पुणे : पुण्यात पोलीस आणि गुन्हेगारांमध्ये पाठलाग झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एखाद्या ॲक्शन चित्रपटालाही लाजवेल असा हा प्रकार पुणे जिल्ह्यात घडला असून आरोपींनी पोलिसांच्या दिशेने हवेत गोळीबार करत घटनास्थळावरून पळ काढल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर पुणे ग्रामीण पोलीस आणि पिंपरी-चिंचवड पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी मोठी मोहीम हाती घेतली आहे.
पुणे : महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील चिमुरडी अत्याचार आणि हत्या प्रकरणात आता मोठी घडामोड समोर आली आहे. आरोपीला कठोर ...
मिळालेल्या माहितीनुसार, चऱ्होली गोळीबार प्रकरणातील फरार आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी रांजणगाव परिसरातील पिंपरी दुमाला गावात सापळा रचला होता. आरोपी या परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस पथक घटनास्थळी दबा धरून बसले होते. मात्र पोलिसांची चाहूल लागताच आरोपींनी दुचाकीवरून तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. यानंतर पोलिसांनी तात्काळ त्यांचा पाठलाग सुरू केला.
या पाठलागादरम्यान काही अंतरावर पोलिसांच्या वाहनाने आरोपींच्या दुचाकीला धडक दिली. धडक बसताच आरोपीने दुचाकी जागीच सोडून पळ काढला. मात्र पळताना आरोपीने पोलिसांच्या दिशेने हवेत गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. अचानक झालेल्या फायरिंगमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. आरोपींकडून गोळीबार झाल्यानंतर पोलिसांनीदेखील स्वसंरक्षणासाठी हवेत गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे.
अकोला : ऑनलाईन फूड डिलिव्हरीच्या वाढत्या वापरामुळे ग्राहकांना घरबसल्या सुविधा मिळत असल्या, तरी याच सेवांच्या माध्यमातून ग्राहकांच्या आरोग्याशी ...
फरार आरोपींपैकी शेखर संभाजी जाधव या आरोपीचे नाव समोर आले आहे. त्याच्यावर यापूर्वीच गोळीबाराचा गंभीर गुन्हा दाखल असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. घटनेनंतर पुणे ग्रामीण गुन्हे शाखा आणि पिंपरी-चिंचवड पोलिसांची अतिरिक्त पथके परिसरात दाखल झाली आहेत. विविध ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली असून आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम राबवली जात आहे. संपूर्ण परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला असून आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत.





