शासन सकारात्मक असून प्रायोगिक तत्त्वावर आर्थिक मदत देण्याचाही विचार करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.मंत्रालयात आयोजित बैठकीत द्राक्ष शेतीचा भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेत समावेश करण्याबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी कृषि राज्यमंत्री ॲड आशिष जयस्वाल, आमदार रोहित पाटील, कृषी आयुक्त सूरज मांढरे, संचालक अंकुश माने, द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष जगन्नाथ मस्के, तासगाव येथील शेतकरी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष संदीप पाटील, द्राक्ष शेतकरी तसेच कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेंतर्गत द्राक्ष पिकासाठी प्रति हेक्टरी आर्थिक मदतीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. या योजनेचा लाभ देण्यासंदर्भात स्वतंत्र निकष निश्चित करण्यात येणार असून, प्रादेशिक गरजेनुसार योग्य वाणांचा समावेश केला जाईल. द्राक्ष निर्यातीमुळे राज्याच्या कृषी अर्थव्यवस्थेला चालना मिळत असून, निर्यातक्षम पिकांना शासन सहकार्य करणार असल्याचे कृषी मंत्री भरणे यांनी स्पष्ट केले.सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यामध्ये टेबल ग्रेप्स ज्यूस पार्क व तासगाव आंतरराष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र (काढणी पश्चात तंत्रज्ञान) स्थापन करण्याबाबत कृषिमंत्री यांनी सकारात्मक तयारी दर्शवत कृषी आयुक्त यांच्याशी चर्चा करून कॅलिफोर्निया येथील संशोधन केंद्राशी चर्चा करून नवीन प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश दिले आहेत.

Comments
Add Comment

Health Tips : रोजच्या आयुष्यातील 'या' १० सवयी आपल्या आरोग्यासाठी ठरू शकतात घातक; आजच करा बदल

मुंबई : आपल्या दैनंदिन आयुष्यातील काही सवयी अगदी सामान्य वाटतात. मात्र, त्यांचा सतत आणि दीर्घकाळ परिणाम शरीरावर

Raksha Bandhan Sweet Recipe : काजू रोलची ही रेसिपी वाचून बाजारातून मिठाई आणणं कायमचं विसरून जाल; रक्षाबंधनाला भावासाठी बनवा स्पेशल स्वीट

रक्षाबंधन म्हटलं की घराघरांत आनंदाचे वातावरण आणि गोडधोड पदार्थांची रेलचेल असते. अनेकजण बाजारातून मिठाई आणतात,

Maharashtra Government : बागणीतील ९८ घरांच्या अतिक्रमणाचा प्रश्न मार्गी लागणार; नियमानुकूलतेसाठी शासनाची परवानगी

मुंबई : सांगली जिल्ह्यातील बागणी गावातील ९८ घरांच्या अतिक्रमणाचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न आता

Malegaon : मालेगावमध्ये दीड लाखाचे एमडी जप्त

मालेगाव : शहरालगतच्या द्याने रमजानपुरा पोलिसांनी अवैध अमली पदार्थाची विक्री आणि तस्करी करणाऱ्यांवर मोठी

Indian Service Sector : भारतात सेवा क्षेत्रातले ५० टक्के कर्मचारी सतत नव्या नोकरीच्या शोधात

नवी दिल्ली : भारतातील व्यावसायिक सेवा क्षेत्रात ५० टक्के कर्मचारी सतत नव्या नोकरीच्या शोधात असतात. जास्त पगार

INDvsSL : भारताविरुद्धच्या कोलंबो कसोटीत तिसऱ्या दिवसअखेर श्रीलंका पिछाडीवर

कोलंबो : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना कोलंबो