Jammu Kashmir Drug Case : पंजाबनंतर आता जम्मू-काश्मीर ड्रग्जचे नवे हॉटस्पॉट! १३ लाखांहून अधिक युवक ड्रग्जच्या आहारी

जम्मू काश्मीर : पंजाबनंतर आता जम्मू-काश्मीर अंमली पदार्थांच्या विळख्यात (Jammu Kashmir Drug Case) अडकत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. सरकारी आकडेवारीनुसार, राज्यातील तब्बल १३.५ लाखांहून अधिक लोक विविध प्रकारच्या ड्रग्जच्या आहारी गेले आहेत. विशेष म्हणजे २०२२ मध्ये हा आकडा सुमारे ६ लाखांच्या आसपास होता. अवघ्या काही वर्षांत व्यसनाधीनांची संख्या दुपटीहून अधिक वाढल्याने प्रशासन, सुरक्षा यंत्रणा आणि समाजमनात गंभीर चिंता निर्माण झाली आहे.


अधिकाऱ्यांच्या मते, जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादासोबतच आता ड्रग्जचे जाळेही मोठे संकट बनले आहे. सीमावर्ती भागातून पाकिस्तानमार्गे अंमली पदार्थांची तस्करी होत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. यामुळे केवळ युवकांचे भविष्य उद्ध्वस्त होत नाही, तर राज्याच्या सुरक्षेलाही मोठा धोका निर्माण होत आहे. (Jammu Kashmir Drug Case)



राज्याचे डीजीपी नलिन प्रभात यांनीही याबाबत गंभीर इशारा दिला आहे. त्यांनी पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद आणि ड्रग्ज नेटवर्क यांच्यातील संबंधांकडे लक्ष वेधत “ड्रग्ज हा आता जम्मू-काश्मीरसमोरील सर्वात मोठ्या सामाजिक आणि सुरक्षा समस्यांपैकी एक बनला आहे,” असे म्हटले आहे. (Jammu Kashmir Drug Case)


या वाढत्या संकटाचा सामना करण्यासाठी प्रशासनाने राज्यभर १०० दिवसांची विशेष नशामुक्ती मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत आतापर्यंत १ कोटींहून अधिक लोकांनी सहभाग घेतल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. शाळा, महाविद्यालये, धार्मिक संस्था आणि स्थानिक समुदायांच्या माध्यमातून युवकांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न केला जात आहे. (Jammu Kashmir Drug Case)



दक्षिण काश्मीरमधील मोहम्मद अमीन यांनी सांगितलेली कथा या संकटाची भीषणता स्पष्ट करणारी आहे. त्यांचा मुलगा वकील बनण्याचे स्वप्न पाहत होता. मात्र शाळेत मित्रांच्या दबावामुळे त्याने प्रथम सिगारेट ओढण्यास सुरुवात केली. त्यानंतर हळूहळू तो चरस आणि नंतर हेरोईनच्या आहारी गेला. व्यसन इतके वाढले की ड्रग्ज खरेदीसाठी त्याने घरातील वस्तू विकण्यास सुरुवात केली. अखेर संपूर्ण कुटुंब आर्थिक आणि मानसिक संकटात सापडले. (Jammu Kashmir Drug Case)


ड्रग्जच्या व्यसनातून बाहेर पडलेले आदिल भट यांनी सांगितले की, जम्मू-काश्मीरमध्ये हे जाळे अत्यंत संघटित पद्धतीने कार्यरत आहे. त्यांच्या मते, अनेक स्थानिक टोळ्यांचे संबंध पंजाबमधील मोठ्या ड्रग्ज डीलर्सशी आहेत. सीमावर्ती भागातून अंमली पदार्थ राज्यात आणले जातात आणि त्यानंतर युवकांना लक्ष्य केले जाते. (Jammu Kashmir Drug Case)


प्रशासनाने या प्रकरणात कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. एनडीपीएस (NDPS) कायद्यांतर्गत आतापर्यंत ७०४ एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. याशिवाय राज्यातील १६५ संवेदनशील भागांची ओळख पटवण्यात आली आहे, जिथे अंमली पदार्थांची विक्री आणि वापर अधिक प्रमाणात होत असल्याचे आढळले आहे. या भागांवर विशेष नजर ठेवण्यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त आणि गुप्त पाळत ठेवली जात आहे.



या मोहिमेदरम्यान ८३० हून अधिक ड्रग्ज विक्रेते आणि व्यसनींना अटक करण्यात आली आहे. पोलिस आणि सुरक्षा यंत्रणा आता केवळ लहान पुरवठादारांवर नाही, तर संपूर्ण नेटवर्क उद्ध्वस्त करण्यावर भर देत आहेत. आर्थिक व्यवहार, हवाला नेटवर्क आणि सीमापार संपर्क यांचाही तपास सुरू आहे. (Jammu Kashmir Drug Case)


तज्ज्ञांच्या मते, बेरोजगारी, मानसिक तणाव, इंटरनेटवरील चुकीचा प्रभाव आणि सीमावर्ती अस्थिर परिस्थिती यामुळे युवक ड्रग्जच्या जाळ्यात अडकत आहेत. अनेक पालकांनीही प्रशासनाकडे अधिक पुनर्वसन केंद्रे सुरू करण्याची मागणी केली आहे. (Jammu Kashmir Drug Case)



दरम्यान, जम्मू-काश्मीरमध्ये वाढत्या ड्रग्ज संकटामुळे राज्याच्या सामाजिक रचनेवर गंभीर परिणाम होत असल्याचे चित्र आहे. युवकांचे भविष्य अंधारात जात असताना प्रशासन, समाज आणि कुटुंबीयांनी एकत्र येऊन या संकटाचा सामना करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. (Jammu Kashmir Drug Case)

Comments
Add Comment

'ATAGS' artillery gun is ready : १५ सेकंदात ३ हल्ले आणि ४८ किमीचा अचूक पल्ला; चीन-अमेरिकाही चकित

नवी दिल्ली: रणांगणावर भारताच्या सं

Delhi-Pune SpiceJet Flight : दिल्ली - पुणे विमानात तांत्रिक बिघाड; प्रवाशांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला!

नवी दिल्ली : दिल्लीहून पुण्याकडे येणाऱ्या स्पाइसजेटच्या विमानात उड्डाणापूर्वी तांत्रिक बिघाड झाल्याची घटना

Actor Prakash Raj : अभिनेते प्रकाश राज यांचा SIR वरचा दावा खोटा? निवडणूक आयोगाने दाखवला BLOचा व्हिडिओ; म्हणाले "जुन्या पत्त्यावर..."

नवी दिल्ली : अभिनेता प्रकाश राज (Actor Prakash Raj) आपल्या वक्तव्यांमुळे अनेकदा चर्चेत असतात. आता कर्नाटकमधील Special Intensive Revision (SIR)

Jharkhand : पोलिसांच्या दडपशाहीविरोधात झारखंड बंद

रांची : झारखंडमध्ये स्पर्धा परीक्षांमधील कथित अनियमिततेविरोधात निदर्शने करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या

Arunachal Pradesh : "अरुणाचल हा भारताचा अविभाज्य भाग", चीनच्या आक्षेपाला भारताचे चोख प्रत्युत्तर

नवी दिल्ली : भारताने गेल्या आठवड्यात आपल्या अधिकृत नकाशावर अरुणाचल प्रदेशातील २७ ठिकाणे आणि भौगोलिक

Vande Mataram Law : ‘वंदे मातरम्’ला राष्ट्रगीताप्रमाणेच कायदेशीर संरक्षण, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या मंजुरीने ऐतिहासिक विधेयकाचे कायद्यात रूपांतर

नवी दिल्ली: राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम्’चा अवमान करणाऱ्यांवर आता कठोर कारवाई केली जाणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी