Mayor Ritu Tawde : स्थानिक नागरिकांच्या सूचना आणि संकल्पना लक्षात घेऊन उद्यानांचा विकास करा

- एन विभागातील उद्यान कामांचा महापौर रितू तावडे यांनी घेतला आढावा



मुंबई (विशेष प्रतिनिधी)


मुंबईतील उद्याने ही मुंबईकरांच्या विश्रांतीची, मनोरंजनाची हक्काची ठिकाणे आहेत. चालणे, धावणे, व्यायाम, योगा आदींच्या माध्यमातून उद्याने, मैदाने ही सार्वजनिक आरोग्यासाठी महत्त्वाची आहेत. उद्यानांचा विकास आणि पुनर्विकास करताना स्थानिक नागरिकांच्या सूचना आणि संकल्पना लक्षात घेऊन विकास करणे आवश्यक आहे. त्यादिशेने प्रशासनाने पावले उचलावीत. सर्व नगरसेवकांनी देखील आपापल्या परिसरातील उद्याने, मैदाने यांच्या विकासामध्ये लोकसहभाग रहावा, यासाठी प्रयत्न करावेत, असे उद्गार मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी काढले. घाटकोपर एन विभागातील उद्याने विकासाच्या संकल्पना आणि आराखडे तयार करून लवकरात लवकर सादर करावेत, असे निर्देशही महापौर तावडे यांनी दिले आहेत.



एन' विभाग हद्दीतील विविध उद्याने तसेच मैदाने यांचा विकास करण्याच्या अनुषंगाने घाटकोपर स्थित एन विभाग प्रशासकीय कार्यालयात, मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार १८ मे २०२६ रोजी बैठक पार पडली. त्यावेळी महापौरांनी विविध निर्देश दिले.


घाटकोपर मधील राजावाडी उद्यान, लायन्स पार्क, केशरवाला उद्यान, क्लोव्हर मैदान, चित्तरंजन नगर मैदान, ९० फूट मार्गावरील आर. जी. उद्यान, प्रमोद महाजन उद्यान आणि जॉगर्स पार्क, डॉ. हेडगेवार उद्यान आणि नाना - नानी पार्क यांचा विकास करण्यासंदर्भात आयोजित या बैठकीस उपआयुक्त (उद्याने) अजितकुमार आंबी, उपआयुक्त (परिमंडळ ६) संतोषकुमार धोंडे, एन विभागाचे सहायक आयुक्त मारुती पवार, उपप्रमुख वास्तुशास्त्रज्ञ (उद्याने कक्ष) अनघा कुडाळकर, कार्यकारी अभियंता (उद्याने कक्ष) बी. टी. सावंत यांच्यासह संबंधित अधिकारी तसेच स्थानिक नागरिक व्यवस्थापनांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.



एन विभागातील प्रस्तावित उद्याने व मैदाने विकासांबाबत सर्व संबंधित नागरिकांच्या सूचना, मुद्दे तसेच संकल्पना त्याचप्रमाणे सद्यस्थितीत नागरिकांना येणाऱया अडचणी यांची माहिती महापौरांनी तपशिलवारपणे जाणून घेतली. वेगवेगळ्या संकल्पना आधारित उद्यानांची निर्मिती करणे, उद्यानांना चांगले व आकर्षक प्रवेशद्वार असावेत, पिण्याचे पाणी, प्रसाधनगृहे, पुरेशी प्रकाश व्यवस्था, ज्येष्ठ नागरिकांसाठी व्यवस्था, चालण्यासाठी तसेच धावण्यासाठी पथ (वॉकिंग / जॉगिंग ट्रॅक), मुलांसाठी खेळणी, उद्याने खुली राखण्याचा कालावधी वाढवणे, सुरक्षारक्षकांची नेमणूक, सीसीटीव्ही लावणे, उद्याने व मैदाने परिसरांमधील अतिक्रमणे हटविणे, मैदाने समतल राखणे, मैदानांमध्ये धूळ प्रतिबंधक उपाययोजना करणे यासह विविध सूचना स्थानिक नागरिकांनी मांडल्या.



सर्व उद्याने व मैदाने यांचा क्रमवार आढावा घेतल्यानंतर महापौर रितू तावडे म्हणाल्या की, एन विभागातील ज्या उद्यानांना व मैदानांना संपूर्ण नूतनीकरणाची आवश्यकता आहे, अशा स्थळांचे संकल्पना आधारित आराखडे तयार करुन प्रस्ताव लवकरात लवकर सादर करावेत. तसेच ज्या - ज्या ठिकाणी सुविधांमध्ये सुधारणा, दर्जा वाढ करणे शक्य आहे, तिथे कामे तत्काळ हाती घ्यावीत. स्थानिक नागरिकांच्या सूचना व संकल्पना यांचा समावेश करुनच सर्व कामे हाती घ्यावीत. कारण या उद्यानांचा व मैदानांचा वापर स्थानिक नागरिकांना करावयाचा आहे. त्यामुळे लोकसहभागाने उद्याने व मैदानांचा पुनर्विकास व्हायला हवा. उद्यानांचा वापर अपप्रवृत्तींच्या घटकांकडून होणार नाही, यासाठी प्रशासनाने दक्ष राहिले पाहिजे. उद्यानांमधील वृक्षराजी, हिरवळ प्रयत्नपूर्वक जपावी, सुशोभीकरण करावे. मुले तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी पुरेशा सुविधा यावर अधिक लक्ष केंद्रीत करावे. पेयजल, प्रसाधनगृहे, प्रकाश व्यवस्था, पाण्याचा निचरा यासारख्या मूलभूत बाबींसाठी नागरिकांना तक्रार करावी लागते, हे योग्य नाही, असे त्या म्हणाल्या. लोकसहभागाने उद्याने व मैदानांचा योग्य विकास तसेच परिरक्षण होईल, यासाठी सर्व नगरसेवकांनी आपापल्या भागात प्रयत्न करावेत. एन विभागातील आज चर्चा झालेल्या उद्याने व मैदानांबाबतचे आराखडे व विकासाचे प्रस्ताव जलद कार्यवाही करुन सादर करावे, अशी सूचनाही महापौर तावडे यांनी केली.

Comments
Add Comment

Mumbai News : ईद-ए-मिलाद मिरवणुकीतील संघर्षानंतर प्रक्षोभक व्हिडिओ व्हायरल; काळाचौकी पोलिसांकडून दोन गुन्हे दाखल

मुंबई : मुंबईतील लालबाग-परेल परिसरात 26 ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या संघर्षानंतर

Petrol Diesel Price : महिन्याचा शेवट आणि खिशावर ताण? पेट्रोल भरण्याआधी पाहा तुमच्या शहरातील आजचे नवीन दर!

मुंबई : सरकारी तेल कंपन्यांनी देशभरातील पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर जाहीर केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील

Bandra Hit And Run : भरधाव कारची 8 वर्षीय मुलाला धडक; उपचारांपूर्वीच मृत्यू, महिला चालकाला अटक

मुंबई : मुंबईतील वांद्रे पश्चिम परिसरात झालेल्या भीषण अपघातात 8 वर्षीय अंश गुप्ता या चिमुकल्याचा मृत्यू झाला.

Mumbai Bandra road accident : मुंबईत भरधाव इनोव्हाने मुलाला चिरडलं, लहानग्याच्या छातीवर चालवली गाडी

मुंबई : मुंबईतून अपघाताची बातमी आली आहे. भरधाव इनोव्हा गाडीने नऊ वर्षांच्या मुलाला चिरडले. मेहबूब स्टुडिओ जवळ हा

Indian Railway : रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या! स्टेशनवर थुंकणे, कचरा टाकणे आता महागात पडणार; थेट ₹१,००० दंड

मुंबई : रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रेल्वे स्थानक किंवा परिसरात अस्वच्छता

Mumbai Parelcha Maharaja : परळच्या महाराजाच्या आगमन मिरवणुकीत विजेच्या खांबाला आग; भाविकांमध्ये एकच घबराट  

Mumbai : मुंबईत आगामी गणेशोत्सवाचा उत्साह आता पुरेसा शिगेला पोहोचला असून, शनिवारी पार पडलेल्या 'परळचा महाराजा' आणि