आयएएस तुकाराम मुंढे आता मंत्री झिरवळ यांच्या विभागात

२१ वर्षांच्या कार्यकाळात २५वी बदली; अन्न आणि औषध प्रशासन विभागाचा कारभार स्वीकारणार


मुंबई : आपल्या कडक शिस्तीसाठी प्रसिद्ध असलेले ज्येष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली झाली असून, त्यांच्याकडे आता अन्न आणि औषध प्रशासन (एफडीए) आयुक्तपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मुंढे यांच्या २१ वर्षांच्या प्रशासकीय कार्यकाळातील ही तब्बल २५ वी बदली ठरली आहे. विशेष म्हणजे, काही महिन्यांपूर्वी लाचखोरीच्या प्रकरणामुळे राज्यभरात प्रचंड गाजलेल्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नरहरी झिरवळ यांच्याकडे असलेल्या या संवेदनशील विभागात मुंढे यांची झालेली एन्ट्री प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.



राज्य शासनाने मंगळवारी वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले असून, यामध्ये मुंढे यांच्यासह अन्य चार महत्त्वाच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्या मंत्रालयातील विभागात काही महिन्यांपूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मोठी कारवाई केली होती. या विभागातील कारकून राजेंद्र ढेरंगे याला लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली होती. मंत्री झिरवळ यांचे खासगी सचिव (पीएस) रामदास गाडे यांच्याच सांगण्यावरून ही लाच मागितली गेल्याचा खळबळजनक आरोप त्यावेळी झाला होता. या लाचप्रकरणामुळे एफडीए विभाग कमालीचा चर्चेत आला होता. आता याच विभागात आयुक्त म्हणून तुकाराम मुंढे यांची नियुक्ती झाल्यामुळे विभागातील भ्रष्टाचाराला आणि गैरव्यवहारांना चाप बसणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


श्रीधर डुबे यांची ठाण्यात 'एसआरए'मध्ये बदली

तुकाराम मुंढे यांच्या नियुक्तीपूर्वी अन्न आणि औषध प्रशासन आयुक्तपदाचा कारभार सांभाळणारे श्रीधर डुबे यांची बदली आता मुंबई महानगर झोपडपट्टी पुनर्वसन, ठाणे येथे मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर करण्यात आली आहे. महानगरातील झोपडपट्टी पुनर्विकासाच्या रखडलेल्या प्रकल्पांना गती देण्याचे मोठे आव्हान आता डुबे यांच्यासमोर असणार आहे.


अन्य महत्त्वाच्या बदल्या
बाबासाहेब बेलदार यांची धुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी ते महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत होते.कान्हूराज बगाटे यांच्यावर 'महामुंबई मेट्रो'च्या व्यवस्थापकीय संचालक (एमडी) पदाची नवीन आणि महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.आर. एस. चव्हाण यांची मुंबईतील प्रसिद्ध 'हाफकीन जीव औषध निर्माण महामंडळ'च्या व्यवस्थापकीय संचालक (एमडी) पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

संजय खंदारे यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार

दरम्यान, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव संजय खंदारे यांच्याकडे अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. त्यांच्याकडील सध्याच्या खात्यांसह ही जबाबदारी ते सांभाळतील.
Comments
Add Comment

Alexandra Cinema in Nagpada : नागपाड्यातील अलेक्झाड्रा सिनेमागृहाची ओळख कायमचीच मिटणार

- सिनेमागृहाचे आरक्षण बदलून निवासी वापराचे आरक्षण टाकले जाणार; सुधार समितीच्या बैठकीत प्रस्ताव सादर मुंबई

FDA Action on Blinkit : FDAचा ब्लिंकिटवर मोठा दणका! मालाडमधील गोदामाचा अन्न परवाना निलंबित; झुरळे, अस्वच्छता अन् नियमभंग उघड

मुंबई : राज्यभर अन्न सुरक्षेचे नियम मोडणाऱ्या आस्थापनांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) धडक कारवाई सुरू केली

Holiday : मुंबईत दहीहंडी ऐवजी रक्षाबंधनला मिळणार शासकीय सुट्टी

मुंबई : यंदा मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यात दहीहंडी ऐवजी रक्षाबंधनच्या दिवशी शासकीय सुट्टी मिळणार आहे. या

National Highway : राष्ट्रीय महामार्गालगत नवीन ढाबे, हॉटेल्स आणि व्यावसायिक बांधकामांना बंदी

राज्य सरकारचा निर्णय; अनधिकृत बांधकामे ६० दिवसांच्या आत पाडण्याचे निर्देश मुंबई : राष्ट्रीय महामार्गांवर

Mumbai Cyber Security : मुंबईची सायबर सुरक्षितता राष्ट्रीय आर्थिक सुरक्षेची प्राथमिकता; भारत-इस्रायल सहकार्य वाढवण्याचे आवाहन

मुंबई: मुंबईची सायबर सुरक्षितता ही केवळ माहिती तंत्रज्ञानापुरती मर्यादित बाब नसून देशाच्या आर्थिक सुरक्षेची

Charging Stations : ई-वाहनांसाठी चार्जिंग स्टेशनचे जाळे विस्तारते; आरटीओ, एसटी आणि बेस्टचा पुढाकार

मुंबई : राज्यात ई-वाहनांची संख्या सातत्याने वाढत असताना त्यांना आवश्यक असलेल्या चार्जिंग पायाभूत सुविधांच्या