कल्याण/ डोंबिवली : कल्याण रेल्वे स्थानक परिसरात एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला रेल्वे यार्डात नेऊन लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची अमानुष घटना घडली आहे. कल्याण जीआरपी पोलिसांनी तत्परतेने आरोपी सौरभ सोनवणे याला अटक केली आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर काही तासांच्या आत डोंबिवलीमध्ये दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याची घटना समोर आली. संतापजनक बाब म्हणजे या दोन्ही मुली गर्भवती राहिल्या आहेत.
मुंबई : खार (पश्चिम) येथील लिंकिंग रोडवर राजकुमार ज्वेलर्सजवळ रिक्षावर झाड कोसळल्याने,१४ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला असून, दुसरी तरुणी अद्यापही गंभीर ...
कल्याणमधील घटनेत पीडित मुलगी आपल्या मामाला भेटण्यासाठी अहिल्यानगरहून खोपोलीला मामाकडे जायचे होते. ती कल्याण बस स्थानकात उतरून लोकलची वाट पाहात होती. आरोपी सोनवणेने कोणतीही ओळख नसताना पीडितेचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेतला. मुलीने मोबाईल परत मागितला असता 'मोबाईल पाहिजे तर माझ्यासोबत पोलीस स्टेशनला चल' अशी बतावणी केली. पोलीस स्टेशनचे नाव घेताच ती घाबरली. त्यामुळे ती त्याच्या सोबत निघाली. आरोपीने तिला फसवणूक करून कल्याण रेल्वे यार्डात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. तो तिला तिथेच सोडून निघून गेला. पिडीत कशीबशी कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात पोहोचत घडलेली घटना संगितली. कल्याण रेल्वे क्राईम ब्रँच आणि जीआरपी पोलिसांनी तात्काळ रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. पोलिसांनी आरोपी सोनवणेला शोधून काढून त्याच्या मुसक्या आवळल्या.
मुंबई : मुंबईत उघड्यावर कुर्बानी देण्यास बंदी घाला, अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे. बीएमसी आणि मुंबई पोलीस यांना निवेदन देऊन किरीट ...
डोंबिवलीच्या दोन्ही प्रकरणात अल्पवयीन मुली वासनेच्या शिकार झाल्या आहेत. गर्भवती झाल्यानंतर ही माहिती समोर आली आहे. दोन्ही प्रकारात पोलिसांच्या तपास सुरू आहे. रामनगर पोलिसांनी अटक केलेला आरोपी शुभम सरोज खाजगी व्हिडिओ ग्राफिकच्या काम करतो तर मानपाडा पोलिसांनी अटक केलेला आरोपी काजू निषाद हा काहीही काम करत नाही. मुलींसोबत लैंगिक अत्याचार करून तो उत्तर प्रदेशात पळून गेला होता.






