KKR vs GT : KKR साठी 'डू ऑर डाय' स्थिती ! गुजरातचे लक्ष्य टॉप टू, आज ईडन गार्डन्सवर हाय-व्होल्टेज सामना

IPL 2026 : आयपीएल २०२६ मध्ये आज ६० वा सामना रंगणार असून कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders / KKR) आणि गुजरात टायटन्स (Gujarat Titans / GT) यांच्यात कोलकात्याच्या ईडन गार्डन्स मैदानावर जोरदार लढत होणार आहे. प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी केकेआरला हा सामना जिंकणे आवश्यक आहे तर गुजरातचे लक्ष्य गुणतालिकेतील दुसरे स्थान कायम राखण्यासाठी विजय मिळवणे हा असेल.



गुजरात आधीच प्लेऑफमध्ये


शुभमन गिलच्या नेतृत्वात गुजरात टायटन्सने (Gujarat Titans) या हंगामात दमदार कामगिरी केली आहे. गुजरातने १२ पैकी ८ सामने जिंकत १६ गुणांसह प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. आता त्यांचे लक्ष्य गुणतालिकेतील दुसरे स्थान कायम राखणे हेच आहे.



केकेआरसाठी करो किंवा मरो


अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात कोलकाता नाईट रायडर्सने (Kolkata Knight Riders) हंगामाची सुरुवात सलग पाच पराभवांनी केली होती. नंतर संघाने पुनरागमन करत सलग चार सामने जिंकले.मागील सामन्यात आरसीबी विरुद्ध पराभव झाल्याने केकेआरची विजयी मालिका खंडित झाली. त्या सामन्यात विराटच्या शतकी खेळीने सामना फिरवला होता.सध्या केकेआरने ११ पैकी ४ सामने जिंकले असून एक सामना पावसामुळे रद्द झाला. आता उरलेले तीनही सामने जिंकले तरच त्यांना जास्तीत जास्त १५ गुण मिळू शकतात. त्यामुळे प्लेऑफमध्ये जाण्यासाठी त्यांना इतर संघांच्या निकालांवरही अवलंबून राहावे लागू शकते.केकेआरसाठी युवा फलंदाज आंगीकृष रघुवंशीने ११ सामन्यांत ३४० धावा केल्या आहेत. तर गोलंदाजीत कार्तिक त्यागीने १० सामन्यांत १६ विकेट्स घेतल्या आहेत.गुजरातसाठी साई सुदर्शनने १२ सामन्यांत ५०१ धावा केल्या आहेत. तर वेगवान गोलंदाज कगिसो रबाडाने २१ विकेट्स घेत शानदार कामगिरी केली आहे.



हेड-टू-हेड रेकॉर्ड


केकेआर आणि जीटी या दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत ५ सामने झाले आहेत. त्यापैकी गुजरातने ४ सामने जिंकले आहेत, तर केकेआरला फक्त एक विजय मिळाला आहे. यंदाच्या हंगामातील पहिल्या सामन्यातही गुजरातने केकेआरवर मात केली होती.



पीच रिपोर्ट


ईडन गार्डन्सची खेळपट्टी साधारणतः फिरकीपटूंना मदत करणारी मानली जाते. मात्र येथे मोठ्या धावसंख्या देखील पाहायला मिळतात. या मैदानावर आतापर्यंत आयपीएलचे १०४ सामने झाले असून प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने ४३ वेळा विजय मिळवला आहे, तर ५९ वेळा लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाने सामना जिंकला आहे.



दोन्ही संघांचे प्लेइंग-१२


गुजरात टायटन्स: शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, जोस बटलर (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, निशांत सिंधू, जेसन होल्डर, राहुल तेवतिया, राशिद खान, अर्शद खान, कगिसो रबाडा आणि मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.


कोलकाता: अजिंक्य रहाणे (कर्णधार), फिन ऍलन, अंगकृष रघुवंशी (यष्टीरक्षक), कॅमेरॉन ग्रीन, रोवमन पॉवेल, मनीष पांडे, रिंकू सिंग, सुनील नरेन, अनुकूल रॉय, कार्तिक त्यागी, वैभव अरोरा, मनीष पांडे.

Comments
Add Comment

India vs Sri Lanka : कोलंबो कसोटीत पावसाच्या व्यत्ययाचा भारताला फटका, श्रीलंकेची १६ धावांची आघाडी; पाचव्या दिवशी रंगणार निर्णायक लढत

कोलंबो : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात पावसाने पुन्हा एकदा व्यत्यय आणला. त्यामुळे चौथ्या

WCL Season 3 : डब्ल्यूसीएलचा तिसरा हंगाम संयुक्त अरब अमिरातीत होणार

नवी दिल्ली : वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लेजेंड्स (डब्ल्यूसीएल) आपल्या बहुप्रतिक्षित तिसऱ्या हंगामासह परत येण्यास

Sanjay Manjrekar : वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जयस्वालच्या आक्रमक वर्तनावर मांजरेकरांचा संताप; BCCI-ICC कडे कारवाईची मागणी

मुंबई : माजी भारतीय क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांनी युवा भारतीय क्रिकेटपटूंच्या

Anaya Bangar : पुरूषाची महिला झाल्यानंतर आता अनाया बांगरच्या कमबॅकचा मार्ग मोकळा; 'या' लीगमधून उतरणार मैदानावर

Anaya Bangar WBBL : अनाया बांगरने (Anaya Bangar) क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन करण्याच्या दिशेने मोठे पाऊल टाकले आहे. क्रिकेट

BWF world rankings : बीडब्ल्यूएफ जागतिक क्रमवारीत त्रिशा आणि गायत्रीची मोठी झेप

नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या बॅडमिंटन विश्वचॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकल्यानंतर, भारतीय महिला दुहेरी

Rahul Dravid : टीम इंडियाला डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची संधी, पण मार्ग खडतर - राहुल द्रविड

नवी दिल्ली : भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचे मत आहे की, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी)