Mayor Ritu Tawde : सुधा पार्क मार्गावरील समस्यांबाबत नागरिकांच्या तक्रारी, महापौरांची Action मोहीम

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : घाटकोपर मधील सुधा पार्क रस्त्यावर दुतर्फा अनधिकृतरित्या उभी केली जाणारी वाहने आणि रिक्षा, वाहनांच्या आडून होणारे गैरप्रकार, नागरिकांना आणि विशेषतः महिलांना होणारा त्रास या बाबींची अतिशय गांभीर्याने दखल घेत, मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी तत्काळ स्थानिक पोलिसांना पाचारण करून थेट सुधा पार्क परिसरात धडक दिली. यावेळी अनधिकृतरित्या रस्त्यावर तसेच पदपथावर उभ्या असलेल्या वाहनांवर पोलिसांनी कारवाई केली. एवढेच नव्हे तर रिक्षामध्ये खुलेआम मद्यप्राशन करणाऱ्या व्यक्तींना देखील ताब्यात घेतले. अमली पदार्थ विकणाऱ्या एका दुकानाचेही यावेळी निष्कासन करण्यात आले.



मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी विविध विषयांसंदर्भात घाटकोपर स्थित एन विभाग कार्यालयात १८ मे २०२६ रोजी बैठक घेतली. याप्रसंगी घाटकोपर येथील सुधा पार्क परिसरातील नागरिकांनीही समस्या मांडल्या. सुधा पार्क रस्त्याच्या दुतर्फा अनधिकृतपणे उभे केली जाणारी वाहने आणि रिक्षा, पदपथाचा वाहन तळासारखा केला जाणारा उपयोग, त्यातून नागरिकांना चालण्यासाठी होणारा त्रास, रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनांच्या आडून चालणारे गैरप्रकार तसेच महिलांची छेडखानी, शाळा आणि रुग्णालयांच्या परिसरात असलेल्या दुकानांमधून विक्री होणारे पान मसाला व तत्सम पदार्थ तसेच अमली पदार्थ इत्यादी बाबत नागरिकांनी व्यथा मांडल्या. या समस्यांचे तात्काळ निराकरण करण्याची मागणी नागरिकांनी केली.



या सर्व समस्यांची गांभीर्याने दखल घेऊन, महापौर रितू तावडे यांनी बैठक आटोपताच थेट सुधा पार्क रस्त्यावर महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनातील सर्व संबंधित अधिकाऱ्यांसह भेट देऊन पाहणी केली. पुष्प विहार मार्गावर रस्त्याच्या कडेला असलेल्या एका दुकानाला एसटीडी / पीसीओ व्यवसायासाठी आणि दिव्यांग आरक्षण अंतर्गत परवाना मिळालेला असताना, त्या दुकानातून अमली पदार्थांची विक्री होत असल्याचे आढळून आले. नियमांचे उल्लंघन झाल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केल्यानंतर या दुकानाचे ताबडतोब कारवाई करण्याचे निर्देश महापौरांनी दिले आणि त्यानुसार कारवाई सुरू करण्यात आली.



सुधा पार्क मार्गावर रस्त्याच्या दोन्ही बाजूला कडेला तसेच पदपथावरही अनेक वाहने आणि रिक्षा उभ्या केल्याचे आढळले. पैकी एका रिक्षामध्ये संबंधित रिक्षाचालक खुलेआम मद्यप्राशन करत असल्याचे आढळले. त्यास रंगेहात पकडून महापौरांनी पोलिसांच्या ताब्यात दिले आणि योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. तसेच अनधिकृतपणे उभी असलेली सर्व वाहने, रिक्षा यांच्यावर योग्य ती दंडात्मक कारवाई करण्याचेही महापौरांनी निर्देश दिले.

दरम्यान, याच परिसरातील शांतिपथ येथे पोलीस मैदानासमोर एके ठिकाणी कबुतरांना दाणे आणि पाणी बाहेर व्यक्तींकडून पुरवले जात असल्याची पर्यायाने स्थानिक रहिवाशांना त्रास होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली. या तक्रारीची दखल घेऊन, ती जागा कबुतरमुक्त आणि स्वच्छ करावी, त्या ठिकाणी सुशोभीकरण करावे, अशी सूचनाही महापौरांनी अधिकाऱ्यांना केली.

सुमारे चार वर्षानंतर सार्वत्रिक निवडणूक होऊन नगरसेवक लाभले आहेत. सर्व नगरसेवकांनी आपापल्या परिसरात नागरी सेवा सुविधांकडे लक्ष केंद्रित करताना, वाहतूक आणि कायदा सुव्यवस्था सारख्या मुद्द्यांवर पोलीस प्रशासनाच्या मदतीने जागरूक राहून उपाययोजना कराव्यात, असे आवाहन यानिमित्ताने महापौरांनी सर्व नगरसेवकांना केले आहे.
Comments
Add Comment

Mumbai News : ईद-ए-मिलाद मिरवणुकीतील संघर्षानंतर प्रक्षोभक व्हिडिओ व्हायरल; काळाचौकी पोलिसांकडून दोन गुन्हे दाखल

मुंबई : मुंबईतील लालबाग-परेल परिसरात 26 ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या संघर्षानंतर

Petrol Diesel Price : महिन्याचा शेवट आणि खिशावर ताण? पेट्रोल भरण्याआधी पाहा तुमच्या शहरातील आजचे नवीन दर!

मुंबई : सरकारी तेल कंपन्यांनी देशभरातील पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर जाहीर केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील

Bandra Hit And Run : भरधाव कारची 8 वर्षीय मुलाला धडक; उपचारांपूर्वीच मृत्यू, महिला चालकाला अटक

मुंबई : मुंबईतील वांद्रे पश्चिम परिसरात झालेल्या भीषण अपघातात 8 वर्षीय अंश गुप्ता या चिमुकल्याचा मृत्यू झाला.

Mumbai Bandra road accident : मुंबईत भरधाव इनोव्हाने मुलाला चिरडलं, लहानग्याच्या छातीवर चालवली गाडी

मुंबई : मुंबईतून अपघाताची बातमी आली आहे. भरधाव इनोव्हा गाडीने नऊ वर्षांच्या मुलाला चिरडले. मेहबूब स्टुडिओ जवळ हा

Indian Railway : रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या! स्टेशनवर थुंकणे, कचरा टाकणे आता महागात पडणार; थेट ₹१,००० दंड

मुंबई : रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रेल्वे स्थानक किंवा परिसरात अस्वच्छता

Mumbai Parelcha Maharaja : परळच्या महाराजाच्या आगमन मिरवणुकीत विजेच्या खांबाला आग; भाविकांमध्ये एकच घबराट  

Mumbai : मुंबईत आगामी गणेशोत्सवाचा उत्साह आता पुरेसा शिगेला पोहोचला असून, शनिवारी पार पडलेल्या 'परळचा महाराजा' आणि