Friday, May 15, 2026

BMC : खार गोळीबार रोडवरील ९ अनधिकृत चिकन स्टॉल्सवर महापालिकेची कारवाई

BMC : खार गोळीबार रोडवरील ९ अनधिकृत चिकन स्टॉल्सवर महापालिकेची कारवाई

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या 'एच/पूर्व' विभागाने अतिक्रमण विरोधी मोहिमेत आता जोरात हाती घेत धडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. वांद्रे पूर्व येथील खार सबवे (अब्दुल हकीम चौक) ते गोळीबार कब्रिस्तान या दरम्यानच्या गोळीबार रोडवर बुधवारी, १३ मे रोजी संयुक्तपणे अतिक्रमण निर्मूलन कारवाई करण्यात आली. रस्त्याच्या कडेला असलेले ०९ अनधिकृत चिकन स्टॉल्स आणि इतर १० अनधिकृत स्टॉल्स अशा एकूण १९ स्टॉल्सवर हातोडा चालवला.या धडक कारवाईमुळे अनेक दिवसांपासून अतिक्रमणाने विळखा घातलेला हा रस्ता आता पूर्णपणे मोकळा झाला आहे.

महानगरपालिकेच्या एच/पूर्व विभागाच्या सहाय्यक आयुक्त मृदुला अंडे यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका एच पूर्व विभाग आणि अतिक्रमण विभागाने ही संयुक्त कारवाई पार पडली. ररस्त्यावरील अनधिकृत बांधकामांमुळे आणि स्टॉल्समुळे वाहतुकीला व पादचाऱ्यांना मोठा अडथळा निर्माण होत होता. याबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्यात होत्या. या तक्रारींची दखल घेत विभागाच्या सहाय्यक आयुक्त मृदूला अंडे यांनी धडक कारवाई हाती घेत सर्व स्टॉल हटवले.

१९ अनधिकृत स्टॉल्स जमीनदोस्त

या मोहिमेदरम्यान रस्त्याच्या कडेला असलेले ०९ अनधिकृत चिकन स्टॉल्स आणि इतर १० अनधिकृत स्टॉल्स अशा एकूण १९ स्टॉल्सवर महापालिकेने कारवाई केली. महापालिकेचे कर्मचारी आणि पोलीस बंदोबस्तात ही मोहीम राबवण्यात आली. कारवाईनंतर संपूर्ण रस्ता मोकळा करण्यात आला असून, येथील वाहतूक आता सुरळीत झाली आहे. यापुढेही अनधिकृत अतिक्रमणांविरुद्ध अशीच कठोर मोहीम सुरू राहील, असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला

Comments
Add Comment