Shiv Sena : शिवसेना पक्ष कार्यालयातून नागरिकांचे प्रश्न सोडविण्याचे काम होईल

ठाणे : शिवसेनेच्या पक्ष कार्यालयातून नागरिकांचे प्रश्न सोडवण्याचे काम होईल असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज महापालिकेतील शिवसेना गटनेते कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केला. ठाणे महानगरपालिकेतील शिवसेना गटनेते पवन कदम यांच्या कार्यालयाचे उद्घाटन आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी खासदार नरेश म्हस्के, प्रा. ज्योती वाघमारे, महापौर शर्मिला पिंपळोलकर, उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हणमंत जगदाळे, विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण, शिवसेना ठाणे जिल्हा महिला आघाडी प्रमुख मिनाक्षी शिंदे, माजी उपमहापौर पल्लवी कदम,शिवसेना प्रवक्ते राहुल लोंढे यांच्यासह शिवसेनेचे सर्व नगरसेवक, शाखाप्रमुख, विभाग प्रमुख आदी उपस्थित होते.



ठाण्याने शिवसेनेला कायम साथ दिली असून ठाण्याच्या विकासासाठी शिवसेना कटिबद्ध आहे. ठाण्याने महाराष्ट्राला मुख्यमंत्री दिला असून शहरात मेट्रोसह विविध विकासकामे वेगाने सुरू आहेत. नागरिकांचे प्रश्न सोडविण्याचे काम या कार्यालयातून प्रभावीपणे होईल, असा विश्वास व्यक्त करत सर्व नगरसेवकांनी जनतेसाठी कार्यरत राहावे, असे आवाहन करण्यात आले.



ठाण्यात सर्वाधिक नगरसेवक शिवसेनेचे निवडून आल्याबद्दल ठाणेकर नागरिकांचे आभार शिंदे यांनी मानले. पक्षाचे संख्याबळ वाढल्यामुळे आनंदाचे वातावरण असून बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण पुढे नेण्याचे काम शिवसैनिक करत असल्याचेही त्यांनी नमूद केले.



बाळासाहेब ठाकरे यांचे ठाण्यावर विशेष प्रेम होते आणि ठाण्याने शिवसेनेला मोठे करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली, हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले. तसेच नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांना जुन्या नगरसेवकांनी मार्गदर्शन करावे, असा सल्लाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी अनुभवी नगरसेवकांना दिला.


उबाठा खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या भेटीचा कुणीही वेगळा अर्थ काढू नये


उबाठा गटाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी येऊन भेट घेतली. याबद्दल माध्यमांनी बातम्या चालवल्याने त्याबाबत उपमुख्यमंत्री शिंदे यांना विचारले असता, राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून विविध पक्षांचे लोकप्रतिनिधी त्यांच्या मतदारसंघातील कामांसाठी माझी भेट घेत असतात. त्यानुसार खासदार आष्टीकर यांनी आज माझी भेट घेतली होती, मात्र या भेटीचा कुणीही वेगळा अर्थ काढू नये अशी अपेक्षा शिंदे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.

Comments
Add Comment

Vehicle Insurance : गाडी चालवणाऱ्यांची धाकधूक वाढली! आता पेट्रोल पंपावर होणार 'ही' मोठी तपासणी; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

दिल्ली : रस्ते सुरक्षा अधिक प्रभावी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवत, वैध विमा

MPSC Group C 2026: उमेदवारांची धाकधूक वाढली! तलाठीचा अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस; साईट डाऊन होण्याआधी करा अर्ज

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 अंतर्गत तलाठी (ग्राम महसूल

Pune Nashik Highway Accident : पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात; कंटेनरची ट्रकला धडक, ट्रकखाली कार चिरडली

पुणे :  पुणे-नाशिक महामार्गावर खेड तालुक्यात बुधवारी सकाळी सुमारे 6.15 वाजता भीषण अपघात झाला. नाशिकहून पुण्याकडे

Dubai Explosion : दुबई हादरली! जेबेल अली अन् पाम जुमेराहजवळ भीषण स्फोट? सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्याने उडाली खळबळ

दुबईच्या जेबेल अली औद्योगिक परिसरात बुधवारी पहाटे स्फोट झाल्याच्या चर्चा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात

MHADA Lottery 2026 : अखेर प्रतीक्षा संपली! म्हाडाच्या घरांची सोडत 6 ऑगस्टला; 2,640 घरांसाठी 75 हजार अर्ज

मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) मुंबई गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळाच्या

BMC News : मुंबईतील पदपथ अतिक्रमण मुक्तीत सहायक अभियंता, परवाना निरिक्षकांची मानसिकता कुठे?

सहायक आयुक्त कुठे कुठे डोक फोडणार मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईकर नागरिकांचा प्रवास सुरक्षित, सुलभ आणि