Air India : अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाचा एअर इंडिया व्यवस्थापनाला दणका

मुंबई : एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड (AIASL) व्यवस्थापनाकडून कर्मचाऱ्यांवर होत असलेल्या अन्याय, त्रास व दडपशाही विरोधात अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाचे अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संघाचे सरचिटणीस सुहास माटे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज विमानतळाजवळ आंदोलन करण्यात आले. यामध्ये अनेक कर्मचारी सहभागी झाले होते. कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे अखेर एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड (AIASL) व्यवस्थापनाला झुकावे लागले व कामगारांच्या प्रलंबित मागण्या मान्य करण्यात आल्या.


कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाच्या तीव्रतेमुळे अखेर एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड (AIASL) व्यवस्थापनाला झुकावे लागले. कामगारांच्या सर्व मागण्या लेखी स्वरूपात मान्य करण्यात आल्याची माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. यावेळी महाराष्ट्र सचिव राजेंद्र भिसे, अजित आचरेकर उपस्थित होते. तसेच एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड (AIASL) व्यवस्थापनाकडून सहाय्यक महाव्यवस्थापक महेश कांबळे, मानव संसाधन व्यवस्थापक सुनीता भरदोज आणि त्यांचे पदाधिकारी उपस्थित होते.


आंदोलनादरम्यान एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड (AIASL) व्यवस्थापनाला प्रत्यक्ष आंदोलनाच्या स्थळी येऊन थेट कामगारांची भेट घेतली. या आंदोलनास सर्व कामगार बांधव व पदाधिकारी यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला आणि आंदोलन यशस्वी केले. कामगारांच्या एकजुटीमुळेच हा लढा अधिक मजबूत झाला असून भविष्यातही कामगारांच्या हक्कांसाठी संघटना कायम ठामपणे उभी राहील असे आश्वासन अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी दिले.

Comments
Add Comment

MLA Nilesh Rane : आनंदाची बातमी, गणेशभक्तांसाठी १२ सप्टेंबरला धावणार शिवसेना एक्सप्रेस

मुंबई : कोकणात राहणाऱ्यांसाठी गणेशोत्सव आणि शिमगा अर्थात होळी हे दोन अतिशय महत्त्वाचे सण. नोकरी व्यवसायाच्या

Mumbai Anti-Narcotics Cell : मुंबईत ९ कोटी ४८ लाखांचे मेथॅम्फेटामाइन जप्त; अमली पदार्थविरोधी पथकाची मोठी कारवाई

मुंबई : मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने अमली पदार्थ तस्करीविरोधात मोठी कारवाई करत मुंबई आणि ग्रेटर

Kurla Landslide : कुर्ला-राजावाडी रुग्णालयातील मृतांचा आकडा वाढला; आणखी एका तरुणाचा मृत्यू

मुंबई : कालच्या घटनेनंतर जखमी आणि मृतांची संख्या अद्ययावत करण्यात आली आहे. 13 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 1.15 वाजता

New AC Local : २०२९-३० पर्यंत मुंबईच्या सर्व लोकल एसी होणार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; द्वितीय श्रेणीचे तिकीट वाढवणार नाही मुंबई : मुंबईच्या उपनगरीय रेल्वे सेवेचे

GeM : जेमच्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राची दुहेरी बाजी; पंचायतस्तरीय खरेदीतील उत्कृष्टतेसह सर्वाधिक खरेदी मूल्यासाठी महाराष्ट्राचा गौरव

मुंबई : शासकीय ई-बाजारपेठ अर्थात जेमच्या दशकपूर्तीनिमित्त नवी दिल्ली येथे आयोजित ‘हॉनरिंग एक्सलन्स’ पुरस्कार

One-day Seminar : ‘पडद्यावरचा सिनेमा, पडद्यामागचं गणित’ या विषयावर रंगणार एकदिवसीय परिसंवाद

महाराष्ट्र चित्रपट,रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ आणि अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या