IPL 2026 : प्लेऑफसाठी विजय महत्त्वाचा!

आयपीएल रणसंग्राम - सुशील परब


आययपीएल २०२६ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु आणि पंजाब किंग्स यांच्यातील ६१ वा सामना १७ मे रोजी हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, धर्मशाला येथे दुपारी ३.३० वाजल्यापासून खेळवला जाणार आहे. प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी आणि स्थान पक्के करण्यासाठी बंगळूरु संघासाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. दुसरीकडे, सलग पराभवांमुळे श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्सचे आव्हान कठीण झाले आहे. पीबीकेएसने आपले शेवटचे सलग पाच सामने गमावले असून, त्यांच्यासाठी विजयाच्या मार्गावर परतणे अत्यावश्यक असेल. पंजाब किंग्सचे उर्वरित सामने ‘डू ऑर डाय’ (करो किंवा मरो) स्थितीत आहेत. गुणतालिकेत सध्या ते १३ गुणांसह (६ विजय) चौथ्या स्थानावर असले तरी, प्ले-ऑफचे तिकीट नक्की करण्यासाठी त्यांना दोन्ही सामने (रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु आणि लखनऊ सुपर जायंट्स) जिंकावेच लागतील. एकही पराभव त्यांना प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर करू शकतो. दोन्ही सामने गमावल्यास संघ प्लेऑफच्या शर्यतीतून पूर्णपणे बाहेर पडेल. हा सामना पंजाबसाठी अंतिम फेरीसारखाच असणार आहे, कारण आरसीबीचा संघ (१६ गुणांसह अव्वल स्थानावर) हा सामना जिंकून आपले स्थान पूर्णपणे निश्चित करण्यासाठी मैदानात उतरेल. पंजाब किंग्सला बाद फेरी गाठायची असेल, तर त्यांना फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही विभागांत पुनरागमन करून सलग सामने जिंकावे लागतील. प्रभसिमरन सिंह व प्रियांश आर्या यांच्याकडून चांगल्या खेळीची अपेक्षा आहे. त्यांना श्रेयस अय्यर, कूपर कोनोली, सूर्यांश शेडगे, शशांक सिंग, मार्कस स्टॉयनिस, मार्को जेन्सन यांची साथ मिळेल. पंजाबची गोलंदाजी मार्कस स्टॉयनिस, मार्को जेन्सन, अर्शदीप सिंग, यश ठाकूर, यांच्यावर अवलंबून असेल. विराट कोहली सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असून त्याने मागील सामन्यात नाबाद शतक १०५ धावा केल्या होत्या. त्याला जेकब बेथल, रजत पाटीदार आणि देवदत्त पडिक्कल, कुणाल पांड्या यांची भक्कम साथ मिळत आहे, तर आरसीबीची गोलंदाजी अनुभवी भुवनेश्वर कुमार आणि जोश हेझलवूड, जेकब डफी, कृणाल पांड्या यांच्या खांद्यावर असेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, पंजाब किंग्ज सलग सहाव्या पराभवाचा धोका टाळणार का? हे पाहण्यासाठी संपूर्ण क्रिकेट विश्व उत्सुक आहे.

Comments
Add Comment

India vs Sri Lanka : कोलंबो कसोटीत पावसाच्या व्यत्ययाचा भारताला फटका, श्रीलंकेची १६ धावांची आघाडी; पाचव्या दिवशी रंगणार निर्णायक लढत

कोलंबो : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात पावसाने पुन्हा एकदा व्यत्यय आणला. त्यामुळे चौथ्या

WCL Season 3 : डब्ल्यूसीएलचा तिसरा हंगाम संयुक्त अरब अमिरातीत होणार

नवी दिल्ली : वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लेजेंड्स (डब्ल्यूसीएल) आपल्या बहुप्रतिक्षित तिसऱ्या हंगामासह परत येण्यास

Sanjay Manjrekar : वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जयस्वालच्या आक्रमक वर्तनावर मांजरेकरांचा संताप; BCCI-ICC कडे कारवाईची मागणी

मुंबई : माजी भारतीय क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांनी युवा भारतीय क्रिकेटपटूंच्या

Anaya Bangar : पुरूषाची महिला झाल्यानंतर आता अनाया बांगरच्या कमबॅकचा मार्ग मोकळा; 'या' लीगमधून उतरणार मैदानावर

Anaya Bangar WBBL : अनाया बांगरने (Anaya Bangar) क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन करण्याच्या दिशेने मोठे पाऊल टाकले आहे. क्रिकेट

BWF world rankings : बीडब्ल्यूएफ जागतिक क्रमवारीत त्रिशा आणि गायत्रीची मोठी झेप

नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या बॅडमिंटन विश्वचॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकल्यानंतर, भारतीय महिला दुहेरी

Rahul Dravid : टीम इंडियाला डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची संधी, पण मार्ग खडतर - राहुल द्रविड

नवी दिल्ली : भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचे मत आहे की, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी)