MS Dhoni Lap of Honor : 'लॅप ऑफ ऑनर' दरम्यान धोनीला पिवळ्या जर्सीमध्ये पाहून चाहते भावूक

चेन्नई : चेन्नईच्या ऐतिहासिक एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर क्रिकेट आणि भावनांचा एक विलक्षण संगम पाहायला मिळाला. सामन्यानंतर, महेंद्रसिंग धोनीने (MS Dhoni) हजारो चाहत्यांना अभिवादन करत मैदानाभोवती 'लॅप ऑफ ऑनर' (Lap of Honor) मारली. "चिन्ना थला" सुरेश रैना देखील सामन्यादरम्यान उपस्थित होता. साक्षीसुद्धा स्टँड्समध्ये उपस्थित होती. या मोसमात चेपॉकमधील चेन्नई सुपर किंग्सचा हा शेवटचा सामना होता, त्यामुळे सामना संपल्यानंतर स्टेडियममधील वातावरण अत्यंत भावुक झाले. पिवळ्या जर्सी घातलेल्या चाहत्यांनी "धोनी, धोनी"च्या घोषणांनी संपूर्ण मैदान दुमदुमून टाकले.


महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) या मोसमात पहिल्यांदाच सामन्याच्या दिवशी चेन्नई सुपर किंग्सच्या ड्रेसिंग रूममध्ये दिसला इतकेच नाही, तर पाच वेळच्या चॅम्पियन संघाची पिवळी जर्सी घालून तो पहिल्यांदाच मैदानावर उतरला. चेन्नईच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. संघाने २० षटकांत १८० धावा केल्या. या वेळी धोनी टीव्ही स्क्रीनवर दिसत नव्हता. कॅमेऱ्यांनी वारंवार चेन्नईच्या ड्रेसिंग रूमकडे लक्ष वळवले, पण चाहते निराश झाले.



अखेरीस, डावाच्या विश्रांतीदरम्यान धोनी (MS Dhoni) दिसला. डावाच्या विश्रांतीदरम्यान, चेन्नई सुपर किंग्सने सांघिक फोटोसाठी पोज दिली आणि या फोटोसेशनसाठी धोनी मैदानावर आला. धोनीने मैदानावर पाऊल ठेवताच चेन्नईच्या चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. त्यानंतर धोनी चेन्नईच्या ड्रेसिंग रूममध्ये दिसला. जेव्हा हैदराबाद धावांचा पाठलाग करताना पुढे जात असल्याचे दिसत होते, तेव्हा संघाच्या पराभवाचे दुःख लपवण्यासाठी असावे, पण ड्रेसिंग रूममध्ये धोनीच्या चेहऱ्यावर स्मितहास्य दिसत होते.


यानंतर, चेन्नई सुपर किंग्सने सन्मान फेरी मारली. त्यांनी चेपॉक मैदानाला प्रदक्षिणा घातली. साक्षी, धोनी (MS Dhoni) आणि जीवा यांना वारंवार कॅमेऱ्यात दाखवण्यात आले. धोनी संघासोबत किंचित स्मितहास्य करत दिसला. कधी सुरेश रैना, तर कधी एखादा क्रिेकेटपटू, सर्वजण धोनीसोबत फोटो काढताना आणि त्याच्याशी बोलताना दिसले. यानंतर धोनीने सर्वप्रथम ग्राऊंड्समनसोबत फोटोसाठी पोज दिली. यावेळी तो स्वतः येऊन मध्यभागी बसला. यानंतर धोनी माध्यम प्रतिनिधींसोबत सेल्फी घेताना दिसला.



आयपीएल २०२० दरम्यान, नाणेफेकीच्या वेळी समालोचक डॅनी मॉरिसन यांनी माहीला विचारले होते की पिवळ्या जर्सीतील हा त्याचा शेवटचा सामना आहे का, त्यावर धोनीने हसून उत्तर दिले होते, "नक्कीच नाही". सोमवारी, अनेक चाहते मैदानावर याच 'नक्कीच नाही'च्या पोस्टर्ससह दिसले. जेव्हा धोनीने हे पाहिले, तेव्हा तो हसला. पाच वर्षांपूर्वी धोनी (MS Dhoni) म्हणाला होता की तो आपला शेवटचा टी२० सामना चेपॉकमध्ये खेळेल? माही हा सामना खेळला आहे का? की तो पुढच्या हंगामात खेळताना दिसेल? याचे उत्तर चेन्नई सुपर किंग्सच्या व्यवस्थापनाकडेही नसेल आणि अंतिम निर्णय महेंद्रसिंग धोनीचा (MS Dhoni) आहे. सोमवारी, अनेक प्रश्न अनुत्तरित राहिले. 

Comments
Add Comment

R Praggnanandhaa : प्रज्ञानंदचा ऐतिहासिक विजय! कारुआनाला नमवत ग्रँड चेस टूरचा पहिला भारतीय चॅम्पियन

भारतीय बुद्धिबळपटू आर. प्रज्ञानंदने गुरुवारी सेंट लुईस येथे फॅबियानो कारुआनाविरुद्ध शानदार पुनरागमन करत ग्रँड

IND vs SL Colombo Test : कोलंबो कसोटी अनिर्णित; भारताने कसोटी मालिका १-० ने जिंकली

कोलंबो : श्रीलंका दौऱ्यावर, शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये सहज विजय मिळवून

ICC bans UAE batter : आयसीसीची युएईचा फलंदाज आसिफ खानवर १५ महिन्यांची बंदी

दुबई : संयुक्त अरब अमिरातीचा (UAE) अनुभवी फलंदाज आसिफ खान याच्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) डोपिंग

India U19 Squad : ऑस्ट्रेलिया मालिकेसाठी भारताचा १९ वर्षांखालील संघ जाहीर; सेहवाग-द्रविडच्या मुलांना संधी

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाच्या १९ वर्षांखालील संघाच्या भारत दौऱ्यासाठी भारतीय १९ वर्षांखालील संघाची घोषणा

Dean Elgar Retirement : दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार डीन एल्गरने घेतली व्यावसायिक क्रिकेटमधून निवृत्ती

नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार आणि अनुभवी कसोटी सलामीवीर डीन एल्गरने (Dean Elgar Retirement) व्यावसायिक

IND vs SL 2nd Test Day 5 : भारताला हव्यात ४ विकेट्स, पण पावसामुळे विजय हुकणार? कोलंबोत हवामानाचा मोठा धोका

कोलंबो : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा आणि अखेरचा सामना निर्णायक