कृषिमंत्री दत्तात्रय भरणे; ३० जूनपूर्वी घोषणा होणार
मुंबई : राज्यात विधान परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्यामुळे लागू झालेल्या आचारसंहितेचा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर कोणताही परिणाम होणार नसून, येत्या ३० जूनपूर्वी राज्यातील बळीराजासाठी कर्जमाफीची अधिकृत घोषणा केली जाईल, अशी माहिती राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बुधवार दिली. "कर्जमाफी हा सरकारचा पूर्वनियोजित धोरणात्मक निर्णय असल्याने या प्रक्रियेत आचारसंहितेचा कोणताही कायदेशीर अडथळा येणार नाही. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अत्यंत सकारात्मक असून, वित्तीय नियोजनाचा आढावा घेऊन लवकरच अंतिम निर्णय घेतला जाईल," असेही त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; अमेरिकन कंपन्यांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी मुंबई : कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा सेंटर, सेमीकंडक्टर, हरित हायड्रोजन, ...






