NEET Paper Leak : मॉडर्न कॉलेजकडून मोठी कारवाई! प्राध्यापिका मनीषा मांढरे अखेर निलंबित

पुणे : नीट पेपरफुटी प्रकरणात (NEET Paper Leak) अटकेत असलेल्या प्राध्यापिका मनीषा मांढरे यांच्यावर अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पुण्यातील मॉडर्न महाविद्यालय प्रशासनाने तातडीची बैठक घेत त्यांच्या निलंबनाचे आदेश जारी केले. नीट परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटीमध्ये त्यांचा सहभाग समोर आल्यानंतर ही कठोर कारवाई करण्यात आली.


मनीषा मांढरे या मॉडर्न महाविद्यालयात प्राणीशास्त्र विभागात प्राध्यापिका म्हणून कार्यरत होत्या. सीबीआयच्या तपासात त्यांचे नाव समोर आल्यानंतर महाविद्यालय प्रशासनाने गंभीर दखल घेतली. बैठकीत शिक्षण क्षेत्राच्या प्रतिमेला धक्का पोहोचवल्याचा ठपका ठेवत त्यांना निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला. (NEET Paper Leak)



दरम्यान, सीबीआयने मनीषा मांढरे यांना अटक केली असून त्यांची सखोल चौकशी सुरू आहे. नीट पेपरफुटीच्या (NEET Paper Leak) या प्रकरणामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे.


नीट पेपरफुटी प्रकरणात महाराष्ट्रातील अनेक जण वेगवेगळ्या स्तरावर सहभागी असल्याचे तपासातून उघड होत आहे. प्रश्नपत्रिका (NEET Paper Leak) तयार करणाऱ्या पॅनेलमध्ये असलेले निवृत्त प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी आणि प्राध्यापिका मनीषा मांढरे यांनीच पेपर फुटविल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे.


या प्रकरणात आता आरसीसी कोचिंग क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर यांनाही सीबीआयने अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरसीसी क्लासच्या टेस्टमधील १०१ प्रश्नांपैकी अनेक प्रश्न नीट परीक्षेत आल्याचे समोर आले आहे. यामुळे या रॅकेटचा व्याप किती मोठा होता याची चर्चा सुरू झाली आहे. (NEET Paper Leak)



मोटेगावकर यांच्याभोवती संशय निर्माण करणारा एक व्हिडीओही तपास यंत्रणांच्या हाती लागला आहे. त्याचबरोबर त्यांच्या आर्थिक व्यवहारांची ईडीकडून छाननी सुरू असून मालमत्ता आणि पैशांच्या व्यवहारांची तपशीलवार चौकशी केली जात आहे. (NEET Paper Leak)


सीबीआयच्या तपासात काही विद्यार्थी आणि पालकांचीदेखील नावे समोर येत आहेत. पैसे देऊन प्रश्नपत्रिका मिळवल्याचा संशय असलेल्या विद्यार्थ्यांवर आणि त्यांच्या पालकांवरही तपास यंत्रणांची नजर आहे. (NEET Paper Leak)



नीट पेपरफुटी प्रकरणातील प्रमुख आरोपी :


पी. व्ही. कुलकर्णी - निवृत्त केमिस्ट्री प्राध्यापक, नीट प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या पॅनेलमध्ये सहभाग तसेच या रॅकेटचा मास्टरमाईंड असल्याचा आरोप.


प्रा. मनीषा मांढरे - बायोलॉजी प्राध्यापिका, मॉडर्न कॉलेज पुणे; प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या पॅनेलमध्ये सहभाग


शिवराज मोटेगावकर - संचालक, आरसीसी कोचिंग क्लासेस; पेपरफुटी रॅकेटमध्ये महत्त्वाची भूमिका बजावल्याचा संशय


शुभम खैरनार - नाशिकमधील बीएएमएस विद्यार्थी; श्रीमंत विद्यार्थ्यांना लक्ष्य करून लाखोंचे व्यवहार केल्याचा आरोप


मनीषा वाघमारे - पुण्यातील ब्युटी पार्लर चालक; विद्यार्थ्यांना सूत्रधारांशी जोडण्याची भूमिका


धनंजय लोखंडे - आयुर्वेद डॉक्टर, सध्या पुण्यात वास्तव्यास; विद्यार्थ्यांना पेपर पुरवणाऱ्या रॅकेटशी संपर्क जोडल्याचा संशय (NEET Paper Leak)

Comments
Add Comment

Eknath Shinde : पंढरपूर कॉरिडॉरवर उपमुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा; "शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय कोणतेही काम होणार नाही"

पंढरपूर : आषाढी एकादशीच्या पावन सोहळ्यानिमित्त पंढरपुरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी विकास, वारकरी

Ashadhi Wari 2026 : आषाढी वारीसाठी सरकारची जय्यत तयारी! पंढरपूरच्या विकासासाठी ६७१ कोटी; एअर ॲम्बुलन्सपासून CCTV पर्यंत सर्व सुविधा सज्ज

पंढरपूर : आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर लाखो वारकऱ्यांच्या सुरक्षित, आरोग्यदायी आणि सुरळीत दर्शनासाठी राज्य

Ashadhi Wari 2026 : आषाढी वारीत भाविकांना दिलासा; मंदिर समितीकडून अन्नदान, प्रशासनाकडून चोख व्यवस्था

सोलापूर : आषाढी वारीसाठी पंढरपुरात दाखल होणाऱ्या लाखो वारकऱ्यांसाठी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने दर्शन

Eknath Shinde :भरपावसात उपमुख्यमंत्री शिंदे पंढरपुरात; वारकऱ्यांशी साधला संवाद

सोलापूर : आगामी आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज भरपावसात पंढरपूर येथे

Teacher Suicide Case : सुनील मोरे आत्महत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा; दोन्ही मुलांसोबत केलं भयकंर नंतर...

शिक्षक सुनील मोरेंनी रचला बनवा; आत्महत्या पूर्वी दोन्ही लेकरांची हत्या, पोस्टमार्टम रिपोर्ट आले समोर Teacher Suicide Case :

Nitin Gadkari : पुणे-संभाजीनगर प्रवास दोन तासांत; मुंबई-बेंगळुरू अंतर पाच तासांत

पुणे : पुणे ते संभाजीनगर प्रवासाचा वेळ कमी करण्यासाठी नवीन उन्नत मार्ग उभारण्यात येणार असून, या प्रकल्पामुळे हे