Seven Hills Hospital : सेव्हनहिल्स रुग्णालय पुन्हा खासगी संस्थेचाच ताब्यात

- भाडेकरार करण्याचा प्रस्ताव सुधार समितीत सादर


मुंबई (विशेष प्रतिनिधी)


मुंबई महापालिकेच्यावतीने खासगी सहभाग तत्वावर देण्यात आलेले मरोळ येथील रुग्णालय सेव्हनहिल्स व्यवस्थापनाकडून आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न होत असतानाच पुन्हा हे रुग्णालय त्याच संस्थेकडे सोपवण्यात येत आहे. या सेव्हनहिल्सला हे रुग्णालय देण्याचा ठराव रद्द केल्यानंतर पुन्हा आता त्यात सुधारणा करत ३० अधिक ३० वर्षांकरता भाडेकरार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे २०१३मधील अटी व शर्तींच्या अधीन राहून महापालिका व सेव्हन हिल्स हेल्थकेअर व क्रॅप्री ग्लोबल कंपनी याच्यामध्ये नव्याने निवाडा करार करण्यात येत असून याबाबतचा प्रस्ताव आता सुधार समितीपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे.



अंधेरी पूर्व मरोळ येथील सर्वे क्रमांक १५५ भाग, १५६ भाग १६२ भाग ते १६८ धारण करणाऱ्या महापालिकेचा भूभागावरील रुग्णालय सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर महापालिकेच्या ७७०५५ चौरस मीटर पैंकी ६६,६८७ चौरस मीटर भूभाग त्यावरील इमारती यांच्यसह सेव्हन हिल्स हॉस्पिटल्स लिमिटेड व सोमा इंटरप्रायझेस या संयुक्त कंपनीला रुग्णालय चालवण्यासाठी जसे आहे जेथे आहे तत्वावर प्रथम ३० वर्षांकरता आणि नुतनीकरण करता येईल अशाप्रकारे पुढील ३० वर्षांकरता खासगी सहभाग तत्वावर देण्याचा निर्णय २००४मध्ये घेण्यात आला होता. त्यानंतर सेव्हनहिल्स हॉस्पिटल्स सोबत २००५मध्ये कंत्राट करार आणि सन २०१३मध्ये सामजस्य करार करण्यात आला होता. या कराराचे उल्लंघन झाल्यानंतर २४ जानेवारी २०१८मध्ये कराराचे उल्लंघन झाल्याने त्यांचे करार संपुष्टात आणण्यासाठी महापालिकेच्यावतीने कारणे दाखवा नोटीस बजावली. तत्पूर्वी सन २०१७मध्ये ही कंपनी दिवाळीखोरीत गेली होती. त्यामुळे महापालिकेला दंडात्मक कारवाई करणे शक्य नव्हते. त्यामुळे २०१९मध्ये सवोच्च न्यायालयाच्या निकालानुसार महापालिकेच्या मान्यतेशिवाय कोणताही रिज्युलेशन करता येणार नाही असे नमुद केले होते. त्यामुळे सन २०२०मध्ये कोविड काळात महापालिकेने हे रुग्णालय कोविडच्या आजाराच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी वापरात आणले. त्यामुळे खर्चाची प्रतिपूर्ती करत महापालिकेने स्वत: देखरेख ठेवत हे रुग्णालय चालवले.



दरम्यान २०२४-२५मध्ये लवादाने दिलेल्या निर्णयानुसार पीपीपीवर वर हे रुग्णालय देण्यासाठी स्वारस्य अर्ज मागवले. यामध्ये ज्युपिटल कंपनी आणि कॅप्री ग्रोबल होल्डिंग्ज प्रायव्हेट लिमिटेड यांनी सहभाग नोंदवला. यामध्ये ज्युपिटल कंपनीने महापालिकेचे देणे माफ करण्याची विनंती केली. पण रिलायन्स कंपनी संलग्न असलेल्या क्रॅप्री ग्रोबल कंपनीने २०२० पर्यंतचे ७२ कोटी रुपये देणे, सन २०२६पर्यंतचा मालमत्ता कराचे देणे असलेली ११२ कोटी रुपये, जकात करापोटी १ कोटी रुपये तसेच देखभालीवरील ३९ कोटी अशाप्रकारे एकूण २२३.४ कोटी रुपयांपैंकी १८३ कोटी रुपये महापालिकेला अदा केले आहे. त्यामुळे महापालिका सुधार समिती व महापालिका सभागृहात सन २००५चा ठराव यापूर्वी रद्द करण्यात आला होतो, तो नंतर पुनर्जिवित करण्यात आला. त्यामुळे या पुनर्जिवित करण्यात आलेल्या प्रस्तावामध्ये सुधारणा करणे आणि भाडेकरार ३० वर्षांचा करण्याचा सुधारीत प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. त्यामुळे सामजंस्य करार २०१३मधील अटी व शर्तींच्या अधीन राहून महापालिका व सेव्हन हिल्स हेल्थकेअर व क्रॅप्री ग्लोबल कंपनी याच्यामध्ये नव्याने निवाडा करार करण्यात येत आहे.

Comments
Add Comment

Mumbai News : ईद-ए-मिलाद मिरवणुकीतील संघर्षानंतर प्रक्षोभक व्हिडिओ व्हायरल; काळाचौकी पोलिसांकडून दोन गुन्हे दाखल

मुंबई : मुंबईतील लालबाग-परेल परिसरात 26 ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या संघर्षानंतर

Petrol Diesel Price : महिन्याचा शेवट आणि खिशावर ताण? पेट्रोल भरण्याआधी पाहा तुमच्या शहरातील आजचे नवीन दर!

मुंबई : सरकारी तेल कंपन्यांनी देशभरातील पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर जाहीर केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील

Bandra Hit And Run : भरधाव कारची 8 वर्षीय मुलाला धडक; उपचारांपूर्वीच मृत्यू, महिला चालकाला अटक

मुंबई : मुंबईतील वांद्रे पश्चिम परिसरात झालेल्या भीषण अपघातात 8 वर्षीय अंश गुप्ता या चिमुकल्याचा मृत्यू झाला.

Mumbai Bandra road accident : मुंबईत भरधाव इनोव्हाने मुलाला चिरडलं, लहानग्याच्या छातीवर चालवली गाडी

मुंबई : मुंबईतून अपघाताची बातमी आली आहे. भरधाव इनोव्हा गाडीने नऊ वर्षांच्या मुलाला चिरडले. मेहबूब स्टुडिओ जवळ हा

Indian Railway : रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या! स्टेशनवर थुंकणे, कचरा टाकणे आता महागात पडणार; थेट ₹१,००० दंड

मुंबई : रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रेल्वे स्थानक किंवा परिसरात अस्वच्छता

Mumbai Parelcha Maharaja : परळच्या महाराजाच्या आगमन मिरवणुकीत विजेच्या खांबाला आग; भाविकांमध्ये एकच घबराट  

Mumbai : मुंबईत आगामी गणेशोत्सवाचा उत्साह आता पुरेसा शिगेला पोहोचला असून, शनिवारी पार पडलेल्या 'परळचा महाराजा' आणि