Raksha Bandhan Sweet Recipe : काजू रोलची ही रेसिपी वाचून बाजारातून मिठाई आणणं कायमचं विसरून जाल; रक्षाबंधनाला भावासाठी बनवा स्पेशल स्वीट

रक्षाबंधन म्हटलं की घराघरांत आनंदाचे वातावरण आणि गोडधोड पदार्थांची रेलचेल असते. अनेकजण बाजारातून मिठाई आणतात, तर काहीजण आवडीने घरातच नवनवीन पदार्थ बनवतात. रवा, मावा आणि दुधापासून आपण नेहमीच वेगवेगळे पदार्थ बनवतो. पण यंदाच्या रक्षाबंधनाला भावासाठी काहीतरी खास आणि शाही बनवायचं असेल, तर 'काजू रोल बर्फी' हा उत्तम पर्याय आहे.


बाजारसारखी मऊसूद आणि तोंडात विरघळणारी काजू रोल बर्फी घरात सोप्या पद्धतीने कशी बनवायची, त्याची सविस्तर रेसिपी खालीलप्रमाणे:



काजू रोल बर्फीसाठी लागणारे साहित्य




1 कप काजू,2 मोठे चमचे दूध, साखर आवश्यकतेनुसार, वेलची पूड, सजावटीसाठी पिस्ता किंवा चांदीचा वर्ख

काजूची पावडर




काजू मिक्सरमध्ये घालून बारीक पावडर करून घ्या. मिक्सर जास्त वेळ चालवू नका, नाहीतर काजूमधील तेल सुटू शकते.

मिश्रण तयार करा




कढईत काजूची पावडर, साखर आणि 2 मोठे चमचे दूध घाला. मंद आचेवर सतत ढवळत राहा. मिश्रण घट्ट होऊन कढई सोडू लागले की गॅस बंद करा. थोडे थंड झाल्यावर हाताला तूप लावून मिश्रण मऊसर मळून घ्या.

रोल तयार करा




काजूचे मिश्रण पोळीप्रमाणे लाटून घ्या. त्यावर पिस्त्याचा हलका थर लावून घट्ट रोल करा.

 बर्फी कापा




तयार रोल थोडा सेट होऊ द्या. त्यानंतर धारदार सुरीने समान आकाराचे तुकडे कापा.

सजावट




काजू रोल बर्फीवर पिस्त्याचे काप किंवा चांदीचा वर्ख लावून सजवा. दिसायलाही आकर्षक आणि चवीला भन्नाट!

 
Comments
Add Comment

Health Tips : रोजच्या आयुष्यातील 'या' १० सवयी आपल्या आरोग्यासाठी ठरू शकतात घातक; आजच करा बदल

मुंबई : आपल्या दैनंदिन आयुष्यातील काही सवयी अगदी सामान्य वाटतात. मात्र, त्यांचा सतत आणि दीर्घकाळ परिणाम शरीरावर

Maharashtra Government : बागणीतील ९८ घरांच्या अतिक्रमणाचा प्रश्न मार्गी लागणार; नियमानुकूलतेसाठी शासनाची परवानगी

मुंबई : सांगली जिल्ह्यातील बागणी गावातील ९८ घरांच्या अतिक्रमणाचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न आता

Malegaon : मालेगावमध्ये दीड लाखाचे एमडी जप्त

मालेगाव : शहरालगतच्या द्याने रमजानपुरा पोलिसांनी अवैध अमली पदार्थाची विक्री आणि तस्करी करणाऱ्यांवर मोठी

Indian Service Sector : भारतात सेवा क्षेत्रातले ५० टक्के कर्मचारी सतत नव्या नोकरीच्या शोधात

नवी दिल्ली : भारतातील व्यावसायिक सेवा क्षेत्रात ५० टक्के कर्मचारी सतत नव्या नोकरीच्या शोधात असतात. जास्त पगार

INDvsSL : भारताविरुद्धच्या कोलंबो कसोटीत तिसऱ्या दिवसअखेर श्रीलंका पिछाडीवर

कोलंबो : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना कोलंबो

Prabhadevi Water Pipeline : प्रभादेवीत एलफिन्स्टन पुलाजवळ जलवाहिनी फुटली

मुंबई : प्रभादेवीत एलफिन्स्टन पुलाजवळ जलवाहिनी फुटल्यामुळे हजारो लिटर पाणी वाहून गेले. सेनापती बापट मार्गावर ही